अशा घरामध्ये ज’न्माला येतात भाग्यवान मुली.! देव यांना याच घरामध्ये पाठवतो.. बघा रहस्य..
मित्रांनो, मित्रांनो आपण अशा समाजात जगतोय जो आजही पुरुषप्रधान आहे, आजही जर एखाद्या मुलीचा ज’न्म झाला तर बहुतेक घरांमध्ये उदास वातावरण असते हे अजून काहीजन तर मानवातील अज्ञानताच आहे. जे एक मुलगी म्हणजे ओझेच समजतात परंतु तुम्हाला हे समजल्यावर आश्चर्य वाटेल की, मुलीचा ज’न्म हा प्रत्येक घरात होत नसतो. जे लोक खूप भाग्यवान असतात आणि ज्यांनी आपल्या पूर्व जन्मामध्ये अनेक पुण्य कर्म केलेली असतात. त्यांच्याच घरात मुलगी ज’न्माला येते,
आणि आज आम्ही तुम्हाला याचीच माहिती देणार आहोत की, देव अशी कोणती घरे मुलीच्या ज’न्मासाठी निवडतो आणि अशी कोणती पुण्य कर्मे आहेत जी केल्याने कोणीही मनुष्य मुलीचे माता पिता होऊ शकतात. मित्रांनो एक दिवशी जेव्हा अर्जुन श्रीकृष्णाला विचारतो की, देवा अशी कोणती पूण्यकर्मे आहेत जी केल्याने कोणत्याही घरात मुलीचा ज’न्म होतो तेव्हा श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की, हे पार्थ कोणाच्याही घरी मुलगा भाग्याने ज’न्म घेतो तर मुलगी सौभाग्याने. जे कोणी स्त्री पुरुष आपल्या पूर्वजन्मामध्ये अनेक पुण्य कर्म करतात त्यांनाच,
एका मुलीचे माता पिता होण्याचे सौभाग्य प्राप्त होते. एवढेच नाही तर मुलीच्या ज’न्मासाठी असेच घर निवडले जाते जे त्या मुलीचा भार सहन करू शकते. कारण तिन्ही लोकांमध्ये स्त्रीया म्हणजेच मुलीच अशा असतात की, ज्यांचा भार सर्वांना सहन करणे शक्य नसते, त्या मुलीच असतात ज्या ही सृष्टी निरंतर चालण्यासाठी आपले सर्वस्व वाहतात हे अर्जुना पण ज्या दिवशी या सृष्टीमध्ये मुलींनी ज न्म घेणे बंद होईल त्यादिवशी ही सृष्टी सुद्धा थांबेल. आणि हळूहळू या सृष्टीचा शेवट होईल.
मित्रांनो भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेल्या या गोष्टींचा जर विचार केला तर त्यांचे म्हणणे एकदम बरोबर आहे. कारण जर मुली ज’न्माला नाही आल्या तर कोणाचाच वंश पुढे जाणार नाही. तुम्ही पण हे ऐकले असेलच की ज्या घरात मुलगी ज’न्म घेते ते घर स्वर्गा समान असते. कारण मुलगा तर फक्त एकाच घराचे नाव मोठे करतो तर मुलगी दोन घरांचे नाव मोठे करत असते. आपल्या मातापितांच्या घरी ती मुलीच्या रूपात आपल्या कर्तव्याचे पालन करत असते. तर सासरी गेल्यावर एका सुनेच्या रूपात कर्तव्याचे पालन करत असते.
मित्रांनो आजकाल तुम्ही ऐकलेच असेल की, मुलगी किंवा सून त्यांच्या परिवारात कोणाचाही मृ-त्यू झाल्यानंतर पिंडदान करू शकत नाही. परंतु हे अजिबात सत्य नाहीये कारण रामायणामध्ये सांगितले गेलेले आहे की, जेव्हा प्रभू श्रीराम यांचे वडील राजा दशरथ यांचा मृ’त्यू होतो तेव्हा माता सीता म्हणजेच राजा दशरथ यांची सून हिनेच त्यांचे पिंडदान केले होते. ज्यामुळे राजा दशरथाला ज’न्म म’रणाच्या चक्रातून मुक्ती मिळाली होती. हिं दू ध र्म शास्त्रामध्ये सांगण्यात आले आहे की, मुली सुद्धा आपल्या वडिलांचे पिंडदान करू शकतात.
आणि तसेच जर त्यांच्या सासरी कोणी पुरुष मंडळी नसतील तर सून सुद्धा पिंडदान करू शकते. म्हणूनच ते लोक खूप भाग्यवान असतात ज्यांच्या घरात मुलगी ज’न्माला येते आणि त्या लोकांचे नशीब तर जास्त शक्तिशाली असते ज्यांच्या घरात एकापेक्षा जास्त मुली ज’न्माला येतात. म्हणूनच मुलींना लक्ष्मी असे म्हटले जाते. बहुतेक लोकांचे विचारसरणी अशीच असते की, मुलगी झाली आहे तर जास्त वेळ वाया न घालवता आणि तिच्या शिक्षणावर जास्त पैसे न खर्च करता लवकरात लवकर तिचे लग्न करून द्यावे.
परंतु ही विचारसरणी एका मुलीच्या भविष्याची विल्हेवाट लावून टाकते जरा विचार करा की, एका मुलीच्या मनात किती स्वप्ने असतात तिला खूप काही करायचं असते परंतु ही स्वप्ने फक्त स्वप्नेच बनून राहतात म्हणूनच आपल्या मुलींना स्वप्न पूर्ण करू दिले पाहिजे. त्यांना जीवनात तो प्रत्येक आनंद घेऊ दिला पाहिजे. जो त्यांना मिळायलाच हवा एका मुलापेक्षा जास्त एक मुलगीच आपल्या आई-वडिलांचा विचार करत असते. आई-वडिलांसाठी प्रेम आणि आपुलकी ही मुलींमध्येच दिसून येते. मुलीचा ज’न्मदिवस हा एका मेजवानी प्रमाणे साजरा केला पाहिजे.
आई-वडिलांनी मुलीला नेहमी अशी जाणीव करून द्यायला हवी की, ती खूप खास आहे मुलगी ही वडिलांसाठी कधीच एक ओझे नसते, तर ती फक्त स्वतःचे आणि आपल्या परिवाराचे नशीब बदलण्यासाठी ज’न्म घेत असते. एका कथेच्या अनुसार दोन मित्र खूप दिवसांनी एकमेकांना भेटतात एका मित्राने दुसऱ्या मित्राला त्याची खुशाली विचारली तेव्हा तो म्हणाला की, मी तर खूप खुश आहे आणि का खुश असू नये मला तर दोन मुलगे आहेत. तेव्हाच तो दुसऱ्या मित्राला विचारतो की तुझ्या घरी किती मुले आहेत तेव्हा तो खुश होऊन सांगतो की,
माझ्या घरात दोन मुली आहेत हे ऐकून त्याचा मित्र देवाचे आभार मानत असे म्हणतो की, मी खूप भाग्यवान आहे माझ्या घरात मुली नाहीयेत हे ऐकून मुलींच्या वडिलांच्या डोळ्यात पाणी आलं तेव्हाच त्यांची मुलगी त्यांच्या मित्राला असे सांगते की, काका देव नेहमी भाग्यवान असणाऱ्या लोकांनाच मुलगी देतो. कधीच गरिबाला मुलीच्या रुपात माता लक्ष्मी नाही देत. मित्रांनो जे लोक मुली पोसण्यासाठी समर्थ असतात अशाच लोकांच्या घरात देव मुलीला ज’न्माला घालतो. जे गरीब असून देखील स्वतःच्या मुलींना सांभाळू शकतात.
एकदा स्वामी विवेकानंद वैष्णव देवी मंदिराची शिडी चढत असतात. आणि त्यांच्या बाजूलाच एक शेतकरी आपल्या मुलीला खांद्यावर घेऊन शिडी चढत होता. त्यावेळी स्वामी विवेकानंदांनी सांगितले की, बाबा तुमच्या मुली मुळे तुम्हाला ओझे वाटत असेल त्यामुळे तिला मी उचलून मंदिरा पर्यंत घेऊन जाऊ का.? तेव्हा त्या शेतकऱ्यांनी स्वामीजींना सांगितले की, मुलगी ही कधीच तिच्या वडिलांच्या खांद्यावरचे ओझे नसते, जेव्हा मुलगी वडिलांच्या खांद्यावर असते. तेव्हा ती वडिलांच्या खांद्यावरचे सगळे ओझे कमी करत असते.
मित्रांनो मुली कधीच धनप्राप्तीसाठी भुकेलेल्या नसतात तर त्या केवळ मान आणि सन्मान प्राप्त करण्यासाठी भुकेलेल्या असतात. आता विचार करण्यासारखी गोष्ट अशी आहे की, असे कोणते कर्म केल्यानंतर तुम्ही एखाद्या घरात मुलगी म्हणून ज’न्म घेऊ शकता. आणि त्या घरासाठी लक्ष्मीचे रूप म्हणून सिद्ध होऊ शकता. गरुड पुराणामध्ये सांगण्यात आले आहे की, जेव्हा आत्म्याला नवीन ज’न्म मिळतो तेव्हा आत्म्याला मिळालेल्या शरीरानुसार व्यवहारांमध्ये तडजोड करत आपली कामे करायची असतात.
शरीराच्या माध्यमातून कर्म करतच एखादा आत्मा आपल्या ज’न्माच्या उद्देशाला सार्थ ठरवू शकते. किंवा निरर्थक सुद्धा ठरवू शकते जर एखादा पुरुष स्त्रियांप्रमाणे आचरण करत असतो. त्याच्या स्वभावात स्त्रियांसारख्या सवयी असतात किंवा तीच कामे करू इच्छितो जी स्त्रिया करत असतात तर अशा पुरुषांचे आत्मा पुढच्या ज’न्मात स्त्रियांचे शरीर धारण करते. त्याचप्रमाणे गरुड पुराणात सांगण्यात आले आहे की, जर एखादी व्यक्ती आपल्या शेवटच्या क्षणात एखाद्या स्त्रीची आठवण करत असते. तर ती पुढच्या ज’न्मात स्त्री म्हणून ज’न्माला येते आणि जर त्याने शेवटच्या क्षणात परमेश्वराची आठवण केली तर तो मुक्तीच्या मार्गावर अग्रेसर होतो.