रामायण काळातील जटायूची रहस्यमय गुहा पाहून तुम्हालाही ध’क्का बसेल.. आजही ते या ठिकाणी पाहायला मिळतात..
नमस्कार मित्रांनो..
मित्रांनो, रामायण तर आपल्या सर्वांना माहितच आहे. परंतु ज्या व्यक्तींनी रामायण किंवा रामचरीत्र मानस वाचलंय किंवा ही कथा ऐकली आहे त्यांना जटायू बद्दल नक्कीच माहीत असणार. ‘जटायू’ हा एक असा विशाल पक्षी होता ज्याने रावणाच्या कै’देतून माता सीताला सोडवण्यासाठी केलेल्या प्रयत्नात आपल्या जीवाचे ब’लिदान दिले होते. आता हे जटायू कुठे राहायचे आणि,
ते ठिकाण कोणते होते याबद्दल आज आपण पाहणार आहोत. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की, ७ हजार वर्षानंतर आजही ती जागा अस्तित्वात आहे जिथे जटायू राहात होते. शिवाय रावण जेव्हा माता सीता यांचे अपह’रण करून वायू मार्गाने जात होता तेव्हा रावणासोबत यु-द्ध करत असताना जटायू ज्या ठिकाणी जमिनीवर पडले, ते ठिकाण आजही अस्तित्वात आहे.
जिथे जटायू राहत होते आणि यु’द्ध करत असताना आपल्या जीवाचे ब’लिदान दिले होते ते ठिकाण छत्तीसगड मध्ये आहे. फरसगावच्या पुढे सुमारे दोन किलो मीटर दूर जगदरपुर रस्त्यावर हाईवे तीस च्या खाली उतरल्यावर डावीकडे जंगलामध्ये ६०० मीटर आतमध्ये हे स्थान आहे ज्याला “जटायू शिला” म्हटले जाते. ह्या ठिकाणी जाण्याचा मार्ग आपल्याला कोणीही सांगत नाही.
आपल्याला एकट्यालाच हे ठिकाण जंगलात शोधून काढावे लागते. दाट जंगलात ही अशी जागा आहे जिथे सकाळच्या उजेडातही जाण्याची भीती वाटते. लोक जेव्हा इथे जातात ते समूहाने जाणेच फायद्याचे आहे असे म्हणतात. रामायणामध्ये असे म्हटले आहे की, जटायूने रामाच्या पायावरच आपला प्रा’ण सोडला होता आणि भक्त जटायुचा अंतिम संस्कार श्री राम आणि लक्ष्मण ने केले होते.
जटायू शीलाच्या दुसऱ्या बाजूला “मा दंतेश्वरी” चे मंदिर पण आहे. या मंदिरात महाशिवरात्री दिवशी विशेष पूजा अर्चना केली जाते. इतिहासामध्ये जर तुम्ही जटायूचे स्थान शोधाल तर केरळमध्ये आहे. या ठिकाणाला “जटायू अर्थ सेंटर मेजर पार्क” असे म्हटले जाते. हे स्थान केरळ मधील कोलम जिल्ह्यात चादियमंगलं गावात स्थित आहे. जे पासष्ट एकर क्षेत्रात पसरले आहे.
२०० फूट लांब, १५० फूट रुंद आणि ७० फूट उंच अशी जटायू ची मूर्ती तेथे स्थापन केली आहे. ही मूर्ती भारतातील अनेक मोठ्या मुर्त्यांपैकी एक आहे आणि पर्यटनाचे आकर्षण देखील ठरली आहे. जटायूच्या मूर्ती मध्ये डिजिटल मुझियम आहे ज्यात रामायण सं’बंधी माहिती दिली जाते. या मूर्तीला बनवायला सात वर्ष लागली होती. या मूर्तीच्या परिसरात अनेक प्रकारच्या गोष्टी उपलब्ध आहेत.
या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना मनोरंजन, रो’मांच तसेच आराम सगळच मिळेल अशी व्यवस्था केली गेली आहे. हे ठिकाण आता फारच सुंदर असे पर्यटन स्थळ बनले आहे. परंतु रामायण मध्ये असलेल्या उल्लेखा नुसार भगवान राम यांना सर्वात पाहिले याच ठिकाण हून समजले होते की, त्यांची पत्नी माता सीता यांचे अपह’रण रावण ने केले आहे आणि माता सीता यांना दक्षिण दिशेकडे घेऊन गेले आहेत.
मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.