श्री कृष्णाने मागितलेली हि ५ गावे आज कुठे आहेत.. जाणून घ्या महाभारत काळातील या ५ गावांचे रहस्य..
मित्रांनो रामधारी सिंह दिनकर यांच्या कवितेच्या ओळी तुम्ही सर्वांनी ऐकल्याचं असतील ज्यामध्ये श्रीकृष्ण हस्तिनापुर राजदरबारात पांडवांसाठी पाच गावांची मागणी करतात परंतु दुर्योधन ही पाच गावे पांडवांना देण्यासाठी मान्य करत नाहीत आणि यानंतर काय घडले हे तर आपल्या सर्वांना माहीतच आहे. पण मित्रांनो तुम्हाला माहित आहे का ? ते पाच गावे कोणती व कुठे आहेत ?
तर मित्रांनो आज आपण याबद्दलची माहिती जाणून घेऊया. १) इंद्रप्रस्थ :- हस्तीनापुर मधून तडीपार केल्यानंतर पांडवांनी इंद्रप्रस्थ हीच आपली राजधानी बनवली होती. पौराणिक शास्त्रांच्या अनुसार पांडवांनी खांडवप्रस्थ नष्ट केले होते आणि तिथे आताच्या काळात इंद्रप्रस्थ हे स्थित आहे. असे मानले जाते की महाभारत काळामध्ये जिथे इंद्रप्रस्थ स्थित होते तिथेच आज दिल्लीचा पुराना किल्ला स्थित आहे.
भारतीय पुरातत्त्व विभागाच्या सर्वेक्षणानुसार पुराना किल्ला हा यमुना नदीच्या किनारी स्थित होता, या किल्ल्याच्या उत्तर आणि पश्चिमी किनाऱ्यावर भूमीचा तीव्र दबाव आहे जो या गोष्टीचा संकेत देतो की, या किनार्यांवर नदीला जोडली जाणारी एक खोल दरी होती आणि किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी मुख्य भूमीपासून किल्ल्यापर्यंत जोडल्या गेलेल्या एका उंच सेतूचा वापर केला जात असे. पुराना किल्ला एका प्राचीन किल्ल्यावर स्थित आहे, त्याच्याखाली महाभारताच्या इंद्रप्रस्थ नगराचे अवशेष लपलेले आहेत.
या ठिकाणी तीन वेळा खोदकाम केले गेलेले आहे आणि त्यामध्ये तेरा कोटा खेळणी आणि तपकिरी रंगाच्या मातीपासून बनवलेली भांडी आढळून आली ज्यावर काळ्या रंगाने सामान्य चित्रे काढलेली आहेत. अशी भांडी महाभारताशी सं’बंधित अनेक ठिकाणी याआधी देखील आढळून आली आहेत आणि निर्धारित कालखंडा प्रमाणे ही भांडी इसवी सन पूर्व १००० पासूनची आहेत. ही भांडी या ठिकाणी आढळून आल्यामुळेच महाभारतातील प्रसिद्ध पांडवांची राजधानी इंद्रप्रस्थ ही पुराना किल्ल्याच्या ठिकाणीच होती हे सिद्ध होते.
२) व्याघ्रप्रस्थ :- महाभारताच्या काळातील व्याघ्रप्रस्थ या गावाला आता “वाघपथ” म्हणून ओळखले जाते. असे म्हणतात की, या ठिकाणी शेकडो वर्षापूर्वी वाघांचे वास्तव्य होते. मुघल काळापासूनच व्याघ्रप्रस्थचे नाव वाघपथ असे ठेवण्यात आले होते. वाघपथ हे तेच गाव आहे जिथे कौरवांनी “लक्षाग्रह” निर्माण करून पांडवांना जाळण्याचा प्रयत्न केला होता. भारतीय पुरातत्व विभागाला येथे जमिनीच्या खाली चार हजार वर्षापूर्वीचे कक्ष, शाहि ताबूत, डाळ आणि तांदूळ यांनी भरलेली मडकी, तलवारे, अवजारे,
मुकुट आणि माणसां सोबतच गाडल्या गेलेल्या प्राण्यांची हाडे देखील मिळाली. ३) स्वर्णप्रस्थ :- महाभारताच्या काळातील स्वर्णप्रस्थ हे गाव आता “सोनीपत” म्हणून ओळखले जाते, बदलत्या वेळेनुसार महाभारताचे स्वर्णप्रस्थ हे सोनप्रस्थ असे बोलले जाऊ लागले आणि आता सोनीपत म्हणून ओळखले जाते. आज हे हरियाणा मधील एक प्रसिद्ध शहर आहे आणि यातील इतर छोट्या शहरांमध्ये गोहाना, गन्नौर, मुंडलाना, खरखोदा आणि राई आहे.
४) पांडुप्रस्थ :- आताच्या काळातील पानिपत या शहराला महाभारताच्या काळात पांडुप्रस्थ म्हणून ओळखले जात होते. पानिपत नवी दिल्ली पासून ९० किलोमीटर अंतरावर उत्तर दिशेला आहे. पानिपत मध्येच कुरुक्षेत्र हे ठिकाण आहे जिथे महाभारताचे यु-द्ध झाले होते. कुरुक्षेत्र हे हरियाणा राज्यातील एक प्रमुख जिल्हा आणि तीर्थक्षेत्र आहे. याचा शहरी भाग येथील अजून एक शहर थानेसर सोबत जोडला गेलेला आहे. एवढेच नव्हे तर याच करूक्षेत्रामध्ये ज्योतीसर या नावाच्या ठिकाणी श्री भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला भगवत गीतेचा उपदेश दिला होता.
करूक्षेत्रामध्ये महाभारताच्या यु’द्धाचे पुरावे आजही ५५०० वर्षानंतर दिसून येतात. असे म्हणतात की कुरूक्षेत्राचा विस्तार ४८ कोस क्षेत्रामध्ये होता. हे क्षेत्र आताचे हरियाणा आणि पश्चिमी उत्तर प्रदेश मधील काही जिल्ह्यांमध्ये पसरलेले आहे. महाभारताचे साक्ष देणारे थोडे पुरावे आजही जमिनीखाली गाडले गेलेले आहेत तर काही उत्खननामुळे जगासमोर आले आहेत.
५) तिलप्रस्थ :- तिलप्रस्थ नावाचा हे गाव आता “तिलपत” म्हणून ओळखला जातो. हा हरियाणा राज्यातील फरीदाबाद जिल्ह्याचा एक भाग आहे. मुघल काळामध्ये तिलपत हे गाव तिलपत गढी या नावाची एक रियासत होती. या गावातील भुगर्भा मधून महाभारता पेक्षाही प्राचीन सभ्यता आणि संस्कृतीचे अवशेष आढळून आले आहेत. द्वापार युगामध्ये जेव्हा पांडवांनी एक सुंदर शहर इंद्रप्रस्थ ची निर्मिती केली तेव्हा तिलपत गाव हा इंद्रप्रस्थ राजधानी चा एक भाग होता.
इतिहासामध्ये पाच मुख्य गावे होती ज्यामध्ये तिलपत या गावाचा समावेश होतो आणि या गावांमध्ये तिलपत गाव हे सर्वात प्राचीन गाव आहे.महाभारतामध्ये जर कुठल्या जागेला विशेष महत्व दिले गेले आहे तर ती जागा म्हणजे हस्तिनापुर. हस्तिनापुर हे कौरवांचे राज्य होते. आणि महाभारत ही कथा हस्तिनापुर या शहराच्या आसपास फिरत असलेले दिसून येते. तुम्हा सर्वांना हे तर माहीतच आहे की महाभारत हे युद्ध हस्तिनापूर शहरासाठीच झाले होते. हस्तीनापुर ही जागा आता मीरत शहरामध्ये वसलेली आहे.
हस्तीनापुर हे करू वं’शाची राजधानी होती. या ठिकाणी राहणाऱ्या लोकांनी जगातील सगळ्या प्रकारचा आनंद अनुभवलेला आहे. आज हे भारताच्या प्रमुख तीर्थक्षेत्रांमधील एक आहे. हे स्थान एक पौराणिक स्थान आहे जे सर्वात पहिले ओसाड झाले होते. असे म्हणतात की पांडवांची सातवी पिढी जेव्हा इथे राज्य करीत होती तेव्हा त्यांचे राज्य खूप सीमित होते तेव्हा गंगा नदीला अचानक भयंकर पुर आला आणि संपूर्ण शहर पुराच्या पाण्यात वाहून गेले. हस्तीनापुर मध्ये महाभारताचा अतिशय महान इतिहास लपलेला आहे जो महाभारताची महानता दर्शवतो.