अगदी आनंदाने मी त्याच्याशी लग्नगाठ बांधली होती.. आणि त्याने पहिल्याच रात्री माझ्यासोबत अशाप्रकारे.. त्या रात्री जे घडले ते..
नमस्कार मित्रांनो..
दरवेळी प्रमाणे ऑफीस मध्ये सर्व काही सुरळीत चालू होते आणि अचानक मोहितने सर्वांसमोर प्राचीला प्रपोज केले, तिच्या होकाराने सर्व ऑफिस टाळ्यांच्या आवाजाने दुमदुमून गेले. कंपनीमध्ये कॉम्पुटर ऑपरेटर म्हणून काम करणारी प्राची आता मोहितची बायको बनून एका कंपनीची मालकीण होणार होती. मोहित आणि त्याचा मित्र संजय दोघे मिळून ती कंपनी चालवत होते.
मोहित शहरातल्या श्रीमंत आणि प्रतिष्ठित व्यक्तींपैकी एक होता. त्याच्याकडे अफाट संपत्ती होती. एवढ्या श्रीमंत आणि प्रतिष्ठित मुलाला त्याच्या बरोबरची मुलगी अगदी सहज मिळाली असती. तरी सुद्धा त्याने प्राचीसोबत लग्न करण्याचा घेतलेला निर्णय सर्वांसाठी आश्चर्याचा धक्का होता. ऑफिसच्या पहिल्या दिवसापासून प्राची त्याला आवडायची. प्राची दिसायला खूप सुंदर आणि आकर्षक होती.
हसरी, लाजरी, मनमिळावू स्वभावाची असल्याने फारच कमी वेळात तिची सर्वांशी चांगली मैत्री झाली होती. रंगाने सावळी, रेखीव बांधा, बोलके डोळे, लांब सडक केस, हसरा आणि प्रसन्न चेहरा मोहितला मोहून टाकायचा. हळू हळू त्याने तिच्याशी ओळख वाढवली. त्यांच्यात आता चांगलीच मैत्री झाली होती. आणि साहजिकच त्या मैत्रीच रुपांतर आता प्रेमात झाल होत.
प्राची मध्यमवर्गीय कुटुंबातील साधी मुलगी आणि मोहित मात्र ग’र्भश्रीमंत, तरीही मोहितच्या घरच्यांनी प्राचीला आपली सून म्हणून आनंदाने स्वीकारले होते. तिच्या घरच्यांना कोणत्याही प्रकारच ओझ वाटायला नको म्हणून लग्न अगदी साध्या पद्धतीने करण्यात आल. अगदी कमी लोक आणि कमी खर्चात त्या दोघांच लग्न झाल.
आपल्या मुलीला एवढे चांगले लोक मिळाले, एवढे प्रेम करणारा नवरा मिळाला म्हणून प्राचीच्या घरचे खूप आनंदात होते. पोरीने नशीब काढल म्हणून समाधानी होते. येणारा प्रत्येक पाहुणा दोघांना बघून भरभरून आशीर्वाद देत होता. प्राचीचा आनंद आता गगनात मावत नव्हता. अतिशय सुरेख पद्धतीने लग्न समारंभ पार पडला. लग्नानंतर दोघेही परदेशी फिरायला जाणार होते.
प्राचीसाठी विमान प्रवास म्हणजे जणू काही एक स्वप्नच होत. ती आजपर्यंत फक्त बस आणि ट्रेन मधूनच फिरली होती. सव्वीस वर्षात आज पहिल्यांदा ती विमानात बसणार होती. एअर पोर्टवर तिला संजय सारखा कोणीतरी दिसतो, म्हणून ती मोहितला त्याबद्दल सांगते. संजय हा मोहीतचा फक्त व्यावसायिक भागीदार नव्हता तर एक जिवलग मित्र देखील होता.
छे, तो नसेल मी त्याला चांगला आठवडाभराचा कामाचा ढीग सोपवून आलोय. तो कशाला ते सोडून फिरत बसेल. तुझ्या खात्री साठी आपण त्याला फोन करूयात का ? मोहित प्राचीला म्हणाला. अरे नको राहू दे, माझा काहीतरी गैरसमज झाला असेल – ती म्हणाली. आपण जाऊयात आपल्याला उशीर होईल. अस म्हणून मोहित आणि प्राची तिथून निघाले.
प्राची खूप खुश होती. तिथे मोहित तिला एका अलिशान अशा पंचतारांकित हॉटेल मध्ये घेऊन गेला. ते तर तिच्या स्वप्नाच्या पलीकडलेच होते. तिथला सर्व नयनरम्य देखावा बघतच दोघे त्यांच्या रूम मध्ये गेले. आवडल का हॉटेल ? मोहितने तिला विचारल, हो.. पण खूप महाग असेल न? तुला आवडल ना? तुझ्या आनंदापुढे पैशाच काहीच मोल नाही. अस म्हणून मोहितने तिला जवळ घेतल आणि ते झोपी गेले.
पण मध्यरात्री प्राचीला अचानक जाग आली, तेंव्हा रूम मध्ये ती एकटीच होती. मोहित कुठे दिसत नव्हता म्हणून ती त्याला शोधू लागते. अंधारात लाईट लावून ती रुमच्या बाहेर येते. सगळ्याच रूम बंद असतात. मोहितला आवाज देत देत ती पुढे येत आणि एका रुमपशी येऊन थांबते. तिला आतून मोहितच्या हसण्याचा आवाज येतो. तिने कसलाही विचार न करत त्या रूमचे दार वाजवले.
पण त्यावेळी अर्धन ग्न अवस्थेत फक्त टोवेल गुंडाळलेल्या मोहितने दरवाजा उघडला. त्याला अश्या अवस्थेत पाहून तिला घाम फुटतो. ती त्याला काही विचारणार तोच आतून संजयचा आवाज येतो. ती आत डोकावते, तर अंगावर चादर ओढून झोपलेला संजय तिला दिसतो. आता प्राची घा’बरलेल्या अवस्थेत दोघांकडे नुसती पाहत राहिली.
त्याच अवस्थेत ती आपल्या रूम मध्ये जाते. मोहित तिच्या पाठीमागे त्यांच्या रूम मध्ये जातो, प्राची काय झाले आहे ते मी तुला सांगतो. ऐक माझ, संजय आणि मी आम्ही एकमेकांवर खूप प्रेम करतो, कपल म्हणून आम्ही एकमेकांसोबत राहतो. माझ्या घरच्यांना आमच नात पटणार नाही म्हणून मी तुझ्याशी लग्न केलंय. आमच्या कुटुंबच स्टेटस यामुळे टिकून राहील.
प्राची, मी मात्र तुला कोणत्याच बंधनात ठेवनार नाही. तुझ्या आणि तुझ्या कुटुंबाच्या सर्व गरजा मी पूर्ण करेन. फक्त माझ हे गु’पित कोणाला कळू देऊ नकोस. प्राचीला हे सर्व ऐकून प्रचंड मा नसिक ध क्का बसला. जस मोहितने तिच्याशी लग्न करण हे तिच्यासाठी एक मोठ स्वप्न होत तसाच हा एक ध क्का देखील होता, तिला त्या स्वप्नातून जाग करणारा.
पुढे काय करायचं याचा विचार करायला ती मोहित कडून थोडा वेळ मागून घेते. मात्र काय कराव हे तिला समजत नव्हत. रात्रभर तशीच डोक धरून आपल्या परिस्थितीला दोष देत ती रूम मध्ये बसून राहते. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.