Alphamarathi.com

Super Fast Marathi News
बायकोच्या सांगण्यावरून पोरानं बापाला घराबाहेर काढलं.. म्हणाला तुम्ही सतत समोर असल्याने तिला नेहमी साडीत रहाव लागत.. पण बापानं त्यांच्यासोबत जे काही केले ते पाहून तुम्हालाही..

नमस्कार मित्रांनो..

मुलांना लहानाचे मोठं करता-करता आई वडिलांना किती त्रास सहन करावा लागतो, किती गोष्टी सांभाळाव्या लागतात पण याची किंमत फार कमी लोकांना कळते. त्यामुळे जीवनातील आनंद निघूनच जातो, अशी वडिलांच्या पदरी पडते ती फक्त निराशा. यामुळे बरेच आईवडील आज सुद्धा वृद्धा श्रमात बघायला मिळतात. अशी अनेक उदाहरणे या समाजात दिसून येतात,

असेच एक उदाहरण ज्यांचा खरंच बोध घ्यावा वाटतो व हेवा देखील. तर मित्रांनो चला पाहूया याठिकाणी काय घडले आहे. रमेशच लग्न झालं होतं, त्याला दोन मुलं देखील होती, तो आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याचे अतिशय उत्तम असे कुटुंब होतं, त्याचे वडील तर अतिशय शांत आणि प्रामाणिक स्वभावाचे होते. कुटुंबामध्ये सर्व वातावरण अतिशय सुंदर होतं.

पण अचानक रमेशच्या आईचं आकस्मिक निधन झालं, रमेशची आई गेल्यानंतर त्याने एका महिन्यातच वडिलांसोबत भां’डण करायला सुरुवात केली, तो त्याच्या वडिलांना म्हणायचा की बाबा तुमच्यामुळे मला खूप त्रास होत आहे. घरामध्ये खूप भांडण होत आहेत. माझ्या बायकोला आई गेल्यामुळे घरातील सर्वच कामे करावी लागत आहेत, त्यातून ती तुमच्या समोर साडी घालून काम करते,

आणि तिला साडी घालायला आवडत नाही, तिला खूप अवघडल्यासारखं होतंय. तिला मॉडर्न लाईफ जगायला आवडते, आणि तुमच्या संस्कारामुळे तिला त्या पद्धतीने जगायला येत नाही. इतकं बोलून न थांबता चक्क त्याने वडिलांना स्पष्ट सांगितले की, बाबा तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही आता घराच्या खाली असलेल्या गॅरेजमध्ये राहायला जा, रमेश ने आपल्या वडिलांना खूप मोठं घर असून सुद्धा,

गॅरेज मध्ये राहायला सांगितलं. वडील इतके साधे, सहनशील होते की काहीच न बोलता आपलं सामान घेऊन गॅरेज मध्ये राहिले गेले, काही दिवसानंतर ते परत घराच्या पायऱ्यावर चढून आले, आणि बेल वाजवली, रमेश ने घराचा दरवाजा उघडला, आणि त्याला वाटलं घरात परत भांडण होणार, पण बाबा काहीच बोलले नाहीत, खूप विचार करून बाबांनी हा निर्णय घेतला होता,

त्यांनी रमेश च्या हातामध्ये काही तिकीट दिली, आणि त्यांनी सांगितलं बाळा तुम्ही दहा दिवस फॉरेनला ट्रिपला जाऊन या, ही त्याचीच तिकिटे आहेत. तसेही तुम्ही आई गेल्यानंतर खूप उदास उदास आहात, जरा बाहेर फिरून आलात तर तुमचे मन थोडेसे हलक होईल. रमेश ने टिकीट घेतली आणि आपल्या बायकोकडे घेऊन गेला, ही बाबांनी आपल्याला फॉरेन ट्रीप ला जाण्यासाठी टीकिटे दिली आहे.

बायको म्हणाली तुम्ही जास्त लक्ष देऊ नका, आपल्याशी गोड बोलून घरामध्ये यायचं असेल त्यांना, तसेही तिकीटे मिळालीच आहेत तर आपण फिरून येऊ की.. ते मोठ्या खुशीने तयारी करू लागले. रमेश आपल्या बायकोसोबत फॉरेन ट्रीप ला निघून गेला, दहा दिवसाची ट्रिप होती, रमेश आपल्या फॅमीली सोबत फॉरेन ट्रिपचा आनंद घेत होता. पण इकडे मात्र अशी परिस्थिती झाली की,

कुणीच असा विचार करू शकत नाही. कारण इकडे बाबांनी सगळा गेमच पलटून टाकला होता. त्यांचे जे साठ लाखाच घर होत व त्याच घरामध्ये रमेश ने त्यांना गॅरेजमध्ये ठेवलं होतं, ते घर त्यांनी अवघ्या तीस लाखांमध्ये विकून टाकल. मन तर त्यांचं उदास झालं होतंच, पण त्यांनी त्यांच्यासाठी नवीन घर घेतलं, व रमेशच सर्व सामान एका भाड्याच्या घरामध्ये नेऊन ठेवलं,

पण जेव्हा रमेश दहा दिवसानंतर ट्रिप करून परत आला, तेव्हा तो चकितच झाला, त्याने त्याच्या घराला कुलूप पाहिलं, आणि त्या घराच्या समोर एक गार्ड बसला होता. त्याला रमेशने विचारले की, तू इथे काय करत आहेस ? माझे वडील कुठे आहेत. त्यावरती तो म्हणाला की, वडील इथून निघून गेले, ते सांगून गेलेत की तुम्ही आल्यानंतर त्यांच्याशी फोनवरती जोडून दे. रमेश आणि त्याची कुटुंबियांना बेचैनी झाली.

त्या गार्डने तो नंबर डायल केला व फोन रमेश जवळ दिला. रमेश चे वडील बोलले तिथेच थांब मी पंधरा मिनिटात तुझ्या जवळ येतो, नंतर तुला सगळ्या गोष्टी समजावून सांगतो, थोड्याच वेळात तिथे एक कार आली, त्या कार मधून रमेशचे वडील उतरले, आणि रमेशच्या हातामध्ये किल्ली दिली, आणि त्याला सांगितलं तुझ्यासाठी भाड्याच्या घराची व्यवस्था केली आहे आणि,

एका वर्षाचा भाडं देखील मी भरल आहे, आता तुम्ही तिथे जा आणि राहा, तुम्हाला हवं तसं जगा, हवं तसं वागा. सर्वजण चकित होऊन म्हणाले काय ? भानावर येऊन रमेश म्हणाला की, पण बाबा तुम्ही कुठे राहणार आहात ? त्यावरती वडील म्हणाले, माझ्यासाठी मी एक सुंदर असे घर घेतलं आहे, मी तर खुश आहे, आता तुला कुठे राहायचं तिथं तू खुश रहा. ही गोष्ट उदाहरण खूप काही शिकवून जाते,

घरातील छोट्या गोष्टी मोठ्या होऊन वाद वाढतात व नात्यात दुरावा येतो. म्हणून आई वडिलांची सेवा करून त्यांच्या जवळच राहावे. मित्रांनो माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी जीवनशैली माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.