Alphamarathi.com

Super Fast Marathi News
दर 12 वर्षानेच कुंभमेळा का भरला ? कुंभमेळा संपल्यानंतर नागासाधू कुठे जातात.. एकदा पहाच..

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, सनातन ध’र्मामध्ये कुंभमेळ्याचे फार मोठे महत्त्व आहे. कुंभमेळा हा जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळा मानला जातो. बारा वर्षांनी एकदा हा मेळा भरविला जातो त्यावेळी वेग-वेगळ्या ठिकाणाहून भाविक येथे येऊन पवित्र नदीमध्ये स्नान करतात. परंतु हा कुंभमेळा बारा वर्षातून एकदाच का होतो हे आज आपण जाणून घेऊया. हा कुंभमेळा ज्या वर्षी भरणार असतो त्यावर्षी,

काही महिने अगोदरच याची तयारी सुरू होते. हा कुंभमेळा चार पवित्र नद्यांच्या काठी आयोजित केला जातो. उत्तराखंड मध्ये गंगा नदीच्या किनारी हरिद्वार येथे, मध्यप्रदेश मधील शिप्रा नदीच्या किनारी असलेले उज्जैन येथे, महाराष्ट्रामधील गोदावरी नदी च्या किनारी असलेले नाशिक येथे, उत्तर प्रदेश येथील गंगा, यमुना आणि सरस्वती या तीन नद्यांच्या संगमाच्या किनारी प्रयागराज येथे,

हा कुंभमेळा आयोजित केला जातो. जेव्हा बृहस्पति ग्रह कुंभ राशी मध्ये आणि सूर्य मेष राशीमध्ये प्रवेश करतो त्यावेळी महा कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. प्रयागराज येथील कुंभमेळ्याचे महत्त्व जास्त असल्याचे सांगितले जाते शिवाय या कुंभमेळ्याचा इतिहास 850 वर्ष जुना आहे. असे म्हटले जाते की, आदी शंकराचार्य यांनी या कुंभमेळ्याची सुरुवात केली होती.

काही पौराणिक कथा पाहता असे लक्षात येते की, या कुंभमेळ्याची सुरुवात समुद्रमंथनाच्या आधीपासून झाली आहे. देव आणि असुर यांनी मिळून समुद्रमंथन केले होते त्यावेळी त्यातून काही रत्ने बाहेर आली त्यामध्ये अमृत देखील होते. अमृत मिळवण्याच्या लालसेमुळे देवता आणि असुरांमध्ये संघर्ष सुरू झाला. या संघर्षाच्या वेळी अमृताच्या कलशातून काही थेंब पृथ्वीवर पडले ते थेंब जेथे पडले,

तेथे कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. अमृताचे थेंब प्रयागराज, नाशिक, हरिद्वार आणि उज्जैन येथे पडले होते, त्यानंतर दर बारा वर्षातून एकदा या ठिकाणी कुंभमेळा आयोजित केला जातो. पौराणिकथेनुसार चंद्राने असुरांपासून अमृत वाचवण्याचा प्रयत्न केला होता आणि ब्रुहस्पती गुरूंनी त्या कलाशाला लपवले होते. सूर्य देवाने कलशाला फुटण्या पासून वाचवले होते,

त्यानंतर शनि देवाने इंद्राच्या रागापासून त्या कलशाची रक्षा केली होती त्यामुळे ज्यावेळी ह्या ग्रहांचा सहयोग एका राशीमध्ये होतो त्यावेळी, महा कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. ह्या ग्रहांच्या मिलनामुळेच अमृत कलशाची रक्षा झाली होती त्यानंतर भगवान विष्णू यांच्या मदतीने बाकी देवतांनी अमृत ग्रहण केले. एवढेच नव्हे तर पृथ्वीवरील लोकांचे एक वर्ष म्हणजे देवतांच्या एका दिवसा एवढे असते.

असुर आणि देवतांचे युद्ध बारा वर्षे चालले होते त्यामुळे बारा वर्षातून एकदा हा कुंभमेळा भरविला जातो.  वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार गुरु एका राशी मध्ये एका वर्षापर्यंत राहतो आणि हे राशीचक्र बारा वर्ष चालते. जेव्हा ब्रुहस्पतिगृह कुंभ राशी मध्ये आणि सूर्य मेष राशी मध्ये असतो त्यावेळी हरिद्वार येथे कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. कुंभमेळ्याचे प्रकार :-

१) महा कुंभमेळा :- महा कुंभमेळा हा फक्त उत्तर प्रदेश मधील प्रयागराज येथे आयोजित केला जातो.  हा मेळा एकशे चौवेचाळीस वर्षानंतर किंवा बारा पूर्ण कुंभमेळ्यानंतर आयोजित केला जातो. २) पूर्ण कुंभमेळा :- हा कुंभमेळा दर बारा वर्षांनी एकदा आयोजित केला जातो. प्रयागराज, हरिद्वार, नाशिक आणि उज्जैन येथे हा कुंभमेळा दर बारा वर्षातून एकदा आयोजित केला जातो.

३) अर्ध कुंभमेळा :- अर्ध कुंभ याचा अर्थ अर्धा कुंभमेळा. हा कुंभमेळा देशातील दोन ठिकाणीच दर सहा वर्षांनी आयोजित केला जातो. हा कुंभमेळा हरिद्वार आणि प्रयागराज येथे आयोजित केला जातो. ४) कुंभमेळा :- हा कुंभमेळा चार मुख्य ठिकाणी आयोजित केला जातो त्यावेळी या ठिकाणी लाखोच्या संख्येने भाविक उपस्थित असतात.५) माघ कुंभमेळा :- ह्या कुंभमेळ्याला मिनी कुंभमेळा म्हणून देखील ओळखले जाते.

हा कुंभमेळा फक्त प्रयागराज येथेच आयोजित केला जातो. दिनदर्शिका नुसार हा कुंभमेळा मग महिन्यांमध्ये आयोजित केला जातो. या ठिकाणी देखील लाखोच्या संख्येने भावीक स्नान करण्यासाठी येतात. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.