असे भयानक होईल कलयुगाचा अंत.. पाहून तुम्हाला धक्काच बसेल..
नमस्कार मित्रांनो..
मित्रांनो, हजारो वर्षांपूर्वी भारतात सुकदेव याने ज्या प्रकारे कलियुगाचे वर्णन केले आहे, तेवढे आपल्याला कलियुगाचे ज्ञान मिळण्यासाठी पुरेसे आहे. त्याच वर्णनानुसार आज देखील घटना घडत आहेत आणि पुढे जे लिहिले आहे तसेच होईल असे मानले जाते. कलियुग म्हणजे काळेयुग, क्लेशाचे युग. सर्व लोकांमध्ये असंतोषाची भावना असेल आणि मानसिक असंतुलन असेल ते म्हणजे कलयुग.
या युगामध्ये ध’र्माचा फक्त एक चतुर्थांश भागच राहतो. कलियुगाचा प्रारंभ इसवी सन पूर्व एकतीसशे दोन मध्ये झाला होता. श्रीमद् भागवत पुराण आणि भविष्य पुराण यामध्ये कलियुगाच्या अंता विषयी विस्तारित माहिती मिळते. कलियुगामध्ये कलकीचा अवतार होईल, पापी लोकांचा नाश करून पुन्हा सत्य युगाची स्थापना केली जाईल.
कलियुगाचा अंत कधी होईल :- इसवी सन पूर्व एकतीसशे दोन मध्ये मंगळ, बुध, शुक्र, बृहस्पती आणि शनि हे पाच ग्रह मेष राशी मध्ये शून्य डिग्री मध्ये आले होते. तेव्हापासून कलियुगाचा प्रारंभ झाला. सध्या कलियुगाचे प्रथम चरण चालू आहे. पुराणा मध्ये कलियुगाचा अवधी किती आहे आणि कलियुग समाप्त कधी होणार यासं’बंधी विस्तारित वर्णन केले आहे.
कलियुगाचा अवधी बाराशे दिव्यवर्ष एवढा सांगितला आहे. मनुष्याचा एक महिना पितरांच्या एक दिवस रात्री एवढा असतो. मनुष्याचे एक वर्ष म्हणजे देवतांचे एक दिवस आणि रात्र एवढे असते. मनुष्याचे तीस वर्ष म्हणजे देवतांचे फक्त एक महिना एवढे असते. कलियुगाचा अवधी बाराशे दिव्य वर्ष एवढा सांगितला आहे. त्याप्रमाणे चार लाख बत्तीस हजार वर्ष कलियुग काळ राहील.
कलियुगाची पाच हजार एकशे अठरा वर्षे पूर्ण झाली आहेत. चार लाख सव्वीस हजार आठशे ब्यायशी वर्षे अजून बाकी आहेत. मनुष्याचे आठ लाख 84 हजार वर्ष देवतांच्या चोवीसशे दिव्य वर्षा एवढे असतात अर्थात एका द्वापार युगा एवढे असतात. त्रेतायुग छत्तीस शे दिव्य वर्षान एवढे असते त्याप्रमाणे मनुष्याचे बारा लाख 96 हजार वर्ष येतात.
कलियुग हे बाकी तीन युगांपेक्षा छोटे युग आहे. सत्ययुग 4800 दिव्य वर्ष एवढे असते. कलियुगाच्या अंताला काय होईल :- सर्वप्रथम तर माणसाचे आयुष्य वीस वर्षे राहील. पाचव्या वर्षीच स्त्रिया ग’र्भवती होतील. सोळा वर्षाचे मनुष्य वृद्ध होतील आणि विसाव्या वर्षी त्यांचा मृ-त्यू होईल. ब्रह्म वयवर्त पुराण यामध्ये सांगितलेले आहे की,
कलियुगामध्ये अशी एक वेळ येईल त्यामध्ये मनुष्याची आयु फारच कमी राहील. ज्यावेळी भगवान कलकी पृथ्वीवर अवतार घेतील त्यावेळी मनुष्याची आयु वीस किंवा तीस वर्षे तेवढी राहील. गौमाता सुद्धा आकाराने छोटी व बकरी एवढे कमी दूध देतील. मनुष्याचे अन्न :- कलयुगा मध्ये मनुष्याची अन्न दशा होईल, शेतामध्ये धान्य उगवणार नाही लोक मास, मच्छी खातील आणि बकरीचे दूध पितील.
एक वेळ अशी येईल की, शेतामध्ये धान्य उगवणार नाही शिवाय फळे देखील मिळणार नाहीत. हळूहळू या सर्व गोष्टी पृथ्वीवरून विलुप्त होतील. मनुष्याचा स्वभाव :- स्त्रिया कठोर स्वभावाच्या आणि कटू बोलणाऱ्या असतील. पतीची आज्ञा मानणार नाहीत. ज्या मनुष्याकडे धन असेल त्याच मनुष्याकडे स्त्रिया राहतील. ध’र्माचा लोप होईल. मनुष्य नास्तिक आणि चोर बनेल.
कलियुगामध्ये समाज हिं’सक होईल, सर्वजण एकमेकांना लु’टण्याचा विचार करतील. जे लोक बोलवा असतील त्यांची सत्ता चालेल. मानवता नष्ट होईल. महाप्रलय :- कलयुगाच्या अंताला मुसळधार पाऊस पडेल, चारही बाजूला पाणी भरेल. त्यानंतर एकाच वेळी बारा सूर्यांचा उदय होईल. कलियुगाच्या शेवटी फार मोठे तुफान आणि भूकंप येईल. महाभारतामध्ये सुद्धा कलियुगाच्या अंताचे वर्णन आहे.
महाभारताप्रमाणे कलियुगाचा अंत हा अति उष्णतेने होणार असल्याचे सांगितले आहे. त्यानंतर सतत बारा वर्षे पाऊस पडेल आणि त्यातून नवजीवन निर्माण होईल. टीप :- मित्रांनो वर दिलेली माहिती ही सर्वसामान्य धार्मिक माहितीच्या आधारे देण्यात आलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. तरी तसा कोणीही गैरसमज करून घेऊ नये.
मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.