प्रियकर 5 वर्षांनी लग्नानंतर प्रियेसीचा घरी भाड्याने रहायला आला.. पण नवरा नसल्यावर त्यांच्यामध्ये जे हळूहळू घडू लागले.. पुढे बघा काय घडले
नमस्कार मित्रांनो..
अतुल आणी जयश्री हे कॉलेज फ्रेंड होते पण कॉलेज संपल्यावर दोघेही वेगळे झाले. जयश्रीचे लग्न झाले आणी अतुल नोकरीसाठी धावाधाव करू लागला. चार-पाच वर्षाच्या बेरोजगारी नंतर शेवटी त्याला मुंबईत नोकरी मिळाली. पण हा मुळचा रत्नागिरीचा असल्यामुळे तिथे कोणी ओळखीचे नव्हतेच. पण मुंबईत गेल्यावर त्याला कळले की इथेच कोठेतरी जयश्रीचे सासर आहे. काही दिवस राहण्याची सोय होईल म्हणून,
त्याने जयश्रीचा पत्ता शोधून काढला. घरात प्रवेश करताच त्याला समोर जयश्री दिसली. जयश्रीचा रिकामा गळा आणी मोकळे कपाळ त्याच्या मनात काहूर निर्माण करून गेलं. अतुलला पाहून जयश्रीला देखील आश्चर्य वाटले पण थोड्या वेळेच्या शांतते नंतर त्याने जयश्रीला तिच्या बद्दल विचारल – ती म्हणाली आमच्या लग्नानंतर च्या तीन वर्षात एका अप’घातात ते गेले.
तिच्या या स्पष्टीकरणानंतर काय बोलावं हेच कळत नव्हत त्याला. शेवटी धीर देण्यापलीकडे तो काहीच करू शकत नव्हता. त्याने आपल्याला इथे नोकरी मिळाल्याची बातमी तीला सांगितली. हे ऐकून तीला आनंद झाला. पण जागेची अडचण आहे हे कळल्यावर तीच त्याला म्हणाली – तु इथेच रहा ना थोडे दिवस. म्हणजे मलाही सोबतच होईल,
पण तो म्हणाला अग पण तुझे मिस्टर नाहीत ना आता. त्यामुळे लोक उगच गैरसमज करून घेतील. त्यामुळे नको. अरे लोकांना हजार तोंड असतात पण सत्य तर एकच असते ना, त्यामुळे तु इथे बिनधास्त रहा मी लोकांची पर्वा करत नाही. त्यानंतर ते दोघे एकत्रच राहू लागले. दोघांचेही कामाची वेळ सेम असल्याने ते दोघे एकत्रच जेवण करू लागले.
सोबत वेळ घालवू लागले. कंटाळवान आयुष्य जगणाऱ्या जयश्रीच्या जीवनात रंग चढू लागले. एकमेकांसोबत म’स्ती करताना त्यांना कॉलेजचे दिवस परत आल्याचे भासू लागले. अतुलला सकाळी उठायला उशीर व्हायचा म्हणून जयश्री टेबल वर त्याच्यासाठी नाष्टा ठेवून जायची. हळूहळू त्या दोघांना एकमेकांची सवय झाली, लोक त्यांच्याविषयी काय-काय बोलायचे पण त्यांनी कधी लक्षच दिल नाही.
अतुल हळूहळू जयश्रीच्या प्रेमात पडला होता. शेवटी त्याने एके दिवशी त्याच्या मनातील गोष्ट तीला बोलून दाखवली. ती त्याच्यावर लगेच भडकली अरे मी तुला एक चांगला मित्र मानत होते. पण तु असे बोलून आपल्या मैत्रीला कलंक लावला आहेस. एका विवाहित स्त्रीला असे विचारणे तुला शोभत का अतुल. आग पण तुझा नवरा या जगात नाहीय आणी तसही आपण एकमेकांना चांगली साथ देवू आयुष्यभर.
पण हे मला मंजूर नाहीय, मी माझ्या नवऱ्यावर अजूनही खूप प्रेम करते. आणी मी त्याला विसरू शकत नाही. ठीक आहे तुझी जी इच्छा आहे ती मला मान्य आहे असे बोलून तो झोपी गेला. सकाळी लवकर उठून ती त्याच्यासाठी नाष्टा टेबलवर ठेवून गेली. पण नंतर दुपारी ती जेवायला घरी आली त्यावेळी तो नाष्टा तसाच होता आणी तिथे एक चिट्टी होती,
त्यामध्ये आत्तापर्यंत दिलेल्या आधाराबद्दल जयाश्रीचे आभार मानले होते. तीने आतून जिथे काम करत होता तिथे चौकशी केली पण असे समजले की, अतुल राजीनामा देवून काम सोडून गेला आहे. दिवसांमागून दिवस जात होते तस-तसे अतुलच्या नसण्याची जाणीव तीला होऊ लागली. जेवताना त्याच्यासोबत केलेली म’स्ती, एकमेकांसोबत केलेले छोटेमोठे वाद तीला आठवू लागले.
हळूहळू तीला त्याच्याशिवाय राहण कठीण होत गेल. त्याची आठवण सतावू लागली सर्व गोष्टी समोर असायच्या पण मन सैरभैर असायचं, कशातच लक्ष लागनासे झाले. तीने तिची ही स्थिती तिच्या मैत्रीनेला सांगितली. तिच्या मैत्रिणीने सांगितले की तुझे प्रेम जडलय त्याच्यावर जर खरेच या परिस्थितीतून बाहेर यायचे असेल तर अतुलशी टू लग्न करून टाक, तसंही तु या समा’जाला जुमानत नाहीस.
त्यामुळे त्यांची अजिबात पर्वा न करता एकदा अतुलशी बोलावस तिचे म्हणणे जयश्रीला पटले. दिवसभराची रजा टाकून ती रत्नागिरीला अतुलच्या घरी गेली. तिथे त्याची म्हातारी आई होती. याआधीही ती आईला भेटली असल्याने त्यांची ओळख होतीच. अतुल विषयी आईला विचारताच त्या म्हणाल्या – तो सकाळ पासून बाहेरच आहे कुठे गेलाय ते नाही माहित.
हळू हळू वेळ पुढे सरकत होती जयश्री त्याची वाट पाहत होती पण अतुल अजून आला नव्हता. शेवटी वैतागून तीने आईचा निरोप घेतला आणी ती मुंबईच्या गाडीत बसली. गाडी चालू झाली त्याला भेटण्याची आस थांबत नव्हती गाडीतून जाताना शेवटी तीला तिचं कॉलेज दिसल, जुन्या आठवणी ताज्या झाल्या, गाडी थांबवून ती थोडा वेळ उतरली कॉलेज चे गेट, क्लास हे बघून आपण केलेला दं’गा,
मागे बसून मैत्रिणीच्या काढलेल्या खोड्या, कॉलेजचे क्लास चुकवून कॅन्टीन मध्ये घालवलेला वेळ अशा गोष्टी आठवू लागल्या. तसेच ती पुढे पुढे सरकत गेली त्यावेळी तीला क्लासचा दरवाजा उघडा असलेला दिसला तीला जाणवू लागले की आतमध्ये कोणीतरी असेल तशी ती लगेच आत गेली. खिडकीतून सुसाट येणाऱ्या वाऱ्याने एका बेंचवरून ठेवलेली एक नोटबुक जिची पाने आपोआप पलटत होती,
तीने ती खिडकीची दारे बंद केली आणी ती नोटबुक आपल्या हाती घेतली, जेव्हा तीने पहिले की यात लिहलेली कविता कुठेतरी वाचली आहे तेव्हा तिच्या लक्षात आले की ही कविता अतुलनेच लिहली होती. जेव्हा कॉलेजचा शेवटचा दिवस होता त्याचवेळी ही कविता सर्वांसमोर वाचली होती. त्यावेळी तिच्या लक्षात आले की अतुल इथेच कुठेतरी आहे.
ती त्याला सगळीकडे शोधू लागली पण तो कुठे सापडत नव्हता. शेवटी ती टेरेसवर त्याचा शोध घेत गेली. अतुल टेरेसच्या कडांवर दोन हात टेकून येणाऱ्या हवेची झुळूक अनुभवत होता त्याला पाहताच तिच्या डोळ्यातले अश्रू थांबले नाहीत आणी आनंदाच्या भरात तीने पळत जावून अतुलला मागून मि’ठी मा’रली. तो म्हणाला आलीस तु.. किती वाट पहिली तुझी मला माहित होत माझ तुझ्यावर नितांत प्रेम तुला इथे येण्यास भाग पाडेल. काय जादू आहे या प्रेमात.. आता नाही ना सोडून जाणार मला..
मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.