पद्मनाभ स्वामी मंदिरातून बाहेर आला हा भयंकर नाग.. पाहून वैज्ञानिक सुद्धा पळून गेले.. बघा आतमध्ये काय आहे..
नमस्कार मित्रांनो..
मित्रांनो, केरळचे पद्मनाभ स्वामी मंदिर यासाठी प्रसिद्ध आहे की- या मंदिराच्या एका कक्षामध्ये भरपूर सोने बंद करून ठेवले आहे ज्याची रक्षा स्वतः नागराज करतात. या गुप्त खजान्याची कहाणी भारतातील नव्हे तर भारताबाहेरील संशोधकांच्या मनात कुतूहल जागृत करते. पद्मनाभ स्वामी मंदिर सहाव्या शतकातील मंदिर मानले जाते. याच्या गाभाऱ्यात भगवान विष्णू शैन मुद्रेत विराजमान आहेत.
आज आपण पद्मनाभ स्वामी मंदिर मधील काही रहस्य जाणून घेणार आहोत ज्याने तुम्ही आश्चर्य चकित व्हाल. इ.स १७३३ मध्ये त्रावणकोर राजा मार्तंड याने मंदिराचा पुनर्निर्माण केला होता. मंदिरातील खजान्याचे मूल्य पाच लाख करोड आहे असे मानले जाते. परंतु या मध्ये सातव्या दरवाजा मधील खजाना मोजलेला नाही आहे, कारण हा दरवाजा अद्याप उघडला गेला नाही.
या दरवाजाच्या मागे अजूनही सोने असू शकते असे म्हटले जाते. या दरवाजाच्या मागे सोन्या व्यतिरिक्त देखील अजून अनमोल गोष्टी असू शकतात असे म्हटले जाते. एवढे सोने मंदिरात कसे आले हा प्रश्न प्रत्येकालाच पडलेला आहे. या संपत्ती मध्ये विदेशी संपत्ती देखील आहे. विदेशी व्यापारी ज्यावेळी या मंदिरात येत त्यावेळी या मंदिरामध्ये काही ना काही दान करून जात.
संपत्ती मध्ये नेपोलियन काळातील नाणी देखील मिळाली आहेत. या शिवाय हत्तीच्या मूर्ती, बंदुका, फ्रान्स आणि टच यांच्याकडील सोन्याच्या नाणी अश्या बऱ्याचशा अनमोल वस्तू मिळाल्या आहेत. संपत्ती मध्ये अशी एक बॅग मिळाली होती जिथे वजन जवळपास तीस किलो होते आणि यामध्ये वेग-वेगळ्या सात देशातील नाणी होती.
सन दोन हजार अकरा मध्ये जेव्हा या मंदिराचे दरवाजे उघडले गेले होते या खजाण्याची मोजणी करण्यासाठी आधुनिक यंत्रांची मदत घेतली होती. उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे सन 2011 मध्ये या मंदिराचे पाच गुप्त दरवाजे उघडले गेले होते जे कित्येक वर्षापासून बंद होते. प्रत्येक दरवाज्याच्या आत सोने आणि चांदीने भरलेले साहित्य मिळाले होते.
संशोधकांनी टीम जेव्हा शेवटच्या दरवाजाकडे गेली त्यावेळी त्यांनी पाहिले की तो दरवाजा आधुनिक पद्धतीने उघडता येणारा नाही. या दरवाजाला चेंबर बी असे नाव देण्यात आले. हा दरवाजा उघडण्यासाठी कोणताच पर्याय नाही कारण या दरवाजाला कुलूप नाही. नाग बंधन मंत्राचा वापर करून ज्ञानी पुरुषाने हा दरवाजा बंद केला आहे असे म्हटले जाते.
हा दरवाजा उघडण्यासाठी एक असा व्यक्ती पाहिजे जो व्यक्ती या जगात असण्याचीच संभावना नाही आहे. सन 1930 मध्ये पद्मनाभ मंदिरामध्ये मोठी रोचक घटना घडली होती. काही विदेशी ट्रेडर हंटर हे या सातव्या दरवाजापर्यंत पोहोचले होते. त्यांनी या दरवाजाला उघडण्याचा सर्व बाजूंनी प्रयत्न केला परंतु त्यांना यश आले नाही. प्रत्यक्ष दर्शी लोक असे सांगतात की,
या लोकांना खूप सार्या वि’षारी सापाने घेरले होते, हे लोक कसेबसे आपला जीव वाचवून तिथून पळून गेले. या साऱ्या संपत्तीचे रक्षण नागदेव का करतात याचे उत्तर तिरुअनंतपुरम या नावामध्ये लपले आहे. अनंत हे नागाचे नाव आहे. चेंबर बी या दरवाजावरती स्पष्टपणे असे लिहिले आहे की, जर कोणी या दरवाजाला उघडण्याचा प्रयत्न करेल तर याचे परिणाम फार गंभीर स्वरूपात पाहायला मिळतील. या मंदिराचा इतिहास फार जुना व रहस्यमय आहे.
मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.