कपालिका साधूंचे रहस्य ऐकून तुम्ही देखील हैराण व्हाल.. बघा यांचे जीवन कसे असते..
नमस्कार मित्रांनो..
मित्रांनो, सन्यासी, तपस्वी लोकांची पुजेची पद्धत आणि उपासना करण्याची पद्धत ही वेगवेगळी असते. कपालिका सांप्रदाय म्हणून एक संप्रदाय आहे हे लोक बाकी लोकांमध्ये मिसळून राहत नाहीत. त्यांचे आयुष्य भयानक व रहस्यमय असते. तुम्ही ऐकले असेलच की, कपालिका साधू कवटीतून पाणी पितात, एवढेच नाही तर ते या कवटीचा उपयोग थाळी म्हणून सुद्धा करतात,
आणि त्यामध्ये जेवण करतात. आज आपण कपालिका साधूंचे जीवन पाहणार आहोत हे जीवन पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. देवाची श्रद्धा आणि भक्ती मिळवण्यासाठी लोक खूप काही करतात. याचेच एक मोठे उदाहरण आहे ते म्हणजे कपालिका साधू. कपालिका साधू भगवान शंकरांवरती खूप मोठी श्रद्धा ठेवतात. ज्याप्रमाणे भगवान शंकर हे स्मशानभूमीत राहतात,
तिथली राख भस्म स्वरूपात लावतात, मोहमाया यापासून दूर असतात त्याचप्रमाणे कपालिका साधू सुद्धा याच प्रकारचे जीवन जगत असतात. कपालिका हे नाव कसे मिळाले यासाठी अनेक आख्यायिका प्रचलित आहेत. जो जीवन आणि मृत्यूचा मोह याचा त्याग करून समाजाच्या कल्याणासाठी जो निघून जातो तोच खरा कपालिका आहे असे म्हटले जाते.
या लोकांची खास ओळख अशी आहे की, हे लोक आपल्या जवळ नेहमी नर मुंडण म्हणजेच माणसाचे डोके ठेवतात. माणसाचे डोके म्हणजेच कपाळ आपल्याजवळ ठेवतात म्हणूनच यांना कपालिका असे म्हटले जाते. कपालिका साधूंसाठी माणसाचे डोके म्हणजेच त्यांचे भांडे असते याचाच वापर खाण्या पिण्यासाठी करत असतात. मनुष्याची कवटी वापरण्यामागचे हेच मुख्य कारण आहे की,
हे लोक नेहमी स्वतःला हे समजत असतात की एक दिवस आपली सुद्धा अशीच वेळ येणार आहे त्यामुळे मोहमाया पासून दूर राहून समाज हिताचे कार्य केले पाहिजे. पुराणांमध्ये लिहिलेल्या गोष्टींवरून असे दिसून येते की, हे लोक तांत्रिक असतात. तंत्र मंत्र याच्या सहाय्याने हे लोक आपल्या मुक्तीसाठी उपाय शोधत असतात. “कपालीका चक्र साधना” ही या कपालिका संप्रदायाची मुख्य साधना आहे असे म्हटले जाते.
स्त्री साधिकेच्या सहयोगाने ही तंत्र साधना केली जाते. यामध्ये साधकाला भैरव आणि साधीकेला त्रिपूसुंदरी असे म्हटले जाते. या साधिकेला भैरव पत्नीच्या रूपात स्वीकारतो. या साधनेला भोगविलास करण्याचे मध्यम आहे असे मानले जाऊ लागले यासाठीच अनेक साधूनी ही साधना केली आहे. आदी शंकराचार्य यांनी कपालिका साधूंच्या या साधने बाबत व अनैतिक आचरणाबाबत अनेकदा विरोध दर्शविला होता. \
त्यानंतर हे साधू तिब्बत व नेपाळ अशा वेग-वेगळ्या क्षेत्रात जाऊन साधना करू लागले. आज देखील हे साधू वेग-वेगळ्या मठांमध्ये गुप्त रीतीने तंत्र साधना करत आहेत. कपालीक संप्रदायाचे साधू आपल्या साधना व सिद्धी साठी महाकाली, भैरवी, चांडली, चामुंडा, शिव आणि त्रिपुरा सारख्या देवी देवतांची साधना करतात. यामधीलच बुद्ध कपालिक लोक वज्रभैरव, महाकाल या देवी देवतांची साधना करतात.
पुराणांमध्ये कापलिका संप्रदाय सुरू करणाऱ्या लोकांमध्ये कुबेर आणि धनद यांचे नाव येते. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.