सं-भोग करत असताना कोणाला जास्त आनंद मिळतो.. स्त्री की पुरुष.? प्रत्येकाला हे माहित असायलाच पाहिजे.. पहा
मित्रांनो, महाभारतामध्ये वर्णन केलेल्या एका कथेनुसार एकदा पांडू पुत्र युधिष्ठिर पितामह भीष्मांकडे गेला. त्यांना नमस्कार केला तेव्हा पितामह भीष्मांनी त्याला आशीर्वाद देताना त्याच्याकडे पाहून म्हटले, ”वत्सा तू फार चिंतेत दिसतोयस काही सम’स्या असतील तर सांग”. तेव्हा युधिष्ठिर म्हणाला, “पितामह मी एका कोड्यात पडलो आहे ते सोडवण्यासाठी तुम्ही माझी मदत करू शकाल का?”.
हे ऐकून भीष्म पितामह बोलले, “की बाळा तू कोणत्या कोड्यात पडला आहेस ते आधी मला सांग त्यानंतर मी ते सोडवण्याचा प्रयत्न करेन” हे ऐकून युधिष्ठिर म्हणाला, “पितामह कित्येक दिवसापासून मला या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही आहे की, सं-भोग करताना स्त्री किंवा पुरुष यापैकी सर्वात जास्त आनंद कोणाला मिळतो.?” तेव्हा पितामह भीष्मांनी युधिष्ठिर ला सांगितले बाळा ये माझ्या बाजूला येऊन बस मी तुला याबद्दलची भंगस्वाना आणि सकरा या दोघांची एक गोष्ट सांगणार आहे.
युधिष्ठिर भीष्म पितामहांच्या बाजूला जाऊन बसला त्यानंतर भीष्म म्हणाले हे ध’र्मराज फार फार वर्षांपूर्वी भंगस्वाना नावाचा एक राजा होता त्याची न्यायप्रियता पाहून राज्यातील सर्व प्रजा आनंदात राहात असे. परंतु दुर्दैवाने त्याला एकही मूल नव्हते एके दिवशी पुत्र प्राप्तीची इच्छा मनात ठेवून राजा भंगस्वनाने एका यज्ञाचे आयोजन केले. यज्ञाचे नाव “अग्निषटुता” असे होते कारण त्या यज्ञामध्ये केवळ अग्नीदेवाचाच आदर आणि आराधना केली जात होती. हे पाहून देवराज इंद्र नाराज झाले आणि राजा भंगस्वनावर आपला राग काढण्याची संधी शोधू लागले.
बराच वेळ राजा भंगस्वानाकडून यज्ञात काही चूक झाली नाही. देवराज इंद्रांचा संताप अजून वाढला खूप दिवसानंतर एके दिवशी जेव्हा राजा भंगस्वाना शिकारीसाठी निघाले. तेव्हा देवराज इंद्रांनी असा विचार केला की, आपल्या अपमानाचा बदला घेण्याची हीच योग्य वेळ आहे. जेव्हा राजा भंगस्वाना जंगलामध्ये पोहोचले तेव्हा इंद्राने त्यांच्यावर संमोहन मंत्र सोडले त्यामुळे राजाचे भान हरपले. तो जंगलात इकडे तिकडे भटकू लागला. संवेदना गमावल्यामुळे राजाला दिशा समजत नव्हत्या आणि त्याचे सैनिकही दिसत नव्हते.
अशाप्रकारे राजा भंगस्वाना थोड्याच वेळात आपल्या सैनिकांपासून खूप दूर निघून गेला. आता राजाला खूप तहान लागली होती. त्याला एक छोटीशी नदी दिसते. ती खूपच सुंदर दिसत होती नदीकडे पाहून राजा तिच्या दिशेने गेला आणि पहिला त्याने आपल्या घोड्याला पाणी पाजलं आणि स्वतः पाणी पिण्यासाठी नदीत उतरला. परंतु राजा पाण्यामध्ये उतरताच त्याचे शरीर हळूहळू बदलू लागले आणि थोड्याच वेळात राजाचे एका स्त्रीमध्ये रूपांतर झाले स्वतःमध्ये झालेले हे बदल पाहून राजा भंगस्वानाला खूप लाज वाटू लागली.
तो जोर जोरात रडू लागला. त्याला हे कळतच नव्हते की, त्याला कुठल्या कर्माची एवढी मोठी शिक्षा मिळाली ? भंगस्वना मनातल्या मनात देवाला सांगू लागला की, हे प्रभू तुम्ही हे दुर्दैव का केले, आता हे रूप घेऊन मी माझ्या राज्यात कसा जाऊ.? आता काही दिवसांपूर्वीच मला अग्निशटता यज्ञामुळे शंभर पुत्रांची प्राप्ती झाली आहे. त्या सर्वांना मी काय सांगेन आणि राजवाड्यात माझी राणी वाट पाहत असेल तिच्यासमोर मी या रूपात कसा जाऊ, हे देवा तुम्ही तर माझ्याकडून माझ्या राजवाड्यासह माझे पुरुषत्व सुद्धा काढून घेतले.
आता माझ्या प्रजेचे काय होईल बराच वेळ शोक केल्यानंतर राजा आपल्या राज्यात परतला. राजाभंगस्वानाने जेव्हा स्त्रीच्या वेशात आपल्या राज्यात प्रवेश केला. तेव्हा सर्व लोक त्याला पाहून आश्चर्यचकित झाले. त्याने राजवाड्यात पोहोचल्यानंतर आपल्या सर्व सभासदांची सभा बोलावली आणि त्याने आपल्या मुलांना आणि मंत्र्यांना असे सांगितले की, मी आता हे राज्य चालवण्यास योग्य नाही. आता तुम्ही सर्व लोक मिळवून हे राज्य चालवा आणि हे ध्यानात ठेवा की माझ्या अनुपस्थितीमध्ये माझ्या प्रजेला कोणताही त्रास होणार नाही.
मी माझे उर्वरित आयुष्य जंगलात घालवीन एवढे सांगितल्यानंतर राजा भंगस्वाना आपल्या राणीला जाऊन भेटला आणि त्यानंतर तो जंगलाच्या दिशेने निघाला जंगलात गेल्यानंतर स्त्रीच्या वेशात असणारा तो राजा एका ऋषीच्या आश्रमात राहू लागला. त्यानंतर काही वर्षानंतर राजाने त्या ऋषीच्या अनेक पुत्रांना ज-न्म दिला आणि जेव्हा ते मोठे झाले तेव्हा राजा भंगस्वाना त्यांना आपल्या राज्यात घेऊन गेला इथे पोहोचल्यानंतर त्यांनी आपल्या आधीच्या मुलांना असे सांगितले की, जेव्हा मी पुरुष होतो तेव्हा तुम्ही सर्व माझे पुत्र होता.
त्याचप्रमाणे आता मी स्त्री असताना हे सर्व माझे पुत्र आहेत. घ्या तुमच्या भावांना सांभाळा त्यानंतर राजा भंगस्वानाचे सर्व पुत्र मिळून राहू लागले. राजा भंगस्वाना एवढा अपमानित होऊन देखील आपल्या पुत्रांसोबत आनंदाने राहत आहे हे जेव्हा देवराज इंद्राने पाहिले तेव्हा त्यांचा संताप अजून वाढला आणि मग त्यांच्या मनात सूडाची भावना जागृत झाली. देवराज इंद्र विचार करू लागले की,
मी या राजाचे पुरुषापासून स्त्रीमध्ये रूपांतर करून चूक तर नाही केली ? इंद्राने एका ब्रा’ह्मणाचे रूप धारण केले आणि राजा भंगास्वानाच्या महालात पोहोचले राजवाड्यात पोहोचल्यावर देवराज इंद्र भावांमध्ये फूट पाडण्याच्या उद्देशाने त्यांचे कान भरू लागले. काही दिवसातच इंद्राची ही योजना सफल झाली आणि राजाभंगस्मानाचे सर्व पुत्र आपापसातच ल’ढाई करू लागले. बघता बघता सर्वांनी एकमेकांना मा’रून टाकले राजा भंगस्वानाला ही गोष्ट कळताच तो शोकाकुल झाला, पुत्रशोकाने खूप जोर जोरात रडू लागला.
तेव्हाच ब्रा’ह्मणाच्या विषयांमध्ये इंद्रदेव राजाकडे पोहोचले आणि त्याला विचारले मुली तू का रडतेस? तेव्हा भंगस्वानाने रडत रडत देवराज इंद्र रुपी ब्रा’ह्मणाला सर्व हकीकत सांगितली. तेव्हा देवराज इंद्राने आपले खरे रूप दाखवून राजाला त्याच्या चुकीबद्दल सांगितले. इंद्र म्हणाले हे राजा तू यज्ञामध्ये फक्त अग्नी देवाची पूजा केलीस आणि माझा अपमान केलास म्हणून मी तुझ्यासोबत हे सर्व केले आहे. देवराज इंद्रांच्या तोंडून हे सर्व ऐकताच भंगस्वानाने त्यांचे चरण पकडले आणि म्हणाला हे देवेंद्र नकळतच माझ्यातून खूप मोठा अपराध झाला आहे.
कृपा करून मला क्षमा करावी. हे पाहून इंद्राला दया आली आणि त्यांनी राजाला वरदान देत म्हणाले हे स्त्री रुपी राजा तू आपल्या पुत्रांमध्ये कुठल्याही एका पुत्राला जि’वंत करू शकतोस तेव्हा भंगस्वांना म्हणाला हे देवेंद्र जर असेच असेल तर, मी माझ्या स्त्री रूपामध्ये ज्या पुत्रांना ज-न्म दिला आहे त्यामधील एका पुत्राला जि’वंत करा हे ऐकून देवराज इंद्र आश्चर्यचकित झाले आणि त्यांनी राजाला याचे कारण विचारले. तेव्हा राजाभंग स्वामी म्हणाला हे देवेंद्र स्त्रीचे प्रेम हे कोणत्याही पुरुषाच्या प्रेमापेक्षा जास्तच असते.
म्हणूनच मी माझ्या पोटी ज’न्म घेतलेल्या पुत्राचे जीवनदान मागते. राजा भंगस्वानाचे बोलणे ऐकुन देवराज इंद्र प्रसन्न झाले आणि त्यांनी राजाच्या सर्व पुत्रांना जीवनदान दिले. त्यानंतर त्याने राजा भंगस्वानाला पुरुषाच्या रूपामध्ये रूपांतर होण्याचे वरदान दिले परंतु स्त्रीरुपी राजा भंगस्वानाने इंद्राला सांगितले मी हे देवराज मी माझ्या स्त्रीरूपामध्येच खूप आनंदी आहे आणि आयुष्यभर स्त्री म्हणूनच जगण्याची माझी इच्छा आहे. हे ऐकून इंद्राने त्याला विचारले की हे राजा तू पुरुष होऊन आपले राज्य आणि राजवाडा सांभाळणार नाही आहेस का ?
तेव्हा भंगस्वाना नाही म्हणाले कारण सं-भोगाच्या वेळी स्त्रीला पुरुषापेक्षा अनेक पटीने आनंद मिळतो आणि म्हणूनच मी स्त्रीच्या रूपातच राहीन हे ऐकून देवराज इंद्र तथास्तु म्हणाले आणि तिथून गायब झाले. अशाप्रकारे कथेची समाप्ती झाल्यानंतर भीष्मपितामहानी युधिष्ठिरला सांगितले की, हे पुत्रा आता तर तुला समजलेच असेल की सं-भोगाच्या वेळी स्त्रीला पुरुषापेक्षा जास्त आनंद मिळतो.