Alphamarathi.com

Super Fast Marathi News
एक वे-श्या कशी बनली गण्डकी नदी.. जाणून घ्या वे’श्या आणि भगवान शालिग्राम ची कथा.. तेव्हा काय घडले होते बघा..

मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहीत असेलच की श्रीहरी विष्णूंचे एक रूप “शालिग्राम” म्हणूनही ओळखले जाते. पण तुम्हाला हे माहित आहे का? भगवान विष्णूचे हे शालिग्राम रूपी दगड गण्डकी नदीत का आढळतो? नदीतील शालिग्राम दगडाचा शोध एका वे’श्येच्या कथेशी सं’बंधित आहे. नर्मदा नदीत सापडणाऱ्या प्रत्येक दगडाला शिवाचे रूप मानून नर्मदेश्वर म्हणतात.

त्याचप्रमाणे गण्डकी नदी मधील प्रत्येक दगड हा शालिग्राम असतो. असे मानले जाते की, या नदीत स्वतः भगवान शालिग्राम पूजनीय आहेत आणि त्यांचे आवाहन करावे लागत नाही. पौराणिक कथेच्या अनुसार हजारो वर्षांपूर्वी एक वे’श्या होती तिचे नाव “गण्डकी” असे होते. ही वे’श्या रोज रात्री एका पुरुषासोबत ऐषआराम करत असे आणि त्याच्याकडून पैसेही घेत असे. गण्डकी ला हे काम करताना बराच वेळ झाला होता आणि एके दिवशी एक महान पुरुष जिथे गण्डकी राहत असे त्या गावात आला.

तिथे पोहोचल्यानंतर त्या महापुरुषाने गावातील काही लोकांचे खूप भले केले ते सर्व पाहून गण्डकी त्या महापुरुषांकडे गेली आणि म्हणाली महाराज तुम्ही तर संत आहात, तुम्ही सर्वांचे कल्याण करता म्हणूनच माझ्यासारख्या वे-श्येचे सुद्धा कल्याण करा. गण्डकीचे हे बोलणे ऐकून महात्माजी म्हणाले, मी तुझे कल्याण करीन पण त्यासाठी तुला वे’श्यावृत्ति सोडावी लागेल. महात्माजींचे बोलणे एकूण गण्डकी म्हणाली गुरुदेव मी सर्व काही सोडू शकते परंतु माझ्या शरीराला विकणे सोडू शकत नाही, कारण मला आता या गोष्टीची सवय झाली आहे.

हे सोडून तुम्ही मला जे काही करायला सांगाल ते सर्व करायला मी तयार आहे. गुरुजींनी सांगितले की, आतापासून तुझ्याकडे जो कोणी पुरुष येईल त्याला आपला पती परमेश्वर मानून त्याची सेवा कर तुझा उद्धार होईल वे-श्या म्हणाली ठीक आहे गुरुजी आतापासून मी असेच करेन. त्या दिवशीचा सूर्य मावळल्यानंतर वे-श्येकडे जो कोणी पुरुष आला की त्याला ती आपला पती मानून त्याची सेवा करायची, त्याचा आदर करायची, चांगले चांगले खाऊ घालायची आणि त्यांचे पाय सुद्धा दाबत असे,

एवढेच नव्हे तर सूर्यास्तानंतर जो कोणी पुरुष तिच्याकडे यायचा ती त्याला परमेश्वर मानत असे अशा प्रकारे तिने महात्माजींनी सांगितलेल्या गोष्टींचे पालन केले. वैकुंठत बसून भगवान श्रीहरी विष्णू हे सर्व पाहत होते. बरेच दिवस गेले तेव्हा त्यांनी विचार केला की, या वेश्येची म्हणजेच गण्डकी ची परीक्षा का घेऊ नये? त्यानंतर एके दिवशी जेव्हा सूर्यस्त झाला तेव्हा श्रीहरी विष्णू एका पुरुषाच्या वेशात त्या वे-श्येच्या घरी आले. जेव्हा श्रीहरी विष्णू तिथे पोहोचले तेव्हा त्या वे-श्येने इतर पुरुषांप्रमाणेच त्यांचे चरण धुतले, त्यांना चांगले भोजन दिले,

पाणी पाजले आणि त्यांचे पाय दाबले हे सर्व पाहून भगवान खूप प्रसन्न झाले. त्यानंतर भगवान त्या वे-श्ये सोबत झोपी गेले. पहाटे चार वाजता त्यांनी गण्डकीला उठवले आणि तिला म्हणाले मला तीव्र डोकेदुखी होत आहे. पुरुषोत्ते भगवान श्रीहरी विष्णूंचे ही हालत पाहून गण्डकी म्हणाली थोडा वेळ थांबा मी वैद्यांना बोलावते तेव्हा भगवान म्हणाले नको, तू कुठेच नको जाऊ मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. मग देवाला एवढ्या तीव्र वेदना होऊ लागल्या की, बघता बघता त्यांना आपले प्राण गमावाले. श्रीहरी विष्णूंनी म’रण्याचे नाटक केले.

श्रीहरी विष्णूंना मेलेल्या अवस्थेत पाहून गण्डकीने विचार केला की हा तर माझा पती होता. आता माझा नवरा मेला म्हणून मला सती जावे लागेल. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा गावातील लोकांना समजले की, गण्डकी या वे-श्येच्या घरात एक पुरुष मेला आहे तेव्हा गावातील लोक तिच्या घरी पोहोचले. त्यांनी बांबूची तिरडी तयार केली त्या पुरुषाचा मृ’तदेह तिरडीवर झोपवला. त्यानंतर गावातील लोक तिरडी स्मशानात घेऊन जायला निघाले. ही वे-श्या सुद्धा त्या सर्वांच्या मागून नटून थटून १६ शृंगार करून निघाली.

हे पाहून गावाने विचारले गण्डकी तू एवढी नटून-थटून कुठे चालली आहेस? ते ऐकून वे-श्या म्हणाली मी यांना नवरा मानले होते, आता यांचा मृ-त्यू झाला आहे म्हणून मी सुद्धा यांच्यासोबत सती व्हायला जात आहे. हे ऐकून गाववाले हसू लागले. गण्डकीवर गाववाल्यांच्या हसण्याचा काहीच परिणाम झाला नाही. जेव्हा सर्व लोक तो मृ’तदेह घेऊन स्मशानात पोहोचले तेव्हा गंडकी सुद्धा चितेवर जाऊन बसली. जेव्हा मृ’तदेह चितेवर झोपवला जात होता तेव्हा तिने त्याचे डोके आपल्या मांडीवर घेतले.

त्यानंतर देवाकडे प्रार्थना करू लागली हे प्रभू मी जेव्हापासून त्या गुरुजींच्या शब्दावर विश्वास ठेवला आहे तेव्हापासून आजपर्यंत जर मी माझ्या पती व्यतिरिक्त इतर कोणत्याही पुरुषाकडे पाहिले असेल तर अग्नि प्रज्वलित होऊ दे. गण्डकीने असे म्हणताच त्या चीतेला आग लागली तेव्हा भगवान श्रीहरी विष्णूंनी एक डोळा उघडून पाहिले की, गण्डकी काय करत आहे. त्यांनी पाहिले की गंडकी दोन्ही हात जोडून डोळे बंद करून त्यांच्या नावाचा जप करत आहे. त्यानंतर श्रीहरी विष्णूंनी आपल्या मायेने त्या चितेची अग्नी अजून तीव्र केली आणि पाहू लागले की,

अग्नीच्या गर्मीमुळे गण्डकी पळून तर जात नाहीये ना.? परंतु त्यांनी पाहिले की तीव्र आग्नित सुद्धा गण्डकी वर काहीच परिणाम होत नव्हता. तिचे शरीर जळत होते परंतु तिने तोंडातून एक शब्दही काढला नाही. तेव्हा भगवान श्रीहरी विष्णूंना हे समजण्यास जास्त उशीर लागला नाही की गंडकी जरी वे-श्या असली तरी तिची भक्ती खरी आहे. त्याच क्षणी भगवान श्रीहरी विष्णू आपल्या मूळ रूपात प्रकट झाले, म्हणाले गण्डकी, डोळे उघड मी तर तुझी परीक्षा घेत होतो तू त्या परीक्षेत सफल झाली आहेस.

श्रीहरी विष्णूंनी असे म्हणतात त्या चितेची आग शांत झाली आणि बघता बघताच त्या वे-श्येचे शरीर सुद्धा स्वस्थ झाले. त्यानंतर गण्डकीने जेव्हा आपले डोळे उघडले तेव्हा तिच्या समोर साक्षात श्रीहरी विष्णू उभे असलेले पाहून ती आश्चर्यचकित झाली. तेव्हा श्रीहरी विष्णू म्हणाले मुली, मी तुझ्यावर अत्यंत प्रसन्न आहे वरदानात तुला जे हवे ते तू मागू शकतेस.

हे ऐकून गंडकी म्हणाली जर तुम्हाला मला काही द्यायचेच असेल तर माझी अशी इच्छा आहे की, जसे आता थोड्यावेळापूर्वी तुमचे डोके माझ्या मांडीवर होते तसेच तुम्ही नेहमी माझ्या मांडीवर राहावे हे सांगताना ती एवढी भावुक झाली की बघता बघताच तिच्या पूर्ण शरीराचे पाणी झाले ते पाणी तिथून वाहू लागले. त्याच पाण्याच्या धारा म्हणजे गण्डकी नदी म्हणून ओळखली जाऊ लागली. तेव्हा श्रीहरी विष्णू म्हणाले आजपासून मी शालिग्राम बनून नेहमी तुझ्या ओटीत राहीन.

मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.