400 वर्षांनंतर जेव्हा या मंदिराचा दरवाजा उघडण्यात आला तेव्हा शास्त्रज्ञांनी जे पाहीले.. त्यांचे होशच उडाले..
नमस्कार मित्रांनो..
मित्रांनो, शास्त्रज्ञांनी एका अशा मंदिराबद्दल ऐकले ज्याचे दरवाजे ४०० वर्ष बंद होते. त्या नंतर जेव्हा हे मंदिर उघडण्यात आले तेव्हा सगळे आश्चर्यचकीत झाले. ह्या मंदिरात असे काही होते जे बघून कोणालाच विश्वास बसला नाही. हे सगळे ऐकल्यावर शास्त्रज्ञ आपले सगळे यंत्र घेवून त्या मंदिरात शोध करण्यास आले. शास्त्रज्ञांनी सुद्धा आश्चर्याने तोंडात बोटे घातली.
तर कुठे आहे हे मंदिर? हे मंदिर ४०० वर्ष बंद का होते? काय होते ह्या मंदिराचे रहस्य ? चला तर जाणून घेऊया ह्या मंदिराचे रहस्य.. भारताच्या उत्तराखंड राज्यात खूप वर्षापासून एक मंदिर आहे. ह्या मंदिराचे प्रमाण कोणी बनवले हे आज पर्यंत कोणाला कळाले नाही. तरी सुध्धा आज आपण हे मंदिर पूर्ण दुनियेच्या समोर शान मधे उभे आहे.
कारण ह्या मंदिरात आहे देवांचे देव महादेव शिव शंकर ह्यांची प्रतिमा. ह्या मंदिराला केदार बाबा किंवा केदारनाथ ह्या नावाने ओळखले जाते. परंतु हे मंदिर ४०० वर्ष बंद का होते ? हे आपण जाणून घेवू. लोकांचे मानने की, ह्या मंदिराची उत्पत्ती आठव्या शतकात आदी शंकराचार्य ह्यांच्या हाताने झाली होती. अजून काही लोकांचे असे मानने आहे की,
दुसऱ्या शतकात राजा भोज ह्यांचा हातून ह्या मंदिराचे निर्माण झाले आहे. केदारनाथ ह्या मंदिराविषयी अजून खूप काही गोष्टी प्रसिद्ध आहेत. पौराणिक कथे मध्ये असे लिहिले आहे की, पांडव आपल्या पापांचे प्रायश्चित करण्यासाठी भगवान शिव ह्यांच्या शरण गेले होते. परंतु भगवान शिव त्यांना दर्शन नव्हते देत. त्यानंतर त्यांनी नंदीचे गुप्त वेश धारण केले.
परंतु त्या गुप्त वेशात देखील पांडवांनी शिव शंकर ह्यांना ओळखले. परंतु भगवान शिव हे अन्य पशू च्या घोळक्यात जाऊन उभे राहिले. पांडवांना ह्याचा अंदाज आला त्यानंतर भीम ने आपले मोठे विशाल रूप धारण करून हिमालयाच्या डोंगरावर आपला पाय पसरवला. सगळे पशू तिथून निघून गेले परंतु शंकर रुपी नंदीबैल पाया खालून जाण्यास तयार नव्हते.
त्यानंतर भीमने नंदी वर झपाटा मारला. परंतु बैल धरती मध्ये अंतर्ध्यान होऊ लागला. तेव्हा भीम ने शिव रुपी बैलाच्या पाठीवरचा भाग पकडला. भगवान शिव पांडवांची भक्ती व धीट संकल्पना बघून प्रसन्न झाले आणि त्यांना दर्शन दिले. तेव्हा पासून नंदी बैलाच्या पाठीवरच्या आकाराची पिंड केदारनाथ इथे स्थायिक आहे. असे म्हटले जाते की,
जेव्हा शंकर रुपी बैल धरती मध्ये अंतर्ध्यान झाले तेव्हा त्यांच्या धड वरचा भाग काठमांडु इथे प्रकट झाला. तिथे एक पशुपति नावाचे एक मंदिर आहे. ह्या मंदिराला पंच मंदिर सुद्धा म्हटले जाते. शास्त्रज्ञांच्या म्हनण्यानुसार हे मंदिर ४०० वर्ष बर्फाखाली स्थायिक होते. परंतु त्या मंदिराला कुठलीही इजा झाली नाही. केदारनाथ मंदिराच्या दगडांवर पिवळ्या रंगाच्या रेषा आहेत.
शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, ह्या खुणा हिमनदी च्या आहेत. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, १३०० आणि १७०० ह्या इ.स दरम्यान इथे एक हिमयुग आले होते. त्या वेळेस हा प्रदेश पूर्ण बर्फाच्या खाली झाकला गेला होता. दिवाळीच्या महापरवाच्या दुसऱ्या दिवशी हे मंदिर ६ महिन्यासाठी बंद केले जाते. मंदिरातला दिवा हा ६ महिने तसाच जळत असतो. ते ६ महिने मंदिराच्या आस पास कोणीही जात नाही.
आणि आश्चर्याची गोष्ट आहे की ६ महिन्यांनंतर सुध्धा मंदिर पूर्ण स्वच्छ दिसते. आणि दिवा ही तसाच जळत असतो. असे म्हटले जाते की, ह्या ६ महिन्यात देवगण येवून स्वतः शंकराची पूजा करतात. अशा ह्या अद्भुत मंदिराचे दर्शन आपल्या सगळ्यांना कधी तरी करायलाच पाहिजे. तर मित्रांनो तुम्ही सुद्धा कधी तरी ह्या मंदिराचे दर्शन नक्की घ्या.
मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.