सीताफळ आणि विषारी ? खाण्याआधी वेळात वेळ काढून 1 वेळा नक्की पहा, आयुर्वेदाची अतिशय महत्वपूर्ण माहिती.. पहा
नमस्कार मित्रांनो..
मित्रांनो, सीताफळ हे सर्वांना आवडेल असे फळ आहे. आयुर्वेदामध्ये सुद्धा याचे महत्त्व सांगितले आहे. बऱ्याचदा आपण असा विचार करतो की ज्या झाडाचे फळ आरोग्यासाठी चांगलं आहे त्याप्रमाणे त्या झाडाचे बाकीचे अवयव सुद्धा आरोग्यासाठी चांगले असतील. सिताफळ जेवढे आरोग्याला चांगले आहे त्या झाडाची पाने व इतर अवयव माणसाच्या आरोग्यासाठी घातक आहेत.
सीताफळ या वनस्पतीची पाने वि’षारी असतात. सीताफळाच्या झाडाच्या बाजूने बकरी किंवा शेळी या सारखे प्राणी जरी गेले तरी या झाडाच्या पानांचा वास पण घेत नाहीत कारण या वनस्पतीची पाने ही वि’षारी असतात. बरेच जणांना असे वाटते की सीताफळाच्या झाडाची पाने खाल्ल्यानंतर मधुमेह नियंत्रणात येतो परंतु ही पाने खाल्ल्यानंतर माणसाला पातळ शौ’चास होते.
कुठल्याही आ’जारामध्ये जर आपल्याला पातळ शौ’चास झाले तर आपल्या शरीरातील शुगरची पातळी कमी होते. त्यामुळे सिताफळ वनस्पतीच्या पानाचा वापर करून मधुमेह बरा करता येत नाही. मनुष्याच्या शरीरामध्ये दोन प्रकारचे बॅक्टेरिया असतात एक चांगले बॅक्टेरिया आणि वाईट बॅक्टेरिया. या पानांच्या सेवनामुळे मनुष्याच्या शरीरातील दोन्ही बॅक्टेरिया म’रतात,
ज्यामुळे पचन संस्थेवर विपरीत परिणाम होतो. यामुळे पातळ शौ’चास होणे, ऍसिडिटी, गॅस होणे, अपचनाचा त्रास देखील होऊ शकतो. या वनस्पतीची पाने विषारी आहेत असे का म्हटले आहे याचे आणखी कारण म्हणजे खेडेगावामध्ये आजही जर डोक्यामध्ये उवा झाल्या असतील, केसाला चाई लागली असेल तर केसांमधील उवा घालवण्यासाठी तसेच,
केसाला लागलेली चाई घालवण्यासाठी या पानांचा रस डोक्याला लावतात. घरामध्ये ढेकूण झाले असतील तर या पानांचा रस घरामध्ये फवारला जातो ज्यामुळे घरामधील ढेकूण मारले जातात एवढी ही पाने विषारी असतात. सिताफळ गोड आणि चविष्ट लागते. हे फळ अवश्य खाल्ले गेले पाहिजे. सिताफळ प्रत्येक व्यक्तीला खाता येत नाही कारण,
हे फळ अत्यंत गोड असते त्यामुळे मधुमेह असलेल्या व्यक्तीला हे फळ जास्त खाता येत नाही शिवाय मधुमेह नसलेल्या व्यक्तीने सुद्धा हे फळ जास्त खाऊ नये कारण या फळांमध्ये जो घटक असतो त्याने आपल्या शरीरातील साखरेचे प्रमाण वाढू शकते. सिताफळ हे गुणधर्माने अत्यंत थंड फळ आहे. त्यामुळे ज्यांची वात प्रकृती आहे, सतत कफ होणाऱ्या व्यक्तीने तसेच,
सतत सर्दी होणाऱ्या व्यक्तीने किंवा ज्यांना एलर्जी ने शिंका येतात अशा व्यक्तीने हे फळ खाऊ नये. जर अशा व्यक्तींना ही फळ खायचे असेल तर त्यांनी उन्हामध्ये हे फळ खायचे आहे तसेच जेवण झाल्यानंतर खायचे आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सीताफळ खाल्ल्यानंतर अजिबात पाणी पिऊ नये. सिताफळ खाल्ल्यानंतर लगेचच पाणी पिल्यास आपल्याला लगेच सर्दी होते.
सीताफळाचे झाड हे आयुर्वेदामध्ये महत्त्वाचे असले तरीसुद्धा या झाडाच्या प्रत्येक अवयवाचा वापर कसा करावा हे एक शास्त्र आहे. त्यामुळे शास्त्रानुसारच याचा वापर करावा लागतो. सीताफळाचे पान आणि चुना एकत्र करून जर आपण कीड लागलेल्या दाताखाली धरला आणि जी लाळ आहे ती टाकून दिली तर दातामधील कीड मरते. त्यामुळे सीताफळ हे फळ जरी गोड लागत असेल तरीसुद्धा त्याच्या पानांचा वापर करताना नीट माहिती घेऊनच करा.
मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.