श्री गणेश चतुर्थी ! बाप्पाला चुकूनही वाहू नका या 3 वस्तू घरात येईल गरिबी.. गणपत्ती बाप्पा नाराज होतील..
नमस्कार मित्रांनो..
मित्रांनो, ३१ऑगस्ट बुधवार रोजी यावर्षीची श्री गणेश चतुर्थी आली आहे त्या दिवशी पासून ते अनंत चतुर्दशी पर्यंत गणपती बाप्पांचं घराघरांमध्ये आगमन होतं. दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीस आपण श्री गणेश चतुर्थी साजरी करतो. गणपती बाप्पा आपल्या घरी आल्यानंतर आपण त्यांची मनोभावे पूजा करतो.
दहा दिवस आपण वेगवेगळ्या पदार्थांचे नैवेद्य दाखवतो त्या सोबतच गणपती बाप्पाच्या आवडीची फुले, फळे, पत्री ( झाडांची पाने) गणपती बाप्पाला अर्पण केली जातात. काही ठिकाणी काही घरांमध्ये वेग-वेगळ्या प्रकारची धान्य गणपती बाप्पाला अर्पण करण्याची सुद्धा प्रथा आहे.
हिं’दु ध’र्म शास्त्रानुसार आणि गणेश पुराणानुसार अश्या काही वस्तू आहेत ज्या गणपती बाप्पाला अर्पण केल्या तर,
गणपती बाप्पा आपल्यावर नाराज होऊ शकतात. या वस्तू आपण गणपती बाप्पांना कधीही अर्पण करू नये. आता आपण जाणून घेऊयात की, त्या वस्तू कोणत्या आहेत आणि गणपती बाप्पांना अप्रिय आहेत आणि अशा वस्तू गणपती बाप्पांना वाहिल्यानंतर काय होते? सर्वात पहिली वस्तू जी आपण गणपती बाप्पांना अर्पण करू नये ती आहे “तुळशीपत्र”.
अनेक देवी देवतांना त्यांच्या पूजेमध्ये तुळशी पत्र अर्पण केले जाते. विशेष करून श्री विष्णु जे जगाचे पालन हार आहेत. श्री विष्णूची पूजा तुळशी पत्रा शिवाय अपूर्ण मानली जाते. तुळशी पत्रा शिवाय श्री विष्णु नैवेद्य स्वीकार करत नाहीत. मात्र जो शिव परिवार आहे म्हणजेच माता पार्वती, भगवान शंकर, कार्तिकेय आणि गणपती यांच्या पूजेमध्ये मात्र,
तुळशी पत्राचा वापर हिं’दु ध’र्म शास्त्रात वर्ज मानला आहे. दुसरी वस्तू आहे “अक्षत.” तुम्ही पाहिले असेल की अनेक देवी देवतांच्या पूजेमध्ये अक्षत म्हणजे तांदूळ वापरले जातात. गणपती बाप्पाच्या पूजा मध्ये सुद्धा आपण अक्षत म्हणजे तांदळाचा वापर करतो परंतु हे तांदूळ घेताना ते अख्खे घ्यावेत तु’टलेले घेऊ नये. अशा तु’टलेल्या तांदळांना अक्षत म्हटले जात नाही.
हे तांदूळ घेताना त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून थोडे पाणी टाकून थोडे ओले करून घ्यावेत जेणेकरून त्यांना पिवळा रंग प्रदान होईल. पिवळ्या अक्षतांचा वापर गणपती बाप्पांना अर्पण करण्यासाठी करायचा आहे. तिसरी गोष्ट आहे “केतकीची फुले.” गणपती बाप्पांना केतकीची फुले अर्पण केली जात नाही. पुराणानुसार केतकीची फुले ही महादेवांना अप्रिय आहेत आणि,
म्हणूनच गणपती बाप्पांना सुद्धा ही फुले अर्पण केली जात नाही. इतर फुलांमध्ये सुद्धा जी वाळलेली आणि सुकलेली फुले असतात ती फुले वाहू नये. गणपती बाप्पाला तसेच इतर देवी देवतांच्या पूजेमध्ये सुद्धा सुकलेली फुले वाहू नये त्यामुळे घरामध्ये दारिद्रता येते. गणपती बाप्पाची स्थापना करताना या गोष्टी नक्की लक्षात ठेवा. मनोभावे गणपती बाप्पाची पूजा अर्चना करा त्याचे चांगले फळ प्राप्त होते.
मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.