श्रीकृष्णाने बासरी वाजवणे का सोडले, बासरी का तो’डली.? त्यावेळी असे काय घडले होते.. पहा
नमस्कार मित्रांनो..
मित्रांनो, जसं की डमरू शिवाय आपण भगवान शंकराची कल्पना करू शकत नाही तसेच बासुरी शिवाय आपण श्रीकृष्णाची कल्पना करू शकत नाही. श्रीकृष्णाची बासरी श्रीकृष्णाची रासलीला युगान युगे सर्वांच्या आठवणीत आहेत ज्या बासुरीला श्रीकृष्ण थोडा वेळ सुद्धा स्वतःपासून दूर करत नव्हते तीच बासुरी त्यांनी एके दिवशी तो’डली व पुन्हा न वाजवण्याचा निर्णय घेतला,
अशी कोणती घटना घडली ज्यामुळे श्रीकृष्णांनी हा निर्णय घेतला ते आज आपण पाहूयात.. मित्रांनो, ही घटना जाणून घ्यायच्या आधी हे जाणून घेऊया की प्राणापेक्षा ही प्रिय असणारी बासुरी श्रीकृष्ण यांना कोणी भेट दिली होती. पुराणामध्ये असलेल्या एका कथेनुसार जेव्हा भगवान श्रीकृष्ण यांनी द्वापार युगात ज’न्म घेतला होता तेव्हा त्यांना भेटण्यासाठी अनेक दिवस देवता तेथे आले होते.
यावेळी भगवान शंकर यांनी विचार केला की, त्यांना सुद्धा श्री विष्णूंचा अवतार असलेले श्रीकृष्णांना भेटण्यास जायचे आहे, परंतु आपण श्रीकृष्णांना अशी कोणती भेटवस्तू देऊ शकतो जी त्यांना पसंत येईल आणि ती स्वतः सोबत कायम ठेवतील. थोड्याच वेळात भगवान शंकर यांना आठवले की, त्यांच्याजवळ दधीची ऋषी यांची शक्तिशाली हाडे आहेत त्या हाडांपैकी एका हाडापासून भगवान शंकराने,
भगवान श्रीकृष्ण यांच्यासाठी एक सुंदर बासुरी बनवली. पृथ्वीवर जाऊन श्रीकृष्ण यांना ही बासरी भेट म्हणून दिली. दधीची ऋषी यांनी आपली हाडे ध’र्माच्या रक्षणासाठी दान केली होती. त्यांच्याच झाडांपासून या सृष्टीच्या तीन शक्तिशाली पिनाक, गां’डीव आणि शारंग या धनुष्यांची निर्मिती केली गेली होती. इंद्र देवाचे वज्र सुद्धा या हाडांपासून बनविले आहे.
चला तर आता आपण ती घटना पाहू या घटनेमुळे श्रीकृष्णाने आपली प्रिय बासुरी तो’डली व कधीही न वाजवण्याचा निर्णय घेतला. मित्रांनो, आपणा सर्वांना ही गोष्ट तर माहीत असेलच की- भगवान श्रीकृष्ण यांना जेवढी प्रिय त्यांची बासरी होती तेवढीच प्रिय राधा देखील होती. राधेला सुद्धा श्रीकृष्णांची बासुरी ऐकणे फार पसंत होते. जेव्हा जेव्हा श्रीकृष्ण बासरी वाजवायचे तेव्हा राधा सगळी कामे बाजूला ठेवून,
त्यांची बासरी ऐकण्यासाठी श्रीकृष्णा जवळ यायची. असे म्हटले जाते की, बासुरीच राधा आणि कृष्णाला एकत्र ठेवत होती. देवा श्रीकृष्ण वृंदावन सोडून जात होते तेव्हा त्यांचे मन फार व्याकुळ झाले होते. राधा सुद्धा श्रीकृष्णाकडे त्यांनी वृंदावन सोडून जाऊ नये अशी विनंती करत होती. परंतू आपली कर्तव्य पूर्ण करण्यासाठी श्रीकृष्णाला इच्छा नसताना सुद्धा वृंदावन सोडून जावे लागले.
श्रीकृष्णाने वृंदावन सोडण्याआधी राधाने त्यांच्याकडून वचन घेतले होते की, “जेव्हा कधी राधा देह त्याग करेल त्यावेळी श्रीकृष्णांना तिला भेटण्यास यावे लागेल”. राधेला हे वचन देऊन भगवान श्रीकृष्ण कंस चा व’ध करण्यासाठी वृंदावन सोडून निघाले. श्रीकृष्ण मथुरा गेले तेथे जाऊन त्यांनी कंस चा व’ध केला,आणि आपली द्वारका नगरी स्थापित केली.
यानंतर महाभारत यु’द्ध झाले त्यात श्रीकृष्णांनी आपली योग्य भूमिका पार पाडली. यादरम्यान राधाचा सुद्धा विवाह झाला आणि ती आपली कर्तव्य पार पाडत होती. राधेच्या मनातून श्रीकृष्णाचा विचार कधीच गेला नाही ती श्रीकृष्णाची वाट पाहत होती. राधा जेव्हा वृद्ध झाली आणि शेवटचे क्षण मोजत होती तेव्हा तिने श्रीकृष्णाला आवाहन केले, दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी श्रीकृष्ण तेथे आले आणि तोपर्यंत बासुरी वाजवत राहिले जोपर्यंत राधा देह त्याग करत नाही. असे म्हटले जाते की-
त्यागाच्या शेवटच्या क्षणी श्रीकृष्णाने सर्वात सुंदर बासरी वाजवली होती त्यानंतरच राधाने आपले प्राण त्यागले. भगवान श्रीकृष्ण यांना ही माहीत होते की राधा आणि कृष्ण यांचे प्रेम अमर आहे. भगवान श्रीकृष्ण हे एक देव असूनही त्यांना राधेचे निघून जाणे सहन झाली नाही आणि त्यांचे प्रेमाचे प्रतीक असलेली ती बासुरी श्रीकृष्ण यांनी तो’डून फेकून दिली आणि निर्णय घेतला की पुन्हा आयुष्यभर ते बासुरीच नाही तर दुसरे कुठलेच वादक यंत्र वाजवणार नाहीत.
मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.