Alphamarathi.com

Super Fast Marathi News
वैज्ञानिकांना सापडली प्राचीन हस्तिनापुर.. पाहून सर्वांचे होशच उडाले.. आजही या ठिकाणी हे पाहायला मिळते..

मित्रांनो, एकोणीसशे पन्नास च्या दशकात आर्किऑ’लॉजिकल सर्वे ऑफ इंडिया ने भारताच्या एका ऐतिहासिक ठिकाणी खोदण्याचे काम चालू केले होते. त्यांचा अनुमान होता की, या ठिकाणी प्राचीन भारतीय इतिहासाचे काही पुरावे मिळतील. या खोदकामात अशा काही वस्तू सापडल्या ज्या खूपच प्राचीन काळातल्या होत्या, जेव्हा या वस्तूंचे वैज्ञानिक परीक्षण केले गेले आणि,

भारतीय प्राचीन ग्रंथांसोबत तुलना केली गेली तेव्हा भारतीय वैज्ञानिक अचंबित झाले कारण कळत नकळतच प्राचीन भारतीय संस्कृतीचा शोध लावला होता. या शोधामुळे अशा अनेक गोष्टी समोर आल्या त्या आश्चर्यचकित करण्यासारख्या होत्या. परंतु त्यानंतरच्या काळात हे शोधकार्य अचानक थांबवण्यात आले याचे कारण काय होते हे कोणालाच माहीत नाही.

वैज्ञानिकांनी सत्तर वर्षानंतर हस्तिनापुर मधल्या या शोधकार्याला पुन्हा सुरुवात करण्याची योजना केली आणि या ठिकाणी पोहोचल्यावर त्यांनी खोदकाम करण्यास सुरुवात केले. हे खोदकाम चालू असताना ज्या वस्तू त्यांच्या समोर आल्या त्या पाहून सर्व वैज्ञानिकांनी अचंबित होऊन तोंडात बोटे घातली, या खोदकामात अशा कोणत्या गोष्टी समोर आल्या, हे खोदकाम भारतात हस्तीनापुर मध्ये कोणत्या ठिकाणी केले गेले आणि या मागचे रहस्य काय आहे हे आपण पुढे जाणून घेऊया..

हस्तिनापुर हे शहर महाभारताच्या काळात कौरवांची एक संपन्न राजधानी म्हणून ओळखली जात होते. याठिकाणी आजही भुगर्भा मध्ये पांडवांचा किल्ला, महाल, मंदिरे आणि इतर अवशेष गाडले गेलेले आहेत. पौराणिक ग्रंथांच्या अनुसार सम्राट भरताच्या काळात कुरुवंशी राजा बृहत्छत्र यांचे सुपुत्र हस्तीनी यांचा ज’न्म झाला, ज्यांनी आपली राजधानी हस्तिनापूराची स्थापना केली. असे म्हटले जाते की,

हस्तिनापूरच्या आधी त्यांच्या राज्याचे राजधानी खंडकप्रस्त ही होती परंतु अनपेक्षित पणे जलप्रलय आल्यामुळे तिचा नाश झाला आणि तेव्हाच राजा हस्ते यांनी नव्या राजधानीचे स्थापना करून तिला हस्तिनापुर असे नाव दिले. राजा हस्तीन नंतर अजामीन, दक्ष, संभ्रण, कुरू हे सर्व क्रमानुसार हस्तीनापुर मध्ये राज्य करत राहिले. कुरुवंशामध्येच पुढे राजा शंतनू यांचा ज’न्म झाला आणि इतिहासाचे नवीन पर्व सुरू झाले.

राजा शंतनुला पांडू आणि धृतराष्ट्र असे दोन पुत्र होते यांचेच पुत्र कौरव आणि पांडव यांच्यात राज्याच्या वाटणीसाठी महाभारत हे यु’द्ध झाले. आर्किऑ’लॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या टीमने एकोणीसशे पन्नास च्या दशकात वर्तमान उत्तर प्रदेश मधील मेरठपासुन बावीस किलोमीटर उत्तर-पूर्वेला प्राचीन गंगा नदीच्या काठी प्राचीन हस्तिनापुर आणि अनेक प्राचीन गावांचे अवशेष शोधून काढले होते. हे सर्व अवशेष त्याच ठिकाणी मिळाले जिथे पौराणिक ग्रंथ महाभारतात उल्लेख केलेला आहे.

आर्किऑ’लॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या वैज्ञानिकांनी असे सांगितले की, हस्तिनापूर ही वसाहत इसवी सन पूर्व एक हजार च्या आधीचे आहे आणि त्यानंतर ते बरीच वर्षे कार्यरत राहीले आणि दुसरी वस्ती इसवी सन पूर्व नवशे पासून ची होती जी इसवी सन पूर्व तीनशे पर्यंत कार्यरत होती. तिसरी वस्ती इसवी सन पूर्व दोनशे पासून इसवीसन दोनशे पर्यंत कार्यरत होती आणि अखेर चे वस्ती अकराव्या शतकापासून चौदाव्या शतकापर्यंत कार्यरत होती. एकोणीसशे पन्नास च्या दशकात वैज्ञानिकांनी हस्तिनापूरच्या अनेक अवशेषांचा शोध लावला होता.

हे शोधकार्य भारताच्या पुरातत्त्व विभागाच्या पितामह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जगप्रसिद्ध प्रोफेसर श्री देवीलाल यांच्या मार्गदर्शनाखाली झाले होते ज्यामध्ये बत्तिशे वर्षापूर्वीचे अवशेष सापडले होते परंतु अचानक हे शोधकार्य थांबवण्यात आले होते. सत्तर वर्षानंतर हे काम पुन्हा सुरू करण्यात आले. वैज्ञानिकांच्या टीमने जेव्हा या प्राचीन हस्तिनापुर मधील पांडव किल्ल्यावर खोदकाम सुरू केले तेव्हा त्यांना हजारो वर्षापूर्वीचे मातीचे भांडे मिळाले, प्राचीन हंडी, दगड, विटा, आणि जुन्या घराच्या भितींचे अवशेष सापडले.

इथे मिळालेल्या अवशेषांचा अभ्यास केला जात आहे. अशोक कामात बरीच मातीची भांडी मिळाली. प्राचीन काळातील हस्तीनापुर मध्ये बऱ्याच वेळा मोठ्या प्रमाणात पूर येऊन गेला असेल असे तिथे मिळालेल्या पूराव्यावरून वाटते. कासव आणि माशांचे अवशेष सुद्धा मिळाले. मिळालेल्या पुराव्यानुसार असे वाटले जाते की हस्तीनापुर बराच वेळा उध्व’स्त झाले आणि बऱ्याच वेळा पुन्हा स्थापन झाले. जर तुम्हाला इच्छा असेल तर अशा प्राचीन ठिकाणी एक दिवस नक्की भेट द्या आणि अनुभव घ्या.

मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.