लोपामुद्रा ने पहिल्याच रात्री पतीला अशी अट का घातली.. कारण रात्रीच्या वेळी तिला पतीसोबत.. पुढे पहा
नमस्कार मित्रांनो..
मित्रांनो, या ब्रम्हांडातील सर्वात सुंदर आणि बुद्धिमान स्त्री विषयी तुम्ही ऐकले असेलच त्या स्त्रीचे नाव होते लोपामुद्रा. एवढी सुंदर स्त्री असून देखील त्यांनी एका ऋषी मुनी सोबत म्हणजेच अगस्त्य ऋषी सोबत विवाह केला होता. एके दिवशी अगस्त्य ऋषी स्वर्ग यात्रेहून परत येत असता त्यांना झाडाच्या फांदीला काही वृद्ध माणसे उलटी लटकलेली दिसली.
हे दृश्य पाहून अगस्त्य ऋषींना आश्चर्य वाटले. ऋषींनी त्या लोकांना विचारले की तुम्ही कोण आहात आणि या झाडाला उलटे का लटकलाय ? यावर त्या व्यक्तींनी सांगितले की, “आम्ही तुझे पूर्वज आहोत, आम्हाला अद्याप मुक्ती मिळाली नाही. जोपर्यंत तुझ्या संतानाची उत्पत्ती होत नाही तोपर्यंत आम्ही येथे असेच लटकत राहू त्यामुळे लवकरात लवकर संतानाची उत्पत्ती करून आम्हाला मुक्त कर”.
हे ऐकून ऋषीमुनी आपल्या आश्रमात निघून गेले. ऋषी तेव्हापासून आपल्यासाठी अर्धांगिनी शोधण्यास सुरुवात केली. फार शोधल्यानंतर त्यांना लग्नासाठी योग्य कन्या मिळाली नाही. त्यावेळी त्यांनी असा निश्चय केला की ते स्वतः एक सुंदर आणि बुद्धिमान कन्येचा निर्माण करतील. कन्येच्या निर्माणासाठी अगस्त्य ऋषींनी ब्रम्हांडामधील सर्वात सुंदर वस्तूंच्या गुणांना एकत्र केले आणि,
आपल्या कामांमध्ये व्यस्त असताना एके दिवशी त्यांची नजर विदर्भ राज्याच्या राजावर पडली. राजा व त्यांची पत्नी संतान प्राप्तीसाठी देवाकडे प्रार्थना करत होती ते पाहून अगस्त्य ऋषींनी विचार केला की या कन्येला युवा रूप देण्यापेक्षा शिशुरूपामध्ये विदर्भ राज्याच्या राजाला द्यावी. कालांतराने ती कन्या राजाच्या कन्येच्या रूपात जन्माला आली.
राजाने त्या कन्येचे नाव लोपामुद्रा ठेवले. कालांतराने ती कन्या लग्ना योग्य झाल्यावर राजाने त्या कन्येचा विवाह करायचे ठरवले. एके दिवशी त्या ठिकाणी अगस्त्य ऋषींचे आगमन झाले, राजाने त्यांचे आदरातिथ्य केले आणि येण्याचे कारण विचारले. राजाच्या कन्येशी ते विवाह करू इच्छित आहेत. हे ऐकून राजाला फार आश्चर्य वाटले.
लोपामुद्रा फार सुंदर आणि बुद्धिमान होती देव देवता सुद्धा लोपामुद्राशी विवाह करण्यास इच्छुक होते असे असताना आपल्या कन्येचा विवाह एका संन्यासी सोबत करणे हे राजाला मनोमन पटत नव्हते. राजाला चिंतेमध्ये पाहून लोपामुद्राने अगस्त्य ऋषींसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. लोपामुद्राने आपला निर्णय आपल्या पित्यास सांगताच राजाने मोठ्या थाटामाटात तिचा विवाह करून दिला.
लोपामुद्रा आपल्या पतीसह आश्रमात आली त्यावेळी अगस्त्य ऋषींनी सांगितले की तुला या राज्य वस्त्रांचा आणि आभूषणाचा त्याग करून माझ्यासोबत एक सात्विक आयुष्य जगावे लागेल. आपल्या पतीच्या आज्ञेनुसार लोपामुद्रा साधारण आयुष्य जगू लागली. एके दिवशी लोपामुद्रा नदीमध्ये स्नान करत असताना अगस्त ऋषींची तिच्यावर नजर पडली त्यावेळी लोपामुद्रा फार सुंदर व आकर्षक दिसत होती.
कृषी अगस्त्य यांनी लोपामुद्रासोबत समागम करण्याची इच्छा व्यक्त केली. लोपामुद्रा म्हणाली की, मी तुमच्यासोबत समागम करण्यास तयार आहे परंतु माझी एक इच्छा आहे की, मी माझ्या पीत्याच्या घरी ज्या प्रकारच्या बिछान्यावर झोपत होती त्या प्रकारच्या बिछान्यावर मला तुमच्यासोबत समागम करायचा आहे. हे ऐकून ऋषी म्हणाले की,
मी एक संन्यासी आहे मी अशा प्रकारच्या बिछान्याची व्यवस्था कशी करू ? यावर लोपामुद्रा म्हणाली की तुम्ही तुमच्या तपश्चर्येच्या बळावर सर्व सुख माझ्या पायाशी आणू शकता. ऋषींनी सांगितले की जर त्यांनी असे केले तर त्यांच्या तपश्चर्येचा अपमान होईल. असे बोलून अगस्त्य ऋषी त्यावेळचे श्रीमंत शासक राजा इतवल यांच्याकडे गेले. राजाने ऋषींना भरपूर दान देऊन त्यांचा आदर सत्कार केला.
ऋषीमुनी ज्यावेळी धन घेऊन आश्रमात परत आले त्यावेळी लोपामुद्राने खुश होऊन त्यांच्यासोबत समागम केला त्यानंतर सात वर्षांनी लोपामुद्रा हिला पुत्रप्राप्ती झाली त्याचे नाव “दृढस्यु” ठेवण्यात आले. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.