Alphamarathi.com

Super Fast Marathi News
लक्ष्मीपूजन ! माता लक्ष्मीला अर्पण करा या रंगाचे फुल.. सुख, समाधान, वैभव सर्वकाही भर-भरून मिळेल..

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाचा दिवस हा खूप महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी माता लक्ष्मी आणि श्री गणेशांचे पूजन केले जाते. चारही दिशांना अंगणामध्ये घरामध्ये दिवे प्रज्वलित केले जातात, अंगणामध्ये रांगोळी काढली जाते आणि माता लक्ष्मीला खुश करण्यासाठी आपल्या घराकडे आकर्षित करण्यासाठी अनेक उपाय देखील केले जातात.

परंतु मित्रांनो यावेळी कळत नकळत आपल्याकडून काही चुका होतात. माता लक्ष्मीची पूजा करताना काही गोष्टींकडे आपण लक्ष देत नाही. यामुळे आपल्या पूजेचं आपल्या मंत्रजपाच आणि उपायांचा पूर्ण फळ आपल्याला मिळत नाही. हे लक्ष्मीपूजन करताना काही गोष्टींकडे लक्ष ठेवणं, काही गोष्टी ध्यानात ठेवणं खूप महत्त्वाचा आहे. मित्रांनो या कोणत्या गोष्टी आहेत,

ज्या लक्ष्मीपूजनामध्ये आपल्याला करायचे आहेत ते आज आपण पाहूयात.. चला तर जाणून घेऊया लक्ष्मीपूजनाच्या वेळी कोणत्या चुका आपल्याला करायचे नाहीत. मित्रांनो लक्ष्मीपूजनाचा दिवस हा माता लक्ष्मीचा जन्म दिवस म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी समुद्रमंथनातून माता लक्ष्मी प्रकट झाल्या होत्या. असं मानलं जातं की,

लक्ष्मीपूजनाच्या रात्री माता लक्ष्मी पृथ्वीवर विचारण करत असते आणि ज्या घरामध्ये स्वच्छता असेल, आनंद असेल, उत्साह असेल त्या घरामध्ये माता लक्ष्मी आगमन करते. परंतु या दिवशी पूजा करताना आपल्याकडून जर काही चुका झाल्या तर माता लक्ष्मी आपल्यावर नाराज होऊ शकते. यातील सगळ्यात पहिली चूक जी अनेक लोक करतात ती म्हणजे,

या दिवशी माता लक्ष्मी आणि श्री गणेश या दोघांचीच पूजन करतात. फक्त माता लक्ष्मीचा पूजन न करता त्यांच्यासोबतच श्रीविष्णूंचे देखील आपल्याला पूजन करायचे आहे. कारण माता लक्ष्मी त्याच घरामध्ये आगमन करते, त्याच घरामध्ये वास करते जिथे श्री विष्णू असतील. त्यामुळे या दिवशी माता लक्ष्मी सोबतच श्री विष्णूचे देखील आपल्याला पूजन करायचे आहे.

पुढची गोष्ट म्हणजे आपण जेव्हा माता लक्ष्मीच्या पूजेमध्ये तुपाचा दिवा प्रज्वलित करणार आहोत तेव्हा हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर देवीच्या उजव्या बाजूला ठेवायचा आहे. लक्षात ठेवा आपल्या उजव्या बाजूला नाही तर देवीच्या उजव्या बाजूला तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. या दिवशी अनेक लोक बाजारात मिळणारे मेणबत्त्या देखील प्रज्वलित करतात परंतु,

तुपाचा किंवा तेलाचा दिवा तुम्ही घरामध्ये प्रज्वलित करा हे आपल्या आरो’ग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. जेव्हा तुम्ही गाईच्या तुपाचा दिवा देवीसमोर प्रज्वलित करणार आहात तो देवीच्या उजव्या बाजूला ठेवायचा आहे. पुढची गोष्ट म्हणजे आपण माता लक्ष्मीला जी फुल अर्पण करणार आहोत ती लाल रंगाची किंवा पिवळ्या रंगाची असावीत विशेष करून लाल रंगाची असतील तर अति उत्तम,

कारण लाल रंग हा माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे. तुम्ही माता लक्ष्मीला गुलाबाचं, कमळाचं, जास्वंदीचं असं कोणतंही फुल अर्पण करू शकता परंतु चुकूनही पांढऱ्या रंगाचे फुल माता लक्ष्मीला अर्पण करू नका. कारण माता लक्ष्मी या सौभाग्यवती आहेत त्यामुळे त्यांना लाल रंगाची फुले अर्पण करावीत. त्याचबरोबर पूजा करताना आपण देखील जर लाल रंगाचा वस्त्र परिधान केलं तर ते सुद्धा खूप शुभ मानलं जातं.

लक्षात ठेवा की, कमीत कमी एक तरी फुल लाल रंगाचं माता लक्ष्मीला नक्की अर्पण करा. त्याचबरोबर माता लक्ष्मीच्या खाली आपण चौरंगावर जे वस्त्र अंथरलेला आहे ते सुद्धा लाल रंगाच असाव, गुलाबी रंगाचा असेल तरीही चालेल परंतु चुकूनही पांढऱ्या रंगाच वस्त्र माता लक्ष्मीच्या पूजेसाठी चौरंगावर अंथरू नका. या होत्या काही गोष्टी ज्या लक्ष्मीपूजनाच्या वेळी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत.

या चुका लक्ष्मीपूजनाच्या वेळी तुम्ही चुकूनही करू नका नाहीतर तुमच्या पूजेचं पूर्ण फळ तुम्हाला मिळणार नाही. या लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने तुमच्या कुटुंबावर आणि तुमच्यावर माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद राहो हीच प्रार्थना. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.