युगांमध्ये कलयुगाला सर्वश्रेष्ठ युग का म्हटले जाते.? महर्षी व्यास यांनी सांगितले कलयुगाचे रहस्य.. पहा
नमस्कार मित्रांनो..
मित्रांनो, हिं’दू ध’र्म ग्रंथानुसार कलियुगाला मानव जा’तीतील सर्वात शापित युग मानले गेले आहे. परंतु तुम्हाला हे माहीत नसेल की महर्षी व्यास यांनी विष्णुपुराणात कलियुगाला सर्वश्रेष्ठ सांगितले आहे. महर्षी व्यास यांनी कलियुगाला सर्वश्रेष्ठ का म्हटले आहे हे आता आपण पाहूयात. विष्णुपुराणात वर्णन केलेल्या कथेनुसार, एके दिवशी महर्षी व्यास गंगा नदीमध्ये स्नान करत होते.
तेवढ्यात तिथे ऋषीमुनी आले आणि त्यांनी पाहिले की महर्षी व्यास गंगा नदीमध्ये ध्यान करत बसले आहेत हे पाहून तेथे आलेले ऋषी एका झाडाखाली महर्षी व्यास यांची वाट पाहत बसले. तेवढ्यात महर्षी व्यास उभे राहिले आणि म्हणाले की युगांमध्ये कलीयुग, वर्ण मध्ये शूद्र आणि माणसांमध्ये स्त्री श्रेष्ठ आहे. गंगा किनारी बसलेल्या ऋषीमुनींनी हे सर्व ऐकलं आणि आश्चर्य वाटले आणि ते ऋषीमुनी आपापसात बोलू लागले,
आतापर्यंत त्यांनी एवढा ऐकलं होतं की – कलियुग हे एक शापित युग आहे, जा’तीमध्ये ब्राह्मण श्रेष्ठ आहे. तर मग व्यास ची असे का म्हणत आहेत? त्यामधील एक ऋषी म्हणाले की – याचे उत्तर फक्त व्यासजीच देऊ शकतात. थोड्या वेळानंतर व्यास जी स्नान करून गंगा किनारी असलेल्या ऋषीमुनी कडे आले. ऋषीमुनी व्यासजींना म्हणाले की आम्ही इथे आमच्या शंकांचे निरसन करण्यासाठी आलो होतो,
परंतु आधी आम्हाला तुम्ही जे बोललात की वर्णा मध्ये शूद्र, युगांमध्ये कलियुग आणि मनुष्यामध्ये सर्वश्रेष्ठ आहे याचा अर्थ जाणून घ्यायचा आहे. तुमच्यासारखा महर्षी अर्थहीन बोलू शकत नाही. आम्हाला हे सर्व जाणून घ्यायचे आहे. यावर व्यासमुनी हसून म्हणाले की – जे फळ सत्ययुगात दहा वर्ष तपस्या ब्रह्मचर्य आणि जप याचना करून मिळते तेच फळ मनुष्य त्रेतायुगामध्ये एका वर्षात मिळवतो.
द्वापार युगात एका महिन्यात आणि कलियुगात फक्त एक दिवस आणि एका रात्रीत प्राप्त करू शकतो. या कारणासाठी कलियुगाला श्रेष्ठ म्हटले. सत्ययुग मध्ये ध्यान करून जे फळ मिळते ते फळ त्रेतायुगात यज्ञ करून मिळते तसेच द्वापार युगात देवाची पूजा अर्चा करून प्राप्त होते परंतु कलियुगात भगवान श्रीकृष्ण यांचे फक्त कीर्तन केल्याने हे फळ मिळते.
कलियुगामध्ये थोडासा प्रयत्न केला तरी सुद्धा पुरुषाला महानता प्राप्त होते. म्हणून मी कलियुगापासून संतोष आहे असे म्हटले. आता शूद्र कसे श्रेष्ठ आहेत हे आपण पाहू, ब्रा’ह्मणांना सर्वात पहिले ब्रह्मचर्याचे पालन करून वेद अध्ययन करावे लागते आणि मग विधिपूर्वक यज्ञ करावे लागतात. या सर्वांमध्ये अनियमितता आली तर त्यांना दोष लागतो. ब्रा’ह्मण जेवण आणि पाणी घेऊ शकत नाही.
प्रमाणाच्या सर्व कार्यात परतंत्रता असते. या उलट शु-द्रांना दुसऱ्याची मदत करून सद्गती प्राप्त होते. म्हणून शूद्र बाकी जा’तीपेक्षा सर्वश्रेष्ठ आहेत. स्त्रियांना मी का श्रेष्ठ म्हटले हे पाहूया असे व्यास मुनी म्हणाले, पुरुष आपल्या मेहनतीच्या कमावलेल्या धनाचा वापर कसा करतात यावर त्यांना शिवलोकात जागा मिळते, परंतु स्त्रिया तन मन आणि वचन याने पतीची सेवा करून मोक्ष प्राप्त करतात.
म्हणून मी शूद्र, कलियुग आणि स्त्रिया यांना सर्वश्रेष्ठ आहेत असे मानले आहे. कलियुगामध्ये माणसाला सुखी आणि समाधानी जीवन जगायचे असेल तर श्रीकृष्णाच्या नावाचा जप करावा आणि मृ-त्यूनंतर वैकुंठाला जाण्याचा आपला मार्ग निश्चित करावा. टीप :- मित्रांनो वरील माहिती हि सर्वसामान्य धार्मिक माहितीच्या आधारे देण्यात आलेली आहे यामागे कोणतीही अंध-श्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. तरी तसा कोणीही गैरसमज करून घेऊ नका.
मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.