Alphamarathi.com

Super Fast Marathi News
भारतामध्ये या ठिकाणी आहे भगवान विष्णूचे वैकुंठ धाम.. जाणून घ्या..

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, सनातन ध’र्मामध्ये जसे ब्रम्हलोकात ब्रम्हदेवाचा निवास आहे, कैलासामध्ये भगवान शंकराचा आहे तसेच भगवान विष्णूचा वैकुंठ धाम येथे निवास असल्याचे सांगितले जाते. परंतु कैलास आणि वैकुंठ धाम या सं’बंधी काही रहस्य सुद्धा आहेत हे तुम्हाला माहित आहे का ? वैकुंठ धाम कोठे आहे हे सर्वप्रथम आपण पाहूयात. वैकुंठ धाम तीन ठिकाणी आहे असे सांगितले जाते.

पृथ्वीवर, समुद्रात आणि स्वर्गाच्या वरती. श्रीकृष्णाच्या नंतर या ठिकाणाला “गोलोक” असे संबोधले जायचे. श्रीकृष्ण आणि श्रीहरी विष्णू एकच असल्यामुळे श्रीकृष्णाच्या निवासस्थानाला देखील वैकुंठ असे म्हटले जाते. पृथ्वीवर जगन्नाथ, बद्रीनाथ आणि द्वारकापुरी या ठिकाणांना वैकुंठ धाम म्हटले जाते. भारतामधील उत्तरेकडे असलेल्या बद्रीनाथ मंदिराला श्रीहरी विष्णूंचा दरबार मानला जातो.

वैकुंठ धाम जे पृथ्वीच्या वर आहे, स्वर्गाच्या ही वर आहे असे म्हटले आहे ते धाम फारच मोठे असल्याचे सांगितले जाते. श्रीहरी विष्णू येथे आपल्या पत्नी श्रीदेवी, भुदेवी, नीला आणि महालक्ष्मी यांच्यासोबत निवास करतात. मृ-त्यूनंतर विष्णुभक्त पुण्यात्मा या ठिकाणी येते असे सांगितले जाते. श्रीकृष्णाने द्वारके नंतर एका बाजूला जे नगर वसविले होते त्याला वैकुंठ असे म्हणतात.

आरवलीची पहाडी शृंखला येते हे वैकुंठ वसविले होते असे इतिहासात वर्णन आहे. असे म्हटले जाते की मृ’त्यूनंतर पुण्यात्मा थोड्यावेळासाठी वैकुंठ सुख उपभोगते व त्यानंतर त्या व्यक्तीला पुन्हा मृत्युलोकात जावे लागते. हे ठिकाण स्वर्गाच्या ही वर आहे असे सांगितले जाते. कैलासशी जोडल्या गेलेल्या काही रहस्यमय कथा :- तिब्बत मध्ये असलेले कैलास पर्वत भगवान शंकरांचे निवासस्थान मानले जाते.

या ठिकाणी कैलास मानसरोवर आहे. हे ठिकाण अद्भुत असून रहस्यमय देखील आहे. शिवपुराण, स्कंदपुराण, मत्स्यपुराण यामध्ये कैलाश खंड नावाचा एक वेगळा स्वतंत्र अध्याय आहे. पौराणिक कथेनुसार या पर्वताच्या बाजूला कुबेर ची नगरी आहे. येथूनच गंगेचा उगम होतो आणि गंगा कैलाश पर्वताच्या शिखरावर वाहते भगवान शंकर या गंगेला आपल्या जटे मध्ये घेऊन निर्मळ पाण्याच्या स्वरूपात पृथ्वीवर पाठवतात.

या पर्वताच्या वरती स्वर्ग आणि खाली मृ’त्यूलोक आहे. पृथ्वीचे केंद्र :- पृथ्वीच्या एका बाजूला उत्तर ध्रुव आहे आणि दुसऱ्या बाजूला दक्षिण ध्रुव. या दोघांच्याही मधोमध हिमालय पर्वत आहे. या विशाल हिमालय पर्वताचे केंद्र कैलास पर्वत मानले जाते. वैज्ञानिकांच्या मते हे पृथ्वीचे देखील केंद्र आहे. या पर्वतावर पृथ्वीवरील चार मुख्य धर्म हिंदू, बौद्ध, सिख आणि जैन ध’र्माची लोक राहतात.

अलौकिक शक्तीचे केंद्र :- येथे एक असे केंद्र देखील आहे ज्याला “एक्सेस मुंडी” म्हटले जाते. याचा अर्थ असा आहे की आकाशीय आणि भौगोलिक ध्रुवाचे केंद्र. हे आकाश आणि पृथ्वी यामधील केंद्र आहे. कैलाश पर्वत आणि आसपास असलेल्या वातावरणावरती बऱ्याच वेळा अध्ययन केले गेले आहे. येथे अलौकिक शक्तींचा प्रभाव आहे आणि या शक्तींशी संपर्क देखील केला जातो.

हा पर्वत पिरॅमिड सारखा दिसतो :- कैलास पर्वत हा विशाल पिरामिड सारखा दिसतो. या ठिकाणी दुसरा कुठलाही मोठा पर्वत नाही आहे. या शिखरावर कोणीही चढू शकत नाही :- पर्वतावरती चढणे ही एक अशक्य गोष्ट आहे परंतु जो व्यक्ती मृ’त्यूनंतर पापरहित असतो तोच व्यक्ती कैलासावर चढू शकतो. असे सांगितले जाते की, कैलास पर्वतावरती थोडेसे वर जातात मनुष्य भटकतो.

त्यामुळे कुठलाही मनुष्य आजपर्यंत कैलास पर्वतावर जाऊ शकलेला नाही. सरोवरांचे रहस्य :- येथे दोन सरोवरे आहेत जी खास समजली जातात. त्यापैकी एक असलेले मानसरोवर. या सरोवराचे पाणी जगातील स्वच्छ सरोवरांपैकी एक आहे. या सरोवराचा आकार सूर्यासारखा आहे आणि दुसरे आहे राक्षस सरोवर. जगामध्ये खाऱ्या पाण्याच्या सरोवरांपैकी हे एक आहे.

याचा आकार चंद्रासारखा आहे. या दोन्ही सारोवरांचा सं’बंध सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जेची आहे असे सांगितले जाते. ही सरोवरे नैसर्गिक आहेत की मानवनिर्मित हे अद्याप रहस्य आहे. याती मानव :- हिमालय वासियांचे असे म्हणणे आहे की तेथे यतिमानव राहतो. पूर्ण अस्वल, जंगली मानव तर काही लोक याला हिम मानव असे म्हणतात.

हा यातीमनव लोकांना मारून खातो अशी धारणा प्रचलित आहे. जगामधील 30 पेक्षा अधिक वैज्ञानिकांनी हे सांगितले आहे की कैलासाच्या पर्वतावर हिम मानव अस्तित्वात आहे. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.