Alphamarathi.com

Super Fast Marathi News
फक्त 2 दिवसात चेहऱ्यावरील संपूर्ण काळे डाग निघून जातील.. त्वचा एकदम गोरीपान होईल..

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, चेहरा तेव्हाच सुंदर दिसतो जेव्हा त्यावर कोणतेही डाग नसतात. चेहर्‍यावरील काळे दाग दूर करण्यासाठी अनेक उत्पादने वापरली जातात. बदलती जीवनशैली, अयोग्य आहार आणि प्रदूषणाचा परिणाम आपल्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येतो. या सर्व गोष्टींमुळे आपल्या चेहऱ्यावर काळे डाग पडतात. हे काळे डाग कमी करण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेली उत्पादने किती प्रभावी आहेत,

हे तुमच्या त्वचेवर अवलंबून आहे. मात्र तुम्ही काही आयुर्वेदिक उपायांचा अवलंब करून चेहर्‍यावरील काळे डाग कमी करू शकतात. चला तर मग जाणून घेऊयात हे आयुर्वेदिक उपाय काय आहेत. मित्रांनो, बरेच लोक सुंदर असून देखील खुश नसतात याचे कारण म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर असलेले काळे डाग. काळ्या डागाची समस्या बऱ्याच महिलांना व पुरुषांना देखील जाणवत असते.

आज आपण असाच एक घरगुती उपाय पाहणार आहोत ज्याच्या वापराने चेहऱ्यावरील काळे डाग नाहीसे होतात तसेच चेहरा साफ होण्यास मदत होते, चेहऱ्यावर नवीन तेज निर्माण होते. बऱ्याचदा आपण बाजारामध्ये उपलब्ध असणाऱ्या महागड्या क्रिमचा वापर करतो. तसेच बाजारात उपलब्ध असणारे वेग-वेगळ्या कंपनीचे लेप आणून आपल्या चेहऱ्यावर लावतो.

परंतु असे केल्यानंतर सुद्धा असे दिसून येते की चेहऱ्यावरील डाग तर कमी झाले नाही परंतु अजून त्वचेच्या सं’बंधी समस्या उत्पन्न झाल्या आहेत. घरगुती उपायांकडे आपण दुर्लक्ष करतो. घरगुती आयुर्वेदिक उपाय केले तर सम’स्यांचे निवारण तर होतेच शिवाय त्याचा कुठलाही दुष्परिणाम होत नाही. तर हा घरगुती उपाय कसा करायचा ते पाहूया.

हा उपाय करण्यासाठी सर्व प्रथम आपल्याला लागणार आहे एक छोटा बटाटा. बटाट्याची साले काढून पातळ काप करून घ्या. बटाट्यामध्ये त्वचेवरील डाग कमी करण्याचे गुणधर्म असतात. या नंतर आपण एक लेप तयार करणार आहोत, तो कसा करायचा ते पाहू. लेप तयार करण्यासाठी आपल्याला सात-आठ कडीपत्त्याची पाने लागणार आहेत.

एक खलबत्ता घेऊन त्यामध्ये सात आठ कडीपत्त्याची पाने टाकून त्यामध्ये एक चमचा पाणी टाकून चांगले कुटून घ्या. चेहऱ्यावर जिथे डाग आहेत तेथे बटाट्याचे एक काप घेऊन त्यावर दोन तीन थेंब गुलाब पाणी टाकून घ्या. त्यानंतर बटाट्याच्या कापाने चेहऱ्यावर हलक्या हाताने पाच मिनिट मालिश करा. चेहरा सुकल्या नंतर त्यावर कढीपत्त्याच्या पानाचा लेप लावावा.

चेहऱ्यावर लेप लावल्यानंतर पंधरा ते वीस मिनिटांसाठी हा लेप तसाच राहू द्यावा. पंधरा-वीस मिनिटानंतर लेप पूर्णपणे सुकल्यावर चेहरा पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या. हा उपाय सलग काही दिवस गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यामध्ये होणारा बदल स्पष्ट दिसून येईल. चेहऱ्यावरील काळे डाग हळूहळू कमी होतील. चेहरा स्वच्छ होईल. हा उपाय आयुर्वेदिक असून याचे कोणतेही दुष्परिणाम नाही.

मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.