Alphamarathi.com

Super Fast Marathi News
फक्त 1 कप बेसन असे वापरा.. एकदम सॉफ्ट स्पंज ढोकळा बनेल.. एकदा करून पहाच..

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, आज आपण एक खाद्यपदार्थ पाहणार आहोत जो बनवणे बऱ्याच लोकांना कठीण वाटते पण आज इथे आपण सोप्या पद्धतीने तो खाद्यपदार्थ कसा बनवायचा ते पाहू. त्या पदार्थाचे नाव आहे ढोकळा. ढोकळा म्हटलं की बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की तो कसा बनवायचा ? अचूक प्रमाण नसेल तर बऱ्याच वेळा आपला ढोकळा फसण्याची शक्यता असते.

आज आपण जे प्रमाण पाहणार आहोत ते प्रमाण घेऊन जर तुम्ही ढोकळा बनवला तर तुमची रेसिपी कधीही फसणार नाही. चला तर मग पाहूया ढोकळा कसा बनवायचा ते. सर्वप्रथम आपल्याला येथे एक वाटी बेसन घ्यायचे आहे वजनाने पाहिले तर 120 ग्रॅम बेसन आहे. बेसन आपल्याला चाळून घ्यायचे आहे. बेसन चाळून घेतल्याने आपण जे मिश्रण तयार करणार आहोत ते हलके होण्यास मदत होते.

चाळून घेतलेल्या बेसन मध्ये थोडे-थोडे पाणी घालून व्यवस्थित ढवळून घ्या. एकाच वेळी पाणी घातले तर बेसनच्या गुठळ्या होण्याची शक्यता असते ही गोष्ट लक्षात ठेवा. हे मिश्रण बनवण्यासाठी साधारण अर्धा कप एवढे पाणी लागते. त्यानंतर हे मिश्रण पाच ते दहा मिनिटांसाठी झाकून बाजूला ठेवून द्यावे. थोड्या वेळाने हे मिश्रण घेऊन ते पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यावे.

या मिश्रणामध्ये पाव चमचा हळद, स्वादानुसार मीठ, चिमूटभर हिंग, चिमूटभर साखर, अर्धा चमचा आले आणि मिरचीचा ठेचा, एक चमचा तेल घालून व्यवस्थित ढवळून घ्या. हे सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव झाल्या नंतर आपल्याला येथे एक पॅकेट इनो घालायचे आहे. इनो चा वापर आपल्याला सर्वात शेवटी करायचा आहे. इनो च्या ऐवजी तुम्ही बेकिंग सोड्याचा देखील वापर करू शकता.

परंतु इनोचा वापर केल्यास ढोकळ्याला चव छान येते त्यामुळे शक्यतो इनोचा वापर करावा. इनो घातल्यानंतर लगेचच हलक्या हाताने आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचे आहे, जास्त मिक्स करायचे नाही. हे मिश्रण एकजीव करत असतानाच तुम्हाला दिसून येईल की बेसन फुलण्यास सुरुवात होत आहे. हे मिश्रण ढोकळा बनवण्यासाठी तयार आहे.

ज्या भांड्यामध्ये तुम्हाला ढोकळा बनवायचा आहे त्या भांड्याला आतून तेल लावून हे मिश्रण त्यामध्ये ओता. ढोकळा आपल्याला वाफवून घ्यायचा असल्यामुळे एका मोठ्या भांड्याच्या तळाला थोडे पाणी घालून त्यावर एक जाळी ठेवा. त्या जाळीवर ढोकळ्याचे मिश्रण असलेले भांडे ठेवून झाकण लावा. मंद आचेवर दहा ते पंधरा मिनिटांसाठी या ढोकळ्याला वाफ येऊ द्यावी.

दहा मिनिटांनी झाकण काढून सुरीच्या सहाय्याने ढोकळा शिजलेला आहे की नाही ते पहा. मिश्रण जर सुरीला चिकटले नाही याचा अर्थ तुमचा ढोकळा व्यवस्थित शिजलेला आहे परंतु जर सुरीला मिश्रण चिकटले तर पाच मिनिटांसाठी झाकण लावून हे मिश्रण शिजू द्यावे. आता आपण ढोकळ्यासाठी जो तडका लागतो तो कसा करायचा ते पाहूया. एका कढईमध्ये एक चमचा तेल टाकून ते गरम झाल्यावर त्यावर मोहरी,

हिंग, दोन हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता टाका. आता या फोडणीमध्ये एक कप पाणी घाला. यामध्ये थोडेसे मीठ टाका. आता या पाण्यामध्ये छोटे तीन चमचे साखर घालून हे पाणी चांगले ढवळून घ्या. तुम्ही साखरेचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता या पाण्यामध्ये एक मोठा चमचा लिंबाचा रस घाला. पाण्याला चांगली उकळी येऊ द्यावी. थंड झालेला ढोकळा एका ताटात काढून घ्या.

पाणी गरम असतानाच या ढोकळ्यावर टाकून घ्या यामुळे पाणी ढोकळ्यामध्ये व्यवस्थित मुरते आणि ढोकळा चवीला छान लागतो. आपला ढोकळा तयार आहे. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.