प्रत्येक माणसामध्ये असायला पाहिजेत रावणाचे हे 5 गुण.. एकदा जरूर पहा..
नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, रामायणातील रावण हे असे पात्र आहे ज्याचा प्रत्येक मनुष्य तिरस्कार करतो. परंतु हे पण खरे आहे की रावण अथर्व आणि अहंकारी असून सुद्धा महा ज्ञानी आणि भगवान शंकराचा मोठा भक्त होता. रावणाच्या वाईट कर्मामुळे लोक त्याच्या चांगल्या गुणांना पाहू इच्छित नाहीत. आपल्या हिं’दू शास्त्रामध्ये रावणाच्या अशा श्रेष्ठ गुणांविषयी सांगितले आहे की,
ज्या गुणांना आजही कुठला माणूस अंगीकारेल तर कुठलाही माणूस कधीही हरू शकत नाही तसेच आपल्या ध्येयापासून विचलित होऊ शकत नाही. चला तर पाहूया रावणाच्या अशा गुणांविषयी ज्याला प्रत्येक माणसाने अंगीकारले पाहिजे. १) दुश्मनांची मदत :- रामायणा नुसार जेव्हा राम आणि त्यांची वानर सेना समुद्रकिनारी पोहोचले त्यावेळी ते रामेश्वरम जवळ एक विजय यज्ञ करायचे होते.
विजय यज्ञ संपन्न करण्यासाठी देवतांचे गुरु बृहस्पती यांना बोलावले गेले परंतु काही अडचणींमुळे त्यांना येण्यासाठी जाणे संभव झाले नाही. फार वेळ होऊन गेला होता आणि सर्वजण चिंतेत होते की,आता यज्ञ कसा केला जाईल ? भगवान राम यांनी फार विचार करून एक निर्णय घेतला की, लंकेचा राजा रावण याला पूजेसाठी बोलविले जावे.
भगवान राम यांनी सुग्रीवला रावणाकडे जाण्यास सांगितले. रामाचे हे बोलणे ऐकून सभेमध्ये सर्व आश्चर्यचकित झाले. रावण पंडित म्हणून जाण्यासाठी तयार झाला. रावण ने सांगितले की तुम्ही तयारी करा मी वेळेत येईन. रावण ने आपल्या सोबत माता सीता हिला घेतले आणि भगवान राम यांच्या शेजारी बसवून यज्ञ पूर्ण केला तसेच रामाला विजयाचा आशीर्वाद दिला. सीतेला घेऊन राम पुन्हा लंकेला गेला.
२) चांगला शासक :- लंकापती रावण याने आपल्या राक्षस कुळाच्या कल्याणासाठी अनेक कामे केली. त्याच्या शासन काळात लंकावासी प्रसन्न आणि समृद्ध होते. रावणाच्या शासन काळात अपराध करण्याची कोणी हिम्मत करत नसे. आजच्या काळानुसार रावणाचा राज्य विस्तार वर्तमान इंडोनेशिया, मलेशिया, बर्मा, दक्षिण भारतातील काही राज्यांना मिळून संपूर्ण श्रीलंकेपर्यंत होते.
त्यांना तुमच्या माहितीसाठी सांगतो की, एके काळी श्रीलंके वरती कुबेरच राज्य होते. रावणाने लंकेवर विजय प्राप्त करून कुबेराला हिमालया मध्ये पाठवले. एवढंच नाही तर रावणाने कुबेराचे पुष्पक विमान सुद्धा घेतले. ३) खरा शिव भक्त :- पौराणिक कथानुसार एके दिवशी रावण आपल्या पुष्पक विमानातून कुठेतरी जात होता, तेव्हा वाटेल जंगलाचा एक भाग मिळाला.
भगवान शंकर तेथे ध्यान करत बसले होते. शंकराला भेटण्यासाठी रावण तिथे गेले असता नंदिने त्यांना अडवले आणि आता आपण भगवान शंकर यांना भेटू शकत नाही असे सांगितले. नंदीचे हे बोलणे ऐकून रावणाला आपला अपमान झाला आहे असे वाटले. रावणाचा राग अनावर झाल्यामुळे शंकर भगवान ज्या पर्वतावर बसून ध्यान करत होते तो पर्वत उचलण्याचा प्रयत्न करू लागला त्यावेळी,
भगवान शंकर यांनी आपल्या पायाच्या अंगठ्याने पूर्ण पर्वत खाली दाबून धरला यामुळे रावणाचा हात सुद्धा पर्वत खाली दबला गेला. रावणाला आपली चूक लक्षात आली आणि त्याने शंकराची क्षमा मागितली. शंकराची हीच स्थुती पुढे जाऊन “शिव तांडव स्त्रोत” म्हणून प्रसिद्ध झाली. रावण शकराचा सर्वात मोठा भक्त बनला. ४) परिजनची रक्षा :- लक्ष्मणाने जेव्हा रावणाच्या बहिणीचे म्हणजेच शुरपणकेचे नाक का-पले,
तेव्हा अपमानित शुरपणकाने आपली व्यथा रावणाला सांगितली याचबरोबर सीता फार सुंदर असल्याचे सांगितले. आपल्या बहिणीचा बदला घेण्याचे रावणाने ठरवले. मामा मारीज याच्या सहाय्याने सीता हरण ची योजना बनवली. मारिज याने हरिनाचे रूप धरण केले आणि भगवान राम आणि लक्ष्मण यांना जंगलात घेऊन गेले. यांच्या गैरहजेरीत रावणाने सीतेचे हरण केले.
५) ज्ञानाचा सन्मान :- रावण किती ज्ञानी होता हे त्यांनी रचलेल्या शिवतांडव स्तोत्र होते कळते या स्तोत्रामुळे भगवान शंकर सुद्धा प्रसन्न झाले होते. चार वेद आणि सहा शास्त्र याचे रावणाला ज्ञान होते असे म्हटले जाते. रावणाच्या या ज्ञानाचा सन्मान त्याचे शत्रू सुद्धा करत होते.
मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.