पूजा करताना मनामध्ये घाण विचार का येतात.. असे विचार आले तर काय करायला हवे.. एकदा जरूर पहा..
नमस्कार मित्रांनो..
मित्रांनो, पूजा करतेवेळी तुमच्या मनात कधी वाईट व अ-श्लील विचार आले आहेत का ? तुम्ही कितीही टाळण्याचा विचार केला तरी सुद्धा डोळे बंद करताच पुन्हा तुमच्या मनात हे सर्व विचार येऊ लागतात. जर कोणासोबत असे घडले असेल किंवा वर्तमानात घडत असेल तर अजिबात घाबरून जाऊ नका, असे करणे पाप नाही शिवाय याने तुमची पूजा देखील असफल होणार नाही.
आम्ही हे सांगण्यामागे काही धार्मिक आणि वैज्ञानिक कारण आहेत ज्यामुळे आपल्याला समजते की, आपल्या मनात पूजा करते वेळी असे विचार का येतात आणि त्यांना आपण कसे थांबवू शकतो. ब्रह्म बिंदू उपनिषद हे आपल्या मेंदूतील दोन भागांविषयी सांगते ज्या मधील एक शुद्ध मन असते आणि एक अशुद्ध. ज्या मनुष्याच्या मनात कामना व शरीर सुखाचे विचार येतात,
ते अशुद्ध मन असते याउलट जे मन कामना रहीत असते त्याला शुद्ध मन म्हटले गेले आहे. शुद्ध मनालाच मोक्षाचे कारण सांगितले गेले आहे. तुम्हाला तुमचे मन शुद्ध हवे असेल तर पूजा करत असताना तुमच्या मनात जे काही विचार येत असतील तर त्यांना थांबवू नकात. जर वाईट विचार येत असतील तर येऊ द्यावे यामुळे हळूहळू तुमचे मन वाईट विचारांना बाहेर काढून टाकते,
आणि शुद्ध होते. तुम्ही एकटेच पूजा करते वेळी वाईट विचार करणारे व्यक्ती आहात असे नाही तर प्रत्येक व्यक्तीच्या मनात एकदा तरी वाईट विचार येऊन जातात. कारण काम, क्रोध, लोभ आणि मोह या भावना मनुष्याच्या मनात कधीही जागृत होऊ शकतात. एक गोष्ट लक्षात ठेवा की, जर असे झाल्यास तुम्ही करत असलेले पूजा पाठ विधी अर्ध्यावरती सोडू नका,
कारण हेच एक असे माध्यम आहे जे तुमचे मन शुद्ध करण्यास तुमची मदत करेल. पूजा पाठ करत असताना मन भलेही विचारीत झाले तरी सुद्धा शरीराला देवापासून वेगळे होऊ देऊ नका लवकरच तुमच्या मनात चांगले विचार देखील येऊ लागतील. मुक्ती उपनिषद मध्ये सुद्धा असे सांगितले आहे की, जसा हत्ती अंकुश शिवाय शांत राहू शकत नाही तसेच,
मन देखील अध्यात्मिक विद्या, वा-सनेचा त्याग, सत्संग आणि प्राणायाम शिवाय आपल्या ताब्यात येऊ शकत नाही. आपण एका कथेच्या स्वरूपात समजून घेऊ. एके दिवशी एका गावात एक भिक्षुक येतो. सर्व गावकरी त्या भिक्षुकाच्या आजूबाजूला गोळा होतात आणि आपल्या सम’स्या सांगण्यास सुरुवात करतात. हे सर्व पाहत दूर उभ्या असलेला शामच्या मनात देखील,
आपल्या मनातील सम’स्या विषयी समाधान करून घेण्याची इच्छा निर्माण होते. शामने त्या भिक्षुकाला जाऊन विचारले की, मी माझ्या मनाला माझ्या ताब्यात कसे ठेवू ? यावर तो भिक्षुक म्हणाला की, “मुला हे तर फार सोप्पे आहे यासाठी तुला ध्यान करावे लागेल”. यावर शामने विचारले की, मनावर ताबा मिळवण्यासाठी ध्यान करावे लागेल परंतु हे ध्यान कसे आणि केव्हा करायचे ?
भिक्षुक म्हणाला की, “ध्यान करण्यासाठी कुठलीही वेळ नसते, ध्यान हे केव्हाही आणि कुठेही करता येते”. हे ऐकून शाम ध्यान करण्यास बसला परंतु त्याच्या मनातून अशुद्ध आणि अ-श्लील विचार येणे थांबले नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी शाम पुन्हा त्या भिक्षुकास भेटण्यास गेला. माझ्या मनात जे वाईट विचार येतात त्यावर मी ताबा मिळवू शकत नाही आहे,
कृपा करून मला अजून मार्गदर्शन करा असे शामने ते भिक्षुकास सांगितले. यावर दीक्षित म्हणाला की, जीवनाच्या कुठल्याही सत्याला नाकारू नकोस जर मनात वाईट विचार येत असतील तर ते येऊ दे तुझ्या मनातील विचार थांबवू शकत नाहीस. मनातील विचार हे चांगले किंवा वाईट असे काही नसते. काम वा’सना ही तुझ्या जीवनाचा एक भाग असू शकते पूर्ण जीवन नाही.
मनावर ताबा मिळवायचा असेल तर सर्वात पहिले आपल्या सवयी बदलल्या पाहिजे. ज्या दिवशी तुम्ही स्वतःला चांगल्या प्रकारे ओळखाल त्यादिवशी तुम्ही तुमच्या मनावरती ताबा मिळवू शकता. या कथेतून आपल्याला हे समजते की, ध्यान करून आपले मन आपल्या ताब्यात ठेवता येऊ शकते.
मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.