पितृपक्ष २०२२ गुपचूप इथे फेका थोडेसे तीळ.. पितृदोष होईल दूर.. पितरांच्या आशीर्वादाने पैशांचा ढीग लागेल.. पहा
नमस्कार मित्रांनो..
मित्रांनो, आपल्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा जेव्हा मृ’त्यू होतो तेव्हा ती व्यक्ती पितृ लोकात जाते. दरवर्षी पितृपक्ष येतो पितृ पंधरवडा येतो. आणि ह्या पितृपक्षात आपल्याला सोडून गेलेले आपले पूर्वज आपल्या घरी भोजन घेण्यासाठी येत असतात. अशावेळी त्यांना प्रसन्न करणे हे आपले काम असते. मित्रांनो जर तुमच्या हातून तुमच्या पित्रांच श्राद्ध झालेले नसेल तर आपल्या कुंडली मध्ये पितृदोष निर्माण होतो.
आणि अनेक प्रकारच्या सम’स्या आपल्या जीवनामध्ये वारंवार येत राहतात. आणि म्हणूनच आजच्या लेखामध्ये आपण पितरांना प्रसन्न करणारे काही उपाय पाहणार आहोत. ज्यामुळे आपल्या कुंडलीतील पितृदोष नाहीसा होईल. पितर प्रसन्न होतील. त्यांचे शुभ आशीर्वाद मिळून आपल्या जीवनातील अनेक सम’स्या दूर होतील. यावर्षी म्हणजेच वर्ष २०२२ मधे १० सप्टेंबर ते २५ सप्टेंबर या कालावधी मधे पितृपक्ष आहे.
ह्या दिवसांमध्ये कोणत्याही दिवशी किंवा दररोज जरी तुम्ही हे उपाय केले तरीसुद्धा चालेल. मित्रांनो ज्यांना आपल्या पितरांची तिथी माहीत नसेल कोणत्या तिथीला त्यांचं श्राद्ध घालावं हे जर माहीत नसेल तर सर्वपित्री आमवस्येला तुम्ही तुमच्या पितरांच श्राद्ध घालू शकतात. ज्यांच्या मृ’त्यूची तिथी माहीत नसेल दिनांक माहीत नाही. त्या सर्व पितरांच श्राद्ध हे सर्वपित्री आमावस्येला घालता येत.
आता पाहूया ह्या पितृपक्षात आपण कोणते उपाय करू शकतो. पहिला उपाय, एका तांब्यामध्ये म्हणजे तांब्याच्या धातूपासून जो बनलेला तांब्या आहे. तो घ्यायचा आहे त्यामधे गाईच २ चमचे कच्च दूध, कच्च दूध म्हणजे न तापवलेले दूध आपल्याला टाकायचं आहे. सोबतच थोडेसे जवस, थोडेसे काळे तीळ आणि थोडेसे अक्षद, अक्षद म्हणजे न फु’टले तु’टलेले तांदूळ. तर असे अक्षद टाकायचे आहेत.
आणि यामध्ये शेवटी आपण पाणी टाकायचे आहे. पाण्याने हा तांब्या भरायचा आहे. आणि हे जल आपण कोणत्याही पिंपळाच्या वृक्षास अर्पण करायचं आहे. मात्र लक्षात ठेवा हे जल अर्पण करताना आपल जे तोंड आहे ते दक्षिण दिशेला असावं. दक्षिण दिशेकडे तोंड करून पिंपळाच्या झाडाच्या बुंध्याशी आपण हे जल अर्पण करायचे आहे. आणि आपल्या पितरांचे स्मरण करायचे आहे.
आता दुसरा उपाय जो पितरांना प्रसन्न करवतो तो म्हणजे अन्नदान करणे. जे गोर-गरीब आहेत गरजू व्यक्ती आहेत ज्यांना मदतीची गरज आहे. अशा भुकेले लोकांना आपण अन्नदान करा. कोणतेही धान्य तुम्ही करू शकतात. गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी अगदी कोणतेही धान्य तुम्ही गरजू व्यक्तींना दान करा आणि ह्या वस्तू दान करताना आपण ह्या वस्तू सोबतच एक श्रीफळ, श्रीफळ म्हणजे नारळ,
एक नारळ आणि थोडीशी दक्षिणा अगदी ११ रुपये दिले तरी चालेल यथशक्ती आपण ह्या अन्नदानासोबत एक नारळ आणि दक्षिणा नक्की द्या. मित्रांनो हे जे २ उपाय आम्ही सांगितलेले आहेत ते तुम्ही पितृपक्षामधे कोणत्याही दिवशी करू शकतात. मात्र पुढचा तिसरा उपाय विशेष करून सर्वपित्री आमवस्येला करायचा आहे. ह्या उपयासाठी आपण तांदळाच्या पिठापासून एक पिंड बनवणार आहोत,
आणि ह्या पिंडावरती थोडेसे जव आणि थोडेसे काळे तीळ लावायचे आहेत. आता ही पिंड आपण एखाद्या स्वच्छ पांढऱ्या रंगाच्या कपड्यामध्ये व्यवस्थित बांधायच आहे. त्यानंतर एक पळसाच पान घ्यायचं आहे. आणि ह्या पळसाच्या पानावरती हे पिंड ठेवून वाहत्या पाण्यामधे हे पिंड आपण प्रवाहित करायचं आहे. आपल्या पितरांच्या नावे, त्यांचं स्मरण करत त्यांची आठवण काढत आपण हे पिंड प्रवाहित करायचं आहे.
मित्रांनो ह्यामुळे तुमच्या कुंडलीतील कितीही मोठा पितृदोष असेल तुमचे पितर काही कारणाने तुमच्यावर नाराज असतील तर हे सर्व दोष ह्या उपायामुळे नक्की दूर होतील. मित्रांनो हे जे ३ उपाय आम्ही सांगितलेले आहेत हे सर्व च्या सर्व उपाय तुम्ही केले तरीही चालेल किंवा सर्व उपाय करणे शक्य नसेल तर यापैकी कोणताही एक उपाय जरी तुम्ही केला मनोभावे तरीसुद्धा तुमचे पितर तुमच्यावर नक्की प्रसन्न होतील. त्यांचे शुभाशीर्वाद तुम्हाला नक्की प्राप्त होतील.
मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.