Alphamarathi.com

Super Fast Marathi News
पर पुरूषासोबत पत्नीचे होते सं’बंध जेव्हा राजाला समजले.. पुढे पहा काय झाले.. तुम्हीही चकित व्हाल..

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, पती-पत्नी जीवनाच्या गाडीची दोन चाकं असतात असे म्हटले जाते. दोघांचेही एकत्र चालणे फार गरजेचे असते. जर पती-पत्नी दोघांपैकी एकाने जरी धोका दिला तर काय होते हे आज आपण एका कथेमध्ये पाहणार आहोत. एकेकाळी उज्जैन साम्राज्याचा राजा विक्रमादित्य आणि त्याचा भाऊ भर्थरी राहत होता. असे सांगितले जाते की,

विक्रमादित्य राजा होण्याआधी भर्थरी तेथे राजा होता. त्यावेळी त्या शहरांमध्ये महान योगी गोरखनाथ यांचे आगमन झाले, गोरखनाथ राजाकडे गेले असता राजा भार्थरी याने त्यांचे आदरातिथ्य केले. राजाने केलेल्या सन्मानामुळे गोरखनाथ त्याच्यावर प्रसन्न झाले आणि त्याला एक फळ दिले त्या सोबत असे सांगितले की, हे फळ खाल्ल्यानंतर भर्थरी राजा नेहमी जवान आणि सुंदर राहील.

स्वामी गोरखनाथ महालाबाहेर जातात राजा विचार करू लागला की मला जवान आणि सुंदर राहून काय फायदा आहे त्यापेक्षा मी माझी तिसरी राणी पिंगला हिला हे फळ खायला देतो जेणेकरून ती नेहमीच सुंदर राहील हा विचार करून राजाने ते फळ राणी पिंगला हिला दिले परंतु राजाला हे माहीत नव्हते की, त्याची पत्नी पिंगला राजावर प्रेम करत नसून,

त्या राज्याच्या कोतवालावर प्रेम करीत होती आणि त्याच्यासोबत सं’बंध देखील प्रस्थापित करत होती. त्यामुळे राणी पिंगला हिने असा विचार केला की ते फळ ती कोतवालाला देईल जेणेकरून कोतवाल अधिक काळ तिची अभिलाषा पूर्ण करेल हा विचार करून राणीने ते फळ कोतवालाला दिले. परंतु कोतवाल एका वे-श्येवर प्रेम करीत होता त्यामुळे त्या कोतवालाने,

ते फळ त्या वे-श्येला दिले जेणेकरून ती वे-श्या नेहमीसाठी सुंदर बनून राहील. ते फळ वे-श्याला मिळतात ती विचार करू लागली की जर तिने ते फळ खाल्ले आणि ती आयुष्यभरासाठी सुंदर बनून राहिली तर आयुष्यभर तिला वे-श्येचे काम करावे लागणार आणि त्या नरकातून तिला कधीही मुक्ती मिळणार नाही त्यापेक्षा तिने ते फळ राजाला देण्याचा निर्णय घेतला,

राजा दयाळू होता जर तो जवान राहिला तर प्रजेची सेवा करेल आणि प्रजेला देखील सुख आणि सुविधा प्राप्त करून देत राहील या हेतूने तिने ते फळ राजाला देण्याचे ठरविले. वे-श्या ते फळ घेऊन राजाकडे गेली राजा नेते फळ पाहताच विचारले की ते फळ तिच्याकडे कसे आले यावर तिने सांगितले की ते फळ तिला तिच्या प्रेमी म्हणजेच कोतवालने दिले आहे,

त्यानंतर राजाने कोतवालाला महालात बोलवून घेतले आणि विचारले की हे फळ तुझ्याकडे कसे आले त्यावेळी कोतवाल ने त्याचे आणि राणी पिंगलाचे असलेले प्रेम सं’बंध राजाला सांगितले आणि ते फळ राणी पींगला ने त्याला दिले आहे हे सांगितले. कोतवाल आणि राणी यांचे प्रेम सं’बंध राजाला समजतात राजाला आश्चर्याचा धक्का बसला आपल्या प्रिय पत्नीने,

आपल्याला धोका दिला हे जेव्हा राजाला समजले त्यावेळी राजाच्या मनात वैराग्याची भावना उत्पन्न झाली त्याने आपल्या सर्व सुखाचा त्याग करून आपले संपूर्ण राज्य राजा विक्रमादित्य यांना दिले आणि उज्जैन येथील एका गुहेमध्ये तपश्चर्या करण्यास निघून गेले. असे मानले जाते की राजाने त्या गुहेमध्ये बारा वर्ष तपश्चर्या केली होती. राजा भार्थरी याने अनेक ग्रंथ लिहिले त्यापैकी वैराग्य शतक,

शृंगार शतक आणि नीती शतक हे ग्रंथ बहुचर्चित आहेत. राजा भार्थरी यांची गुहा उज्जैन शहराच्या बाहेर शिप्रा नदीच्या बाजूला एका शांत जागेवर स्थित आहे. या गुहेच्या शेजारी अजून एक छोटी गुहा आहे असे म्हटले जाते की ही गुहा राजा भार्थरी चा भाचा गोपीचंद याची आहे. राजा भार्थरी यांच्या गुहेमध्ये त्यांची एक प्रतिमा देखील आहे आणि त्यासमोर एक यज्ञ आहे ज्याची राख नेहमी गरम असते.

मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.