Alphamarathi.com

Super Fast Marathi News
नवरात्री मध्ये दररोज बोला हा मंत्र इच्छा ताबडतोब होईल पूर्ण.. घरामध्ये सुख, समृद्धी, पैसा सर्वकाही येईल..

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे. अश्विन शुद्ध प्रतिपदेला घरोघरी घटस्थापना केली जाते. यावेळी अखंड दीप प्रज्वलित केला जातो. या वर्षी दोन हजार बावीस मध्ये सव्वीस सप्टेंबर ते पाच ऑक्टोबर पर्यंत नवरात्र असणार आहे. या नऊ दिवसांमध्ये देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. उमा, पार्वती, गौरी, जगदंबा, भवानी ही देवीची सौम्य रूपे आहेत,

तर दुर्गा, काली, चंडी, भैरवी, चामुंडा ही देवीची उग्र रूपे आहेत. नवरात्रीच्या नऊ दिवसात देवीच्या मंत्राचा शक्य तेवढा जास्त उच्चार करा, मंत्र जाप करा. हिं’दू ध’र्मात मंत्र जपाच महत्त्व सांगण्यात आले आहे. हे मंत्र जाप विशिष्ठ तिथींना केले तर याच अनंत पटीने फळ प्राप्त होते.
हे मंत्र पूर्वांपर चालत आले आहेत, या मंत्रांमध्ये खूप शक्ती आहे, ऊर्जा आहे.

म्हणूनच या नवरात्रीमध्ये आपण या मंत्रांचा व श्लोकांचा शक्य तेवढा जास्त जप करायचा आहे. या मंत्रांच्या जपामुळे आपलं मन शांत होतं. घरामध्ये सुख येतं. एवढेच नव्हे तर देवी माता आपल्यावर प्रसन्न होऊन माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये सदैव वास राहतो. देवी मातेच्या कृपेने आपल्या घरात धनधान्याची व पैशाची कमी राहत नाही.

आपल्या घरात कोणत्याही प्रकारची जर नकारात्मक ऊर्जा असेल, अशांतता असेल तर ती सुद्धा मंत्रजपामुळे नक्की नाहीशी होते. आज आम्ही तुम्हाला देवी मातेचा एक मंत्र सांगणार आहोत त्या मंत्राचा नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दररोज अकरा वेळा जप केल्यास तुम्हाला चांगले फळ प्राप्त होईल. कमीत-कमी ११ वेळा किंवा तुम्हाला जेवढे शक्य असेल तेवढ्या वेळा तुम्ही हा मंत्र जप करू शकता.

या मंत्राचा प्रभाव एवढा आहे की, जर तुमच्या मनात एखादी इच्छा असेल तर ती इच्छा या मंत्रामुळे नक्की पूर्ण होईल. माता लक्ष्मीचा स्थायी वास आपल्या घरामध्ये होतो. आपले काही कार्य अडलेली असतील किंवा एखाद्या क्षेत्रामध्ये तुम्हाला यश प्राप्त करायचे असेल ते सुद्धा या मंत्रजपामुळे शक्य होते. चला तर आपण जाणून घेऊया की या नऊ दिवसांमध्ये देवीचा कुठला प्रभावी मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे.

“या देवी सर्वभूतेषु विद्यारूपेण संस्थितः नमस्तस्ये नमस्तस्ये नमस्तस्ये नमो नमः” नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये कधीही तुम्ही या मंत्राचा जप करू शकता. हा मंत्र जाप करण्यापूर्वी तुम्ही तुमचे हात पाय तोंड स्वच्छ धुवायचे आहे आणि त्यानंतर आसनावरती बसून तुम्ही हा मंत्र जप करायचा आहे. सकाळी उठून हा मंत्र जप केला तर चांगलेच आहे.

परंतु जर सकाळी तुम्हाला शक्य झाले नाही तर दिवसभरात कधीही तुम्ही या मंत्राचा जप करू शकता. मंत्र जप करतेवेळी आपले मन शांत ठेवायचे आहे. मन एकाग्र करून जर तुम्ही हा मंत्र जप केला तर याचा चांगला फायदा नक्कीच तुम्हाला अनुभवता येईल. माता लक्ष्मीचे तुमच्या घरात आगमन होईल. माता लक्ष्मीचा वास सदैव तुमच्या घरामध्ये राहील.

तुमच्या मनात असलेली इच्छा देवी मातेच्या कृपेने नक्कीच पूर्ण होईल. मित्रांनो वरील लेख हा सर्वसामान्य धार्मिक माहितीच्या आधारे देण्यात आलेला आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही तरी तसा कोणीही गैरसमज करून घेऊ नये. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.