Alphamarathi.com

Super Fast Marathi News
देवीचे कोणते रूप आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करते.? दुर्गा मातेच्या 9 रूपांचे रहस्य.. पहा

मित्रांनो, तुम्हा सर्वांना माहित आहे की नवरात्रीचा पवित्र सण सुरु झाला आहे. सणाच्या या नऊ दिवसांमध्ये दुर्गामातेच्या विविध रूपांची पूजा केली जाते, परंतु तुम्हाला देवीची नऊ रूपे आणि तिच्या नऊ खास प्रसादाबद्दल माहिती आहे का ? अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथीला सर्व भक्त उपवास करून विधिवत उपवासाची सांगता करतात हे सर्वांनाच माहीत आहे. उपवास करणारे प्रत्येकाची अशी इच्छा असते की, आपण मातेला नैवेद्यमध्ये काय द्यावे ज्यामुळे माता लवकरात लवकर प्रसन्न होईल.

हिं’दूंचा कुठलाच उपवास नैवेद्य आणि प्रसाद शिवाय पूर्ण होत नसतो. उपवास कोणत्याही हेतूने केला जात असला तरी देवतांना नैवेद्य नक्कीच अर्पण केला जातो. नवरात्रीच्या नऊ दिवसात मातेच्या नऊ रूपांना वेगवेगळे नैवेद्य अर्पण केले जातात. १) माता शैलपुत्री :- शुक्ल पक्षातील प्रतिपदा म्हणजे नवरात्रीचा पहिला दिवस, नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मातेचे पहिले रूप माता शैलपुत्रीची पूजा केली जाते.

देवी पर्वतराज ही हिमालयाची कन्या आहे, त्यामुळे तिचे नाव शैलपुत्री पडले. मातेच्या एका हातात त्रिशूळ आणि दुसऱ्या हातात कमळ आहे आणि ती ऋषभावर विराजमान असते. संपूर्ण हिमालय पर्वत मां शैलपुत्रीला समर्पित आहे. या दिवशी उपवास केल्यानंतर गाईचे शुद्ध तूप देवीच्या चरणी अर्पण करावे. त्यामुळे भक्तांना आरोग्याचा आशीर्वाद मिळतो आणि उपवास करणारा निरो’गी राहतो.

२) माता ब्रह्मचारिणी :- आश्विन महिन्याच्या दुसऱ्या दिवशी दुर्गा मातेचे दुसरे रूप असलेल्या ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते. ब्रह्म म्हणजे तपश्चर्या आणि चारिणी म्हणजे आचरण याचा अर्थ तपश्चर्येचे आचरण करणारी असा आहे. माता पार्वतीने भगवान भोलेनाथांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी तपश्चर्या केली होती, त्यामुळे तिचे नाव ब्रह्मचारिणी पडले. मातेच्या उजव्या हातात नामजपासाठी जपमाळ आणि डाव्या हातात कमंडलू आहे. तीला प्रत्यक्ष ब्रह्माचे रूप मानले जाते या दिवशी आईला प्रसन्न करण्यासाठी साखरेचा नैवेद्य दाखवला जातो. देवीच्या उपासनेने तप, त्याग, संयम यांची प्राप्ती होते.

३) माता चंद्रघंटा :- देवीच्या तिसऱ्या रूपात चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते. तिच्या कपाळावर चंद्र अर्ध स्वरूपात आहे. नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी तिची पूजा केली जाते. देवीचे वाहन “वाघ” आहे. तिच्या दहा हातांत कमळ, धनुष्यबाण, कमंडलु, गदा, फूल अशी शस्त्रे आहेत. तिच्या गळ्यात फुलांची माळ आणि डोक्यावर मुकुट आहे. नवरात्रीच्या तिसर्‍या दिवशी चंद्रघंटा मातेची आराधना केल्याने भाविकांना सांसारिक दुःखांपासून मुक्ती मिळते, त्यांना परम आनंद मिळतो. मातेची पूजा करताना दुधाची मिठाई किंवा खीर अर्पण केली जाते.

४) माता कुष्मांडा :- नवरात्रीच्या चौथ्या दिवशी कुष्मांडा देवीची पूजा केली जाते. तिला दुर्गामातेचे चौथे रूप मानले जाते. देवीने आपल्या स्मितहास्याने विश्व निर्माण केले, म्हणून तिला सृष्टीची मूळ शक्ती म्हणून ओळखले जाते. तिचे स्वरूप अतिशय शांत, सौम्य आणि मोहक मानले जाते. तिला आठ भुजा आहेत, त्यामुळे तिला अष्टभुजा असेही म्हणतात. तिच्या सात हातात कमंडल, धनुष्य बाण, फळ, फूल, अमृत, कलश, चक्र, गदा आहे. आठव्या हातात एक जपमाळ आहे जी सर्वांना यश देते. त्यांचे वाहन सिंह आहे चौथ्या नवरात्रीला भक्तिभावाने व्रत करणाऱ्या भक्ताचे सर्व रो’ग नष्ट होतात. बुद्धीचा विकास होतो त्याचबरोबर निर्णय घेण्याची शक्तीही मिळते. पूजा केल्यानंतर मातेला मालपुआ अर्पण केला जातो.

५) माता स्कंदमाता :- पाचव्या दिवशी स्कंदमातेची पूजा केली जाते. स्कंदमाता हे नाव स्कंद आणि माता या दोन शब्दांपासून बनले आहे. स्कंद हे भगवान कार्तिकेयाचे दुसरे नाव आहे. कार्तिकेय भोलेनाथ आणि आई पार्वतीचा मुलगा आहे. म्हणूनच स्कंदमाता म्हणजे कार्तिकेयची आई. तिला चार हात आहेत, तिने एका हातात कार्तिकेय धरले आहे, दुसऱ्या आणि तिसऱ्या हातात कमळ आहे, याशिवाय ती आपल्या चौथ्या हाताने भक्तांना आशीर्वाद देते. आईचे वाहन “सिंह” आहे. ती नेहमी कमळावर बसते. पाचव्या दिवशी मातेच्या या रूपाची पूजा केल्याने भक्तांना सर्व सिद्धी प्राप्त होते, शरीर निरो’गी राहते. दिवसभर उपवास केल्यानंतर आईला केळी अर्पण केली जातात.

६) माता कात्यायनी :- हे दुर्गेचे सहावे रूप आहे. अश्विन महिन्याच्या सहाव्या तिथीला मातेच्या या रूपाची पूजा केली जाते. देवी कात्यायनी ही ऋषी कात्यायन यांची कन्या आहे. त्यांच्या तपश्चर्येने प्रसन्न झाल्यानंतर देवीने त्यांच्या पोटी कन्या म्हणून ज’न्म घेतला म्हणूनच तिला कात्यायनी म्हटले गेले. या दिवशी त्यांना मध अर्पण  केला जातो. तिचे पूजन केल्याने भक्तांना अर्थ, ध’र्म, काम, मोक्ष इत्यादी फल प्राप्त होते. भक्तांचे रो’ग व भीती दूर होते.

७) माता कालरात्रि :- सप्तमी तिथीला मातेच्या कालरात्री रुपाची पूजा केली जाते. काल म्हणजे मृ’त्यू आणि रात्र म्हणजे अंधार, याचा अर्थ अंधार किंवा अज्ञानाचा मृत्यू. माता कालरात्री हे दुर्गेचे सर्वात भयानक रूप आहे, तिच्या गळ्यात विजेच्या माळा आणि केस विखुरलेले आहेत. आईला चार हात आहेत, ज्यामध्ये एक हात वरच्या मुद्रेत आहे, ज्यातून ती भक्तांना आशीर्वाद देते, तर दुसरा हात अभय मुद्रेत आहे, ज्याद्वारे ती भक्तांचे रक्षण करते. तिसऱ्या हातात वज्र आणि चौथ्या हातात टोकदार काटा आहे. तिचे वाहन गाढव आहे. या दिवशी उपवास केल्यानंतर देवीला गुळाचा नैवेद्य दाखवला जातो. अशा प्रकारे मातेच्या पूजनाने व्यक्तीला येणाऱ्या दुःखापासून मुक्ती मिळते, शिवाय ते आपल्या रागावर नियंत्रण आणू शकतात.

८) माता महागौरी :- दुर्गा अष्टमीच्या दिवशी मातेचे आठवे रूप महागौरीची पूजा केली जाते. देवीने मोठी तपश्चर्या करून गौर वर्ण प्राप्त केला आहे. मातेला चार हात असून उजव्या बाजूला वरच्या हातात त्रिशूळ आणि खालचा हात आशीर्वाद मुद्रेत आहे. वरच्या डाव्या हातात अभय मुद्रा आणि खालच्या हातात डमरू आहे. त्यांची स्वारी “बैल” आहे या दिवशी तिला नारळ अर्पण केला जातो. ब्रा’ह्मणांनाही नारळ दान करण्याची प्रथा आहे. ज्या भक्तांना मुले होत नाहीत त्यांच्या मनोकामना ही देवी पूर्ण करते.

९) माता सिद्धिदात्री :- नवरात्रीच्या नवव्या दिवशी माता सिद्धिदात्रीची पूजा केली जाते. सिद्धी म्हणजे अलौकिक शक्ती आणि दात्री म्हणजे दाता किंवा प्रदान करणारी. तिला सर्व प्रकारची शक्ती देणारी असे म्हणतात. या रूपात माता कमळावर बसलेली असून तिला चार हात आहेत, चारही हातात कमळ, चक्र, गदा आणि शंख धारण केले आहे. तिचे वाहन सिंह आहे नवमी तिथीचे व्रत केल्यानंतर त्यांना तीळ अर्पण करावे, जेणेकरून तुमचा दिवस शुभ राहील. त्याचे हे रूप सर्व दिव्य इच्छा पूर्ण करणारे आहे.

पुराणानुसार मातेच्या या रूपाची पूजा केल्याने अणिमा महिमा, गरिमा, लघिमा प्राप्ती प्राकाम्य, ईशित्व आणि वशित्व अशा आठ सिद्धी प्राप्त होतात. आणि असंतोष, आळस, मत्सर इत्यादीपासून मुक्ती मिळते. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.