Alphamarathi.com

Super Fast Marathi News
तुमच्या जन्म कुंडली मध्ये लिहलेले बदलता येते का ? एकदा पहाच हे कसे शक्य आहे ते..

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, हिं’दू ध’र्मामध्ये कुंडली किंवा जन्मपत्रिकेचे फार महत्त्व आहे. घरामध्ये बाळाचा जन्म झाल्यानंतर सर्वप्रथम पंडित कडे जाऊन त्या बाळाची कुंडली बनवून घेतली जाते. असे म्हटले जाते की जन्मापत्रिकेमध्ये जे लिहिलेले असते तेच त्या बाळाचे भाग्य किंवा भविष्य असते. परंतु तुम्हाला माहित आहे का तुमच्या पत्रिकेमध्ये लिहिलेलं बदललं जाऊ शकत की नाही ?

मित्रांनो आपला जन्म झाल्यानंतर आपल्या सोबत जन्मपत्रिका नावाचा दस्तऐवज जोडला जातो. जेव्हा कधी आपल्या घरी पंडित ची उपस्थिती होती त्यावेळी घरातील सर्व लहान मुलांची पत्रिका त्यांना दाखविली जाते. जर मुले छोटी असतील तर त्यांच्या अभ्यासाविषयी आणि आरोग्याविषयी विचारले जाते परंतु जर मोठी व्यक्ती असेल तर,

अशा व्यक्तीच्या नोकरी सं’बंधिच्या समस्या विचारल्या जातात तसेच त्यांच्या लग्नाबाबतच्या समस्या विचारल्या जातात. जन्मापासून ते मृ’त्यूपर्यंत जन्मपत्रिका मनुष्यासोबत चालत असते. बाळ जन्माला आल्यानंतर त्याच्या जन्म वेळेनुसार जन्मपत्रिका तयार केली जाते. बाळाच्या जन्मवेळेनुसार त्या बाळाचे भविष्य कसे असेल याचे अंदाज केले जातात व ते अंदाज जन्मापत्रिकेमध्ये टिपले जातात.

जन्मपत्रिकेमध्ये केले गेलेले अनुमान बरेचदा भविष्यामध्ये खरे ठरलेले दिसतात त्यामुळे असे म्हटले जाते की जन्मपत्रिकेमध्ये जे भविष्य सांगितले जाते ते खरे असते. जन्मपत्रिकेमध्ये लिहिलेले अंदाज बदलायचे असतील तर त्याची देखील एक पद्धत आहे, परिस्थिती आणि वेळेनुसार जो व्यक्ती आपले विचार, व्यवहार आणि संपूर्ण व्यक्तिमत्व बदलण्याचा प्रयत्न करतो,

तो व्यक्ती जन्मपत्रिकेमध्ये लिहिलेल्या गोष्टी सुद्धा बदलू शकतो. हिं’दू ध’र्मामध्ये नेहमीच कर्माला प्राधान्य दिले आहे. एखादा व्यक्ती आपल्या मेहनतीने आपले नशीब बदलू शकतो. जो व्यक्ती स्वतःच्या मेहनती वरती विश्वास ठेवतो त्या व्यक्तीसाठी कुंडली किंवा जन्म पत्रिका महत्त्वाच्या नसतात. रामचरितमानस मधील एका प्रसंगानुसार, निषाद राज सांगतात की,

कैकई कारस्थानामुळे भगवान राम यांना वनवास भोगावा लागला होता. यावर लक्ष्मण यांनी त्यांना उत्तर दिले की कुठलाच व्यक्ती कोणाच्या दुःखाचे कारण बनत नाही. आपण जे कर्म करतो त्यानुसार आपल्याला दुःख भोगावे लागते. वर्तमान काळात प्रत्येकालाच सुख हवे असते परंतु त्या सुखासाठी तो व्यक्ती काय कर्म करतो यावर भविष्यामध्ये त्याला सुख मिळणार की दुःख हे अवलंबून असते.

विज्ञान देखील सांगते की प्रत्येक क्रियेला प्रतिक्रिया असते त्याप्रमाणे शुभ कर्माचे फळ शुभ असते आणि अशुभ कर्माचे फळ हे नेहमी अशुभ असते. एखादा व्यक्ती जर दुःख भोगत असेल तर ते मागच्या जन्माच्या कर्मांचे फळ आहे असे म्हटले जाते. जे व्यक्ती परिश्रम करण्यावर विश्वास ठेवतात आणि प्रामाणिकपणे प्रयत्न करतात देव सुद्धा अशा लोकांची साथ देतो.

त्याचप्रमाणे जो व्यक्ती फक्त आपल्या नशिबाच्या भरवशावर बसून राहतो, प्रयत्न करीत नाही असा व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये कधीही सफल होत नाही शिवाय अशा व्यक्तींना देव कधीही मदत करत नाही. देवाने प्रत्येकाला जीवन जगण्याची शक्ती दिली आहे, मनुष्य त्याची बुद्धी विवेक आणि पुरुषार्थ च्या जोरावर कुठलीही गोष्ट मिळवू शकतो.

हिं’दू ध’र्म ग्रंथानुसार भय, लालच आणि वा’सना सर्व दुःखांचे मूळ आहे. आपण भविष्याच्या भीतीने आपला वर्तमान काळ खराब करत असतो. या भीतीमुळे मनुष्य चांगले कर्म करण्यापेक्षा वाईट कर्म करण्याकडे जास्त लक्ष देतो. जो व्यक्ती ध’र्माचे पालन करतो तो व्यक्ती इर्षा, छ’ळ आणि कपट यापासून अलिप्त असतो, चांगले कर्म करून समाधानी राहतो.

भगवान श्रीकृष्ण यांनी देखील सांगितले आहे की, या जीवनात परोपकार आणि त्यागा शिवाय कोणतेही सुख नाही आहे. या मनुष्य यो-नीमध्ये जर तुम्ही भुकेलेल्या व्यक्तीला अन्न देत असाल तर तुमच्या एवढा सुखी आणि समाधानी व्यक्ती पृथ्वीवरती दुसरा कोणीही नसेल. जर तुम्ही परोपकारी व्यक्ती असाल तर या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी तुम्ही एक आहात.

ईश्वरावर विश्वास ठेवा आणि सत्कर्म करत रहा हेच आपल्याला सुखी व समाधानी ठेवण्यास मदत करेल. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.