खरेच गंगा मध्ये स्नान केल्याने सर्व पापे माफ होतात का .? जाणून घ्या यामागील रहस्य.. बघा श्रीकृष्ण काय म्हणतात..
नमस्कार मित्रांनो..
मित्रांनो, आपल्या सनातन ध’र्मात गंगा नदीला देव नदी मानले जाते. हिं’दू ध’र्मात गंगा नदीला पवित्र नदी मानले गेले आहे. तुम्हाला पण माहित असेल गंगा नदीमध्ये स्नान केल्याने मनुष्य पाप मुक्त होतो. हिं’दू ध’र्म ग्रंथात वर्णन केलेल्या एका कथेनुसार, एके दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती गंगा नदीच्या काठी फिरत होते तेव्हा माता पार्वती यांनी पाहिले की,
हजारो श्रद्धाळू गंगेमध्ये स्नान करत आहेत आणि भगवान शंकराचे नामस्मरण करत आहेत. ते दृश्य पाहून माता पार्वती आश्चर्यचकित झाली आणि याबाबत तिने भगवान शंकर यांना विचारणा केली की, गंगेला पापनाशिणी असे म्हटले जाते परंतु इथे स्नान करत असलेल्या कोणालाही पापातून मुक्ती मिळाली नाही. गंगा आता पवित्र राहिली नाही का ? यावर भगवान शिव म्हणाले की,
देवी पार्वती तुम्हाला असे का वाटत आहे ज्या लोकांना तुम्ही स्नान करताना पाहिले त्या लोकांनी वास्तविक मध्ये गंगेत स्नान केलेच नाही गंगा पूर्वी इतकीच पवित्र आहे. पार्वतीला भगवान शंकरांचे म्हणणे तेवढेसे पटले नाही. भगवान शंकर त्यांना म्हणाले की, ही सर्व लोक फक्त पाण्यामध्ये अंघोळ करून येत आहेत यापैकी कोणीही गंगेच्या पवित्र पाण्यामध्ये स्नान करून येत नाहीत,
माझ्या या बोलण्याचे रहस्य तुम्हाला आज कळणार नाही, तुम्ही माझ्यासोबत उद्या पुन्हा इथे या तेव्हा तुम्हाला सर्व रहस्य समजतील. एवढे बोलून भगवान शंकर आणि माता पार्वती कैलासात परतले. दुसऱ्या दिवशी भगवान शंकर आणि पार्वती यांच्या पृथ्वीवर येण्याआधीच पाऊस सुरू झाला होता त्यामुळे सगळीकडे चिखल झाला होता.
हे पाहून भगवान शंकरांनी स्मितहास्य केले व एका वृद्धाचे रूप घेऊन गंगा किनारी प्रकट झाले. गंगा किनारी असलेल्या एका खड्ड्यात जाऊन झोपी गेले. गंगा किनारी लोक जमू लागले तेव्हा भगवान शंकर त्या खड्ड्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करू लागले. आता पार्वती देखील वृद्ध स्त्रीचे रूप घेऊन त्या खड्ड्याच्या बाजूला उभी होती तिने जमा झालेले लोक पाहून जोर जोरात ओरडून,
त्या वृद्ध पुरुषाला बाहेर काढण्यासाठी मदत मागू लागली. त्या वृद्धाश्रिने सांगितले की, “जो कोणी माझ्या पतीला बाहेर काढेल त्याने मला विश्वास द्यायला हवा की, त्याने जीवनात कुठलेही पाप केलेले असता कामा नये असे असल्यास ज्या क्षणी तो माझ्या वृद्धपतीला हात लावेल त्या क्षणी तो जळून जाईल.” हे ऐकून तेथे उपस्थित असलेला एकही माणूस मदत करण्यासाठी पुढे आला नाही.
कितीतरी लोक गंगेमध्ये स्नान करून सुद्धा मदत करण्यास घाबरत होते. संध्याकाळ होत आली तरीसुद्धा कोणीही मदत करण्यासाठी आले नाही, त्याचदरम्याने एक पुरुष गंगेमध्ये नुकतीच स्नान करून येत होता. त्याने पाहिले की, एक वृद्ध खड्ड्यामध्ये अडकला आहे, त्याने कसलाही विचार न करता त्या वृद्ध स्त्रीला म्हणाला की, मी मदत करतो. यावर ती वृद्ध स्त्री म्हणाली की,
“जर तू आयुष्यात कुठलेही पाप केले नसशील तरच मदतीला ये नाहीतर तू ज’ळून भस्म होशील” यावर तो पुरुष म्हणाला की, “मला त्याची भीती वाटत नाही कारण जर मी कुठलेही पाप केले असले, तरीही मी आत्ताच गंगेत स्नान करून आलो आहे” आणि असे बोलून त्याने त्या वृद्धाला खड्ड्यातून बाहेर काढले. त्याच्या या बोलण्यावर आणि मदतीवर प्रसन्न होऊन भगवान शंकर आणि माता-पार्वती यांनी त्याला,
खऱ्या रूपात दर्शन देऊन आशीर्वाद दिला व तिथून निघून गेले. भगवान शंकर यांना गंगेत स्नान करण्याविषयी काय म्हणायचे होते हे तर आपणा सर्वांना कळले असेलच फक्त शरीरशुद्धीसाठी गंगेत स्नान केले म्हणजे आपली पापे धुतली जातात असे नाही. तर मन शुद्ध करण्यासाठी गंगेत स्नान करावे आपण केलेल्या पापांचे प्रायश्चित्त करावे म्हणजे खऱ्या अर्थाने आपण शुद्ध होतो.
मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.