Alphamarathi.com

Super Fast Marathi News
कसा झाला मृत्यू चा जन्म.. ज’न्माला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा मृत्यू का होतो.? आणि हे कधीपासून चालू झाले बघा या मागील रहस्य..

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, हे तर आपण सर्वजण जाणतो की, पृथ्वीवरती प्रत्येक जण ज’न्म घेतो आणि ज-न्म घेतलेल्या प्रत्येकाचा मृ’त्यू होतो. परंतु तुम्हाला हे माहित आहे का.? ज्यावेळी ही सृष्टी निर्माण झाली त्यावेळी कोणाचाही मृ-त्यू होत नव्हता. आता तुम्हाला असा प्रश्न पडेल की ह्या सृष्टी वरती जगणाऱ्या जी’वांचा मृ’त्यू कधी होऊ लागला.? भगवान शंकर यांनी,

सृष्टी निर्माण करण्याचे कार्य ब्रम्हाजींवर सोपविले होते. भगवान शंकरांचा आदेश मानून ब्रम्हाजींनी सृष्टी निर्माण करण्यास सुरुवात केली. असे मानले जाते की, या सृष्टीचा अनेकदा विनाश झाला आहे आणि अनेकदा ही सृष्टी पुन्हा निर्माण करण्यात आली आहे. आपण आता त्या काळाबद्दल पाहणार आहोत जेव्हा ब्रह्मदेवाने प्राणी जीव, जंतू यांची पृथ्वीवर रचना केली होती.

रचना केल्यामुळे आणि त्यांचा मृ-त्यू न झाल्यामुळे हळूहळू या जीव, जंतू, प्राणी यांची संख्या वाढू लागली याचे हेच कारण होते की, नवीन जीव उत्पन्न होत होते परंतु कोणाचाच मृ’त्यू होत नव्हता. ब्रह्मदेवांना असा प्रश्न पडला की, हे जर असेच चालू राहिले तर पृथ्वीवर भार निर्माण होऊन पृथ्वी रसातळाला जाईल. ब्रह्मदेव पृथ्वीवर पडणाऱ्या या भाराचे संतुलन कसे करायचे यावर विचार करू लागले.

फार विचार करून काहीच मार्ग न मिळाल्यामुळे ब्रम्हाजींचा क्रोध अनावर झाला आणि त्यातून अग्नी प्रकट झाला. हा अग्नी पूर्ण पृथ्वीवरती जी’वजंतू, प्राणी, पक्षी, झाडे यांचा विनाश करू लागला. हा विनाश पाहून सर्व देवी देवता चिंतेत पडले. भगवान शंकर ब्रह्माजी जवळ आले आणि त्यांना सांगितले की, ह्या क्रोधग्नीमुळे फक्त जी’वजंतूच नाही तर डोंगर नद्या, पर्वत हे सर्वच नष्ट होत आहे.

प्राण्यांचा विनाश करण्यासाठी दुसरा पर्याय शोधून काढा आणि हा क्रोधागनी शांत करा असे सुचविले. भगवान शंकराने समजुत काढल्यानंतर ब्रह्माजींनी क्रोधागनी शांत केला. अग्नीला आपल्या शरीरात पुन्हा सामील करून घेतेवेळी त्यांच्या इंद्रियांमधून काळी, लाल आणि पिवळ्या रंगाची एक स्त्री उत्पन्न झाली. या स्त्रीला ब्रह्मदेवांनी “मृ-त्यू” म्हणून संबोधले. ब्रम्हाजींनी त्या स्त्रीला सांगितले की,

माझ्या क्रोधगनी मुळे तुझी उत्पत्ती झाली आहे, तिन्ही लोकांच्या प्राण्यांचा विनाश करण्यासाठी मी तुला नेमत आहे. यावर त्या स्त्रीला आपण हे पाप करतोय असे वाटले आणि ती स्त्री रडू लागली व एक स्त्री असून मी हे कृत्य कसे करू असे विचारले.? त्या स्त्रीच्या डोळ्यातून येणारे अश्रू ब्रम्हाजीने आपल्या हातावर घेतले आणि त्या स्त्रीला सांगितले की, तू माझ्या आज्ञेचे पालन कर तुला यासाठी पाप लागणार नाही,

आणि सनातन ध’र्म तुला कायम पवित्र बनवून ठेवेल. त्या स्त्रीने ब्रम्हाजींनी दिलेल्या आदेशाचे पालन केले आणि तेव्हापासून या पृथ्वीवरील प्रत्येक जीव मृ’त्यूला सामोरा जात आहे. असे मानले जाते की, तेव्हापासून या पृथ्वीवरती प्राणी पक्षी जी’वजंतू व ज’न्माला आलेल्या प्रत्येकाचा मृ’त्यू होऊ लागला आहे. याला मृ’त्यूलोक असेही म्हटले जाऊ लागले.

टीप :- मित्रांनो वरील लेख हा सर्वसामन्य धार्मिक माहितीच्या आधारे देण्यात आलेला आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. तरी तसा कोणीही गैरसमज करून घेऊ नये. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.