आपण केलेले पाप पुण्यामध्ये कसे बदलायचे.. तुम्हाला जर केलेल्या पापांचा त्रास भो’गायचा नसेल तर एकदा जरूर पहा..
नमस्कार मित्रांनो,
आपण आपल्या इच्छा आणि गरजा पूर्ण करण्यासाठी आयुष्यभर अनेक पापकर्मे करतो. परंतु जेव्हा आपली अंतिम वेळ जवळ येते तेव्हा आपल्याला त्याच पापांच्या परिणामाचा विचार करून भीती वाटते. अशावेळी आपण विचार करत असतो की, या केलेल्या सर्व पापांचे पुण्यात रूपांतर झाले तर.? तुम्ही देखील अनेक बुद्धिमान व्यक्तींकडून असे ऐकले असेल की,
वाईट कर्म केल्याने मिळालेल्या फळाचे चांगली कर्मे करून पुण्यात रूपांतर करता येते. खरच असं करता येऊ शकत का.? पापकर्म केल्याने मिळणाऱ्या शिक्षे पासून स्वतःला वाचवता येऊ शकते का.? पाप आणि पुण्य या दोन गोष्टीबद्दल जाणून घेण्याआधी तुम्हाला एक कथा सांगतो. फार फार वर्षांपूर्वी एका राज्यामध्ये एक अत्यंत क्रूर आणि दृष्ट राजा राज्य करत होता.
तो आपल्या प्रजेला सतावण्याचा आणि त्यांच्याकडून धन लु’टण्याची एकही संधी सोडत नसे. परंतु एके दिवशी अचानक त्याने आपल्या प्रजेला सतावणे बंद केले आणि आपला पूर्ण वेळ सत्कर्म करण्यात घालवू लागला. गरजू लोकांची मदत करू लागला. भिकारी लोकांसाठी जेवणाचे सोय करू लागला. गरिबांना धन वाटू लागला. नंतर ती वेळ सुद्धा आली जेव्हा राजा अचानक आ’जारी पडला.
एकीकडे राजा मृ’त्यूच्या वाटेवर होता आणि त्याचवेळी त्याच्या तरुण मुलाचा मृ’त्यू झाला. एवढेच नव्हे तर पुत्रशोकाचे दुःख सहन न झाल्याने राणीने आ’त्मह’त्या केली. राजा हे सर्व पाहून खूप दुःखी झाला. त्याचे कुटुंबाचा त्याच्या डोळ्यांदेखत सर्वनाश होत होता. परंतु तो काहीच करू शकत नव्हता. अशावेळी उदास होऊन त्याने आपल्या महामंत्र्याला विचारले की,
मी तर बऱ्याच वर्षांपूर्वी पापकर्म करणे सोडून दिले होते आणि लोकांची सहायता सुद्धा करत होतो. दान, ध’र्म आणि पूजा पाठ देखील करत होतो. मग मला देवाने कसली एवढी शिक्षा दिली आहे ? मी तर एकले होते की पुण्य केल्याने पापाचे ओझे कमी होते तर मग माझ्यासोबतच असे का झाले ? राजाच्या या प्रश्नावर महामंत्री म्हणाला महाराज पुण्य केल्याने पापाचे ओझे कमी होत नाही तर,
त्यासाठी प्रायश्चित्त करणे आवश्यक असते. माणूस आयुष्यभर पाप करतो आणि तरीदेखील देवाकडून अशी अपेक्षा करतो की, त्याने केलेल्या पापांची शिक्षा त्याला मिळू नये, हे शक्य आहे का.? तुम्ही जे कर्म केलेले आहात ते चांगले असू दे किंवा वाईट तुम्हाला त्याचे फळ भो’गावेच लागते असे आपल्या शास्त्रामध्ये सुद्धा लिहिलेले आहे. माणूस आपल्या दुःख आणि त्रा’सांसाठी देवाला आणि नशिबाला दोष देत असतो,
परंतु तो हे विसरतो की, त्याच्यासोबत जे काही होत आहे ते त्याच्या कर्मांचेच फळ आहे. महाराज तुम्हाला हे दुःख तुम्ही स्वतः केलेल्या चुकांमुळे आणि वाईट कामांमुळे मिळाले आहे. महामंत्रीचे हे बोलणे ऐकून राजा संतापला आणि म्हणाला जर असेच आहे तर मी केलेली सर्व सत्कर्मे व्यर्थ आहेत का.? जर मला हेच दिवस बघायचे होते तर मी पापकर्म करण्याचे का सोडून दिले असते ?
राजाच्या या प्रश्नाचे उत्तर देताना महामंत्री म्हणाला की- महाराज तुम्ही जे काही कर्म केलेले आहे त्याचे फळ तुम्हाला मिळणारच. परंतु तुम्ही जे पाप केलेले आहे त्याचे फळ तुम्हाला आता मिळत आहे. तुम्ही जे पुण्य कर्म केलेले आहे त्याचे फळ सुद्धा तुम्हाला नक्कीच मिळणार. त्यावर राजाने विचारले की, पाप कर्म केल्याने मिळणाऱ्या शिक्षेला कमी करण्याचा कोणताच उपाय नाही का ?
त्यावर महामंत्री म्हणाला महाराज एक उपाय आहे आणि तो म्हणजे “प्रायश्चित्त”. कुठल्याही पापाचे पुण्यामध्ये रूपांतर करता येत नाही जर तुम्हाला पुण्याचे फळ मिळवायचे असेल तर त्यासाठी तुम्ही सत्कर्म करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे जर तुम्हाला तुमच्या पापांची शिक्षा कमी करायची असेल तर त्यासाठी तुम्ही मनापासून प्रायश्चित्त केलेच पाहिजे. महाभारतामध्ये सुद्धा सांगितले गेलेले आहे की,
जो व्यक्ती पश्चाताप करतो तो पापांपासून मुक्त होतो. लक्षात ठेवा पश्चात्ताप मनापासून केले पाहिजे. मनामध्ये असा दृढ निश्चय केला पाहिजे की, इथून पुढे मी पाप कर्म माझा जी’व गेला तरी करणार नाही. हे नेहमी लक्षात ठेवा की, आपले वाईट व्हावे अशी देवाची कधीच इच्छा नसते देव फक्त आम्हाला सत्कर्माचा मार्ग दाखवत असतो. म्हणूनच आपल्याला आपण केलेल्या पापकर्माची शिक्षा देतो.
शिवपुराण मध्ये सुद्धा पापाच्या मुक्तीसाठी पश्चाताप हाच उपाय सांगितला आहे. पश्चाताप हा फक्त दाखवण्यासाठी करू नये. तो मनापासून केला पाहिजे. राजा तसे बघितले तर पुण्य कर्म करत होता परंतु त्याने मनापासून कधीच देवाची आराधना केली नाही. त्याने कधीच आपण केलेल्या पापकर्मासाठी पश्चाताप केला नाही. जर त्याने मनापासून पश्चाताप केला असता तर त्याला मिळणारी पापाची शिक्षा कमी झाली असती.
मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.