Alphamarathi.com

Super Fast Marathi News
आजही या ठिकाणी पाहायला मिळतात भगवान शंकर आणि माता पार्वतीच्या लग्नाचे पुरावे.. अनेक लोक येथे जाऊन.. पहा पुढे

श्री महादेव शंकर आणि माता पार्वती यांच्या प्रेमाची चर्चा कोणापासून लपलेली नाही. दोघांच्या प्रेमाची चर्चा आजही लोकांमध्ये होत असते महादेव शंकर आणि माता पर्वती यांचा विवाह महाशिवरात्रीच्या पहाटे झाला असे मानले जाते. परंतु कित्येक लोकांच्या मनात असे प्रश्न उभे राहतात की या दोघांचा विवाह कधी आणि कुठे झाला होता? मित्रांनो भारताच्या उत्तराखंड राज्यातील त्रीयोगीनारायण मंदिर हे एक असे पवित्र आणि पौराणिक मंदिर आहे जिथे वर्षानुवर्षे अखंड ज्योती तेवत आहे याच अखंड ज्योतीला साक्षी मानून,

श्री महादेव शंकर आणि माता पार्वती यांनी विवाह केला होता. हे स्थान रुद्रप्रयाग जिल्ह्याचा एक भाग आहे. असे मानले जाते की भगवान श्रीहरी विष्णू हे माता लक्ष्मी आणि  भुदेवी सोबत या मंदिरामध्ये विराजमान आहेत. या विवाहबद्दल असे मानले जाते की माता-पार्वतीला शंकरा सोबत विवाह करायचा होता याचवेळी सर्व देवांची सुद्धा हीच इच्छा होती की पर्वत राजकन्या पार्वतीचा विवाह श्री महादेव शंकरांसोबत व्हावा. परंतु श्री महादेव शंकराच्या बाजूने अशी कोणतेच इच्छा व्यक्त होत असलेले दिसून येत नव्हते,

म्हणूनच माता-पार्वतीने असा निश्चय केला होता की त्यांनी विवाह केला तर केवळ श्री महादेव शंकरा सोबतच करणार. शंकराला आपला पती बनवण्यासाठी माता पार्वतीने कठोर तपश्चर्येला सुरुवात केली. हे बघताच श्री महादेव शंकराने आपले डोळे उघडले आणि पार्वतीला सांगितले की, कोणीतरी समृद्ध राजकुमार पाहून लग्न करून घे. त्यांनी हे देखील सांगितले की एका तपस्वी सोबत जीवन व्यतीत करणे एवढे सोपे नसते परंतु माता पार्वती ही खूपच हट्टी होती. तिने स्पष्ट शब्दात सांगितले की ती विवाह करणार तर फक्त महादेव शंकरासोबतच करणार.

मातेचा हा हट्ट पाहून श्री महादेव शंकर तिच्यासोबत लग्न करण्यासाठी तयार झाले. श्री भगवान शंकर आणि माता पार्वतीच्या तपश्चर्येसाठी खुश होऊन फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातल्या चतुर्दशीच्या दिवशी पार्वती सोबत विवाह केला होता. असे सांगितले जाते की माता पार्वतीने जिथे तपश्चर्या केली होती ते स्थान आत्ता केदारनाथ च्या बाजूला स्थित गौरीकुंड हे आहे आणि तपश्चर्या पूर्ण झाल्यानंतर गुप्तकाशी मध्ये भगवान शंकराच्या समोर विवाहाची मागणी घातली आणि शंकराने तिचे मागणी मान्य सुद्धा केली. मित्रांनो असे सांगितले जाते की, दोघांनी जिथे विवाह केला त्या मंदिरामध्ये आजही अग्नी प्रज्वलित असते. हे अग्नी श्री महादेव शंकर आणि माता पार्वती यांच्या विवाहाचे प्रतीक मानले जाते.

म्हणूनच या मंदिराला “अखंड धुनी” मंदिर असे म्हटले जाते. हेच कारण आहे की या स्थानाचे नाव “त्रियुगी” असे पडले याचा अर्थ असा आहे की, अग्नि जी तीन युगांपासून जळत आहे. त्रियुगीनारायण हीमावत राज्याची राजधानी होती. इथे शिवपार्वतीच्या विवाह मध्ये श्री भगवान श्रीहरी विष्णूंनी पार्वतीच्या भावाच्या रूपामध्ये सर्व रीती रिवाजांचे पालन केले होते आणि ब्रह्माजींनी या विवाह मध्ये पुरोहिताचे काम पाहिले होते. विवाहाच्या वेळी सर्व ऋषीमुनी सहभागी झाले होते विवाह स्थळ म्हणजे ज्या ठिकाणी विवाह झाला त्या जागेला ब्रह्मशीला असे म्हणतात.

ती जागा मंदिराच्या बरोबर समोरच आहे पौराणिक साहित्यामध्ये या मंदिराच्या महात्म्याचे वर्णन सुद्धा केलेले आहे असे सांगितले जाते की, विवाहाच्या वेळी भगवान शंकराला एक गाय भेट म्हणून प्राप्त झाली होती त्या गाईला मंदिरातीलच एका स्तंभाला बांधण्यात आले होते. विवाहाच्या आधी सर्व देवतांनी या ठिकाणी स्नान सुद्धा केले आणि म्हणूनच इथे तीन कुंड तयार केलेले आहेत ज्यांना रुद्र कुंड विष्णू कुंड आणि ब्रह्मकुंड असे म्हटले जाते. ब्रह्मकुंड या कुंडामध्ये ब्रह्माजींनी शिवपार्वतीच्या विवाहा आधी स्नान केले होते आणि स्नान केल्यानंतर ब्रह्माजी विवाह मध्ये पुरोहित म्हणून उपस्थित राहिले.

विष्णू कुंड या कुंडामध्ये शिवपार्वतीच्या विवाहा अगोदर भगवान श्रीहरी विष्णूंनी स्नान केले होते रुद्र कुंड या कुंडामध्ये विवाहासाठी उपस्थित असलेल्या सर्व देवी देवतांनी स्नान केले होते या तिन्ही कुंडांमध्ये पाणी सरस्वती कुंडा मधून येते, ही गोष्ट बहुतेक लोकांना माहीतच नाही आहे की सरस्वती कुंडाची निर्मिती हे भगवान श्रीहरी विष्णूंच्या नासिकेपासून झाली होती. असे मानले जाते की, या कुंडामध्ये स्नान केल्यानंतर संतान हिनतेपासून मुक्ती मिळते जे भक्त लोक या पवित्र स्थानाची यात्रा करतात ते इथे प्रज्वलित असलेल्या अखंड ज्योतीचा अंगारा स्वतःसोबत घेऊन जातात जेणेकरून त्यांचे वैवाहिक जीवन माता पार्वती आणि भगवान शंकराच्या आशीर्वादाने नेहमी सुखमय होईल.

मित्रांनो वेदांमध्ये या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे की त्रियुगीनारायण हे मंदिर त्रेतायुगापासून स्थापित आहे. केदारनाथ आणि बद्रीनाथ ही मंदिरे द्वापार युगात स्थापन करण्यात आली होती असेही मानले जाते की, या ठीकाणी भगवान श्रीहरी विष्णू वामन अवतार धारण केला होता पौराणिक कथांच्या नुसार इंद्रासन प्राप्त करण्यासाठी राजा बलीला शंभर यज्ञे करायची होती यामध्ये ९९ यज्ञ राजा बलीने पूर्ण केली होती आणि शंभरावे यज्ञ करण्याआधी भगवान श्री हरी विष्णूंनी वामन अवतार धारण करून त्याला रोखले आणि त्यामुळे राजा बलीचे यज्ञ भंग झाले. म्हणूनच इथे वामन अवतारातील भगवान श्रीहरी विष्णूंना पुजले जाते.

आज रुद्रप्रयाग जिल्ह्यामध्ये वसलेले शिव आणि पार्वती यांच्या विवाहाचे ठिकाण त्रीयुगीनारायण मंदिर हे वेडिंग डेस्टिनेशन म्हणून सुद्धा चर्चेत आहे. मोठ्या संख्येने लोक इथे येऊन सात फेरे घेतात. गेल्या एक वर्षातील आकड्यांवर नजर टाकली तर वर्षभरात शेकडो देशी-विदेशी जोड्यांनी या मंदिरामध्ये विवाह केला आहे. पूर्वीपासूनच उत्तराखंड हे एक पवित्र स्थान म्हणून ओळखले जाते. देश आणि विदेशातील वेग-वेगळ्या ठिकाणाहून तीर्थयात्री पर्यटक आणि वाटसरु अध्यात्म आणि शांती मिळवण्यासाठी या प्रदेशातील मंदिरे आणि तीर्थक्षेत्रांमध्ये येत असतात रुद्रप्रयाग जिल्ह्यातील सोनप्रयाग मार्गाने बारा किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर तुम्ही या मंदिरापर्यंत पोहोचू शकता.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.