अमरनाथ गुहेतून अचानक बाहेर आला एक रहस्यमय साधू .. त्यावेळी बघा काय घडले होते.? पाहून तुम्हीही..
नमस्कार मित्रांनो..
मित्रांनो, हि गोष्ट आहे १८५० च्या जवळपासची कश्मीर मध्ये एक धनगर आपल्या बकऱ्यांना चरायला घेऊन गेला होता. तो बकऱ्यांना चरवता चरवता खूप दूर पर्वतीय भागात निघून गेला. तो तिथे आजूबाजूला पाहू लागला चारही बाजूंच्या बर्फाच्या उंच उंच पर्वतांनी त्याला मंत्रमुग्ध करून टाकले होते. त्याचवेळी अचानक त्याला जाणीव झाली की, तो रस्ता विसरला आहे.
रस्ता शोधत शोधत तो एका पर्वताकडे पोचला होता ज्या ठिकाणी एक गुहा बनलेली होती. त्याने विचार केला की, त्या गुहे कडे बसून थोडा वेळ आराम करूया. त्याने आपले डोळे बंद केले आणि काही वेळासाठी झोपला. परंतु ज्यावेळी त्याने आपले डोळे उघडले तेव्हा त्याच्यासमोर विशाल शरीरयष्टी असणारा, लांब जटा असणारा एक तेजस्वी साधू उभा राहिला होता.
तो साधू त्याच गुहेतून बाहेर पडला होता हे सर्व पाहून तो धनगर खूप आश्चर्यचकित झाला होता. अमरनाथ यात्रा ही श्री महादेव शंकराच्या भक्तांसाठी सर्वात प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. जे भगवान शंकराच्या प्राकृतिक रूपाने बर्फापासून बनलेल्या शिवलिं’गासाठी प्रसिद्ध आहे. या धार्मिक तीर्थक्षेत्राची यात्रा करण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक जातात याच यात्रेला “अमरनाथ यात्रा” असे म्हटले जाते.
या ठिकाणी श्री महादेव शंकरांनी देवी पार्वतीला अमृताचे रहस्य सांगितले होते. या गुहेमध्ये देवी पार्वती शक्तीपीठ सुद्धा स्थित आहे. या शक्तिपीठाबद्दल असे सांगितले जाते की, हे शक्तिपीठ माता सतीच्या एक्कावन शक्तिपीठांमधील एक शक्तीपीठ आहे. या ठिकाणी माता सतीचा कंठ येऊन पडला होता. पुरातत्त्व विभागानुसार अमरनाथ गुहा ५ हजार वर्षांपूर्वीची गुहा आहे.
अर्थात महाभारत काळामध्ये सुद्धा ही गुहा अस्तित्वात होती परंतु त्यांचा हा अंदाज चुकीचा पण असू शकतो कारण प्रश्न हा उभा राहतो की, जर पाच हजार वर्षांपूर्वी ही गुहा अस्तित्वात होती तर त्याआधी ही गुहा तिथे नव्हती का ? अमरनाथ गुहे बद्दल एक अशी सत्य घटनेवर आधारित गोष्ट आहे जे ऐकल्यानंतर तुम्ही थक्क व्हाल. साधारणता आज पासून १७२ वर्षांपूर्वी एक धनगर,
अमरनाथ गुहेच्याजवळ आपल्या बकऱ्यांना चरवत होता त्यावेळी त्याला हे माहीत नव्हते की ती अमरनाथ गुहा आहे. तो आपल्या बकऱ्यांना चालवत असताना रस्ता विसरून अमरनाथ गुहेच्या अगदी समोर येऊन पोहोचला ती गुहा पाहून त्याने विचार केला की, इथे थांबून थोडा विश्राम करेन. थोड्या वेळानंतर पुन्हा रस्ता शोधेन त्याने आपले डोळे बंद केले आणि झोपी गेला,
परंतु ज्यावेळी त्याने आपले डोळे उघडले तेव्हा त्याच्यासमोर विशाल शरीरयष्टी असणारा, लांब जटा असणारा एक तेजस्वी साधू उभा राहिला होता. तो साधू त्याच गुहेतून बाहेर पडला होता. त्या साधूला पाहून तो धनगर खूप आश्चर्यचकित झाला. साधुने त्या धनगराला एक कोळशाने भरलेली बादली दिली आणि तिथून जाण्यास सांगितले. त्या साधूने सांगितल्याप्रमाणे तो धनगर तेथून निघून गेला.
त्यानंतर त्या धनगराने पाहिले तर त्या कोळशाचे रूपांतर सोन्यामध्ये झाले होते हे पाहून तो धनगर आश्चर्यचकित झाला. धनगर पुन्हा त्या गुहेकडे आला तेव्हा त्या गुढीकडे त्याला तो साधू दिसला नाही. गुहेच्या आत गेल्यानंतर त्याला एक भव्य शिवलिंग दिसले. हे दृश्य पाहण्यासाठी तेथे अनेक लोकांची गर्दी निर्माण झाली आणि हळूहळू याचे रूपांतर अमरनाथ यात्रेमध्ये झाले.
मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.