अघोरी मंदिर सोडून स्मशानभूमीत पूजा का करतात.? जाणून घ्या यामागील कारण..
नमस्कार मित्रांनो..
मित्रांनो, अघोरी तंत्रविद्या करणाऱ्या साधूना अघोरी साधू असे म्हटले जाते. परंतु हे साधू तंत्रविद्या मंदिरात करत नसून स्मशानभूमीत मध्यरात्री का करतात ? या साधूंची जीवनशैली बाकीच्यांपेक्षा वेगळी असते, यांचे दिसणे सुद्धा भयानक असते. अघोरी साधू तंत्रक्रिया मंदिरात करत नसून स्मशानभूमीतच मध्यरात्री का करतात हे आज आपण जाणून घेऊयात.
आघोरी साधू स्मशानामध्ये साधना करतात त्यामागे एक विशेष महत्त्व आहे. या पृथ्वीवरील प्रत्येक गोष्टीला ते महाकाली आणि भगवान शंकर यांचे अंश मानतात. अघोरी साधूंचा सर्वात मोठा उद्देश म्हणजे माता काली आणि भगवान शंकर यांना प्रसन्न करून त्यांच्याकडून शक्ती प्राप्त करून आपली साधना सिद्ध करण्याचा असतो. हे साधू माता काली यांच्या तीन रूपांची म्हणजेच भैरवी,
बगलामुखी आणि धुमावतीची पूजा करतात. भगवान शंकर यांची पूजा भैरव वीरभद्र आणि महाकाल या रूपात करतात. स्मशान भूमी हेच त्यांचे निवासस्थान असते. स्मशान ही एक अशी जागा आहे जिथे सहसा कोणी जात नाही त्यामुळे साधना करण्यासाठी ते योग्य ठिकाणी मानले आहे तसेच साधनेच्या वेळी व्यत्यय येत नाही. अघोरी साधू हट्टी स्वभावाचे असतात :-
समाजामध्ये अघोरी साधूं विषयी अनेक प्रकारच्या दंतकथा प्रचलित आहेत जसे की, हे आघोरी साधू हट्टी स्वभावाचे असतात. जी गोष्ट ठरवतात ती पूर्ण करतात. त्यांच्या रागाला मर्यादा नसते. अधिक तर अघोरी साधूंचे डोळे लाल असतात जसे की ते फार क्रोधात आहेत परंतु वास्तवात त्यांचे मन फार शांत असते. आघोरी साधू सर्वांपासून वेगळे राहणे पसंत करतात.
आघोरी साधू समाजामध्ये एकत्र राहणे पसंत करत नाहीत तर ते एकटे राहणे जास्त प्रसन्न करतात. हे साधू स्मशानातच आपल्यासाठी एक छोटीशी झोपडी तयार करून राहतात. आघोरी साधू तीन प्रकारच्या साधना करतात. शिव साधना, स्मशान साधना आणि शव साधना. जेव्हा हे साधू प्रेतावर पाय ठेवून साधना करतात तेव्हा त्या साधनेला शिव साधना असे म्हणतात.
बाकी दोन साधना अंतिम संस्काराच्या समान आहेत. या साधने मध्ये प्रेताला मास आणि दा-रू प्रसाद स्वरूपात दिली जाते. अंतिम संस्काराची वेळी त्या व्यक्तीच्या घरातील लोकांसोबत विविध केले जातात त्यावेळी मृत व्यक्तीला चितेवर झोपवण्या अगोदर त्या चितेची पूजा केली जाते, गंगाजल शिंपडले जाते आणि प्रसाद म्हणून मावा दिला जातो.
अघोरी साधू कच्चे मांस खातात :- काही अघोरी साधूने स्वतः हे सांगितले आहे की ते स्मशान मध्ये राहून अर्ध्या जळलेल्या प्रेताचे मांस खातात त्यांचे असे म्हणणे असते की यामुळे त्यांना तंत्रसाधना करण्यासाठी शक्ती मिळते. बाकी लोकांसाठी ही एक आश्चर्याची गोष्ट आहे परंतु या साधू लोकांसाठी ही सवयीचे असते अघोरी साधू गाईचे मांस सोडून सर्व काही खातात.
अघोरी साधू आपल्या सोबत नरमुंड ठेवतात :- नरमुंड म्हणजे मृत व्यक्तीचे डोके. अघोरी साधूंना जर तुम्ही प्रत्यक्षात कधी पाहिले किंवा छायाचित्र पाहिले तर तुम्हाला दिसेल की हे साधू आपल्या सोबत नेहमी एक नरमुंड ठेवतात. हे साधू या नरमुंडांचा वापर भोजन करण्यासाठी देखील करतात. भगवान शंकर यांनी ब्रम्हाजींचे शीर का’पून ब्रम्हांडाला प्रदक्षिणा मारली होती.
हे साधू स्वतःला भगवान शंकर यांचे अनुयायी समजत असल्यामुळे त्यांच्या या कृत्याला प्रेरित होऊन नरमुंड आपल्या सोबत ठेवतात.
अघोरी साधू फक्त कुत्रा पाळतात :- अघोरी साधू आपल्यासोबत गाय बकरी व मनुष्य यापैकी कोणालाही ठेवत नाही तर फक्त कुत्रा आपल्याजवळ ठेवतात अघोरी साधूंचे कुत्र्यावर विशेष प्रेम असते.
मंदिरामध्ये साधना का करत नाही :- हिं-दूंच्या उपासना स्थळाला मंदिर म्हणतात. पूजा, अर्चना आणि आराधना करण्यासाठी निश्चित केलेले देवस्थान आहे. येथे बाकी कुठलेही विधी केली जात नाही कारण मंदिर हे एक पवित्र स्थान आहे. मांस, मदीरा आणि प्रेत यांना व यासं’बंधी जोडले गेलेल्या कुठल्याही गोष्टीला अशुभ मानले गेले आहे.
मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.