ही 5 स्वप्ने सांगतात की तुम्ही श्रीमंत होणार आहात.. अशी स्वप्ने गुपितच ठेवा कोणाला सांगू नका.. नाहीतर..
नमस्कार मित्रांनो..
मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का स्वप्न शास्त्रामध्ये अशा स्वप्नांविषयी सांगितले आहे जे तुमच्याकडे लक्षी येणार आहे असे संकेत देतात. ही स्वप्ने जेवढी गुप्त ठेवली जातील तेवढा याचा प्रभाव दिसेल असे सांगितले आहे. आता आपण अशी स्वप्ने पाहूया ज्याने तुम्ही धनवान होणार असे संकेत मिळतात. स्वप्नांविषयी असे म्हटले जाते की, स्वप्नांमध्ये तुम्हाला,
तुमचा येणार चांगला काळ दिसू शकतो तसेच आयुष्यामध्ये येणारे वाईट वेळ सुद्धा दिसते. ज्या स्वप्नांविषयी आज आपण बोलणार आहोत अशी स्वप्ने तुम्ही चुकूनही कोणाला सांगू नकात. स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नांमध्ये महालक्ष्मी दिसणे हे सुख समृद्धीचे प्रतीक मानले जाते. जर तुमच्या स्वप्नात साक्षात महालक्ष्मी प्रकट झाली तर समजून जा की,
तुम्हाला मोठ्या प्रमाणात त्यांचा लाभ होणार आहे. या स्वप्नानंतर तुमच्या आयुष्यातील सर्व कष्ट दूर होतात असे मानले जाते. जर असे स्वप्न एखाद्या व्यापाऱ्याला पडले तर भविष्यात त्याचा व्यापार फार चांगला चालणार असे संकेत मानले जातात. जर असे स्वप्न लहान मुलांना दिसले तर त्याचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर त्यांच्या आयुष्यावर होतो.
स्वप्नामध्ये जर रिकामी भांडी दिसली तर ती सुद्धा शुभ मानले गेले आहे. रिकामी भांड्यांचे दिसणे म्हणजे धनलाभ होण्याचे संकेत असतात. झाडू हे सुख समृद्धीचे प्रतीक आहे. जर तुम्हाला स्वप्नात झाडू दिसले तर समजून जा की, तुमच्या आयुष्यात धनलाभ होणार आहे. परंतु हे लक्षात ठेवा या स्वप्नाविषयी तुम्ही कुठेही वाच्यता करणार नाही.
स्वप्नशास्त्रानुसार जर तुम्ही स्वतःला गायीच्या शेणापासून शेणी तयार करताना दिसत असाल तर तुमचे नशीब लवकरच बदलणार आहे असे मानले जाते. या प्रकारचे स्वप्न पाहणारा मनुष्य खूप जास्त प्रगती करतो. जर तुम्ही स्वप्नामध्ये उंदीर पाहिला तर तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो असे स्वप्न शास्त्रामध्ये म्हटले आहे. त्याप्रमाणे असे म्हटले जाते की,
स्वप्नामध्ये उंदराला पाहिल्याने गरीबी दूर होते. असे स्वप्न पाहिल्यास कुठल्याही मोठ्या व्यक्तीला सांगू नये परंतु घरातील छोट्या व्यक्तीला नक्कीच सांगावे त्यामुळे याचा चांगल्या रीतीने तुम्हाला फायदा मिळतो. स्वप्नशास्त्राप्रमाणे ही काही स्वप्ने आहेत जी पाहिल्यानंतर कोणालाही सांगू नये परंतु त्याच्यामध्ये एक अपवाद आहे की उंदीर पाहिल्यानंतर तुम्ही ते स्वप्न लहान मुलांना सांगू शकता.
परंतु बाकी कोणालाही या स्वप्नांविषयी न सांगणे तुमच्या हिताचे ठरते. या स्वप्नांशिवाय स्वप्नशास्त्रामध्ये प्राणी पक्षी यांच्याशी सं’बंधित अशी अनेक प्रकारची स्वप्न आहेत जी तुम्हाला धनलाभ होण्याचे संकेत देतात. जर तुमच्या स्वप्नामध्ये घुबड, पोपट, मधमाशी, मुंगी आणि विंचू दिसत असेल तर हे सुद्धा तुम्ही लवकरच श्रीमंत होऊ शकतात याचे संकेत आहेत.
मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.