Alphamarathi.com

Super Fast Marathi News
श्री कृष्णाच्या ज’न्माचे रहस्य.? मध्यरात्रीतच का अवतरले होते भगवान श्री कृष्ण.. पहा यामागील सत्य..

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, वासुदेव आणि देवकी यांच्या विवाहनंतर राजा कंस आपली बहीण देवकी हिला सासरी सोडण्यास जात होता. तेव्हा वाटेत आकाशवाणी झाली ती अशी की “देवकीची आठवी संतान राजा कंस च्या मृ’त्यूचे कारण बनेल.” राजा कंस यांनी ही आकाशवाणी ऐकली आणि आपली बहीण देवकी आणि तिचे पती वासुदेव या दोघांनाही कारागृहात बंदी केले,

आणि देवकीच्या संतानचा एक-एक करून व’ध करू लागला. परंतु जेव्हा देवकीच्या आठव्या मुलाच्या ज’न्माची वेळ आली तेव्हा कंसचे मायावी राक्षस कामी आले नाही, कंस वासुदेवला कारागृहाच्या बाहेर जाण्या पासून रोखू शकला. श्रीकृष्ण कसे एका रात्रीतच मथुरातून गोकुळला पोचले ही गोष्ट तर तुम्हाला सर्वांना माहीतच असेल.

परंतु तुम्हाला माहित आहे का ? श्रीकृष्णाने ज’न्म घेण्यासाठी रात्री बारा वाजताचा काळ का निवडला ? याचं पहिलं कारण असे आहे जे आपल्याला ध’र्मशास्त्रात मिळतं ते असे आहे की, चंद्र देवांची अशी इच्छा होती कि श्रीकृष्ण त्यांच्या कुळात ज’न्माला यावेत. एकदा चंद्रदेवांनी श्रीराम यांना सांगितले होते की “श्रीराम तुम्ही एकदा सूर्यकुला ज’न्म घेतला आहे तसाच तुम्ही माझ्या कुळातही ज’न्म घ्या.”

भगवान श्रीराम सूर्यवंशी होण्याचे कारण सूर्यप्रकाशात ज’न्मले होते त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्ण चंद्रवंशी होण्याचे कारण अर्ध्या रात्री ज’न्माला आले. “बुध” हा चंद्राचा पुत्र असल्यामुळे श्रीकृष्णांनी बुधवारी ज’न्म घ्यायचा ठरवले तसेच रोहिणी ही चंद्राची पत्नी आणि एक नक्षत्र आहे म्हणून श्रीकृष्णांनी रोहिणी नक्षत्राच्या मुहूर्तावर ज न्म घेतला. असे मानले जाते की, भगवान श्रीकृष्ण जेव्हा जन्म घेत होते तेव्हा,

आजूबाजूच्या वातावरणात एका वेगळ्याच शक्तीचा संचार होत होता, आकाशातील सर्व नक्षत्र ग्रह आणि तारे शांत आणि सोम्य स्थानी मध्ये होते, हवा स्वच्छ आणि प्रसन्न होती, आकाशात तारे चमकत होते, मध्य रात्री तलावात कमळाची फुले फुलली होती. एवढेच नाही तर आकाशातून देवी देवता फुलांचा वर्षाव करत होते. ही फक्त म्हणण्यास मध्य रात्र होती परंतु पशुपक्षी सुद्धा खुश होते,

आणि जोरात आवाज करत होते. आकाशात चमकणारी आणि जोराचा पाऊस हा विष्णू अवताराचा संदेश देत आहेत असे वाटत होते. भगवान श्रीकृष्ण यांना वाटले असते तर त्यांनी दिवसा कुठल्याही क्षणाला ज’न्म घेतला असता परंतु, मध्यरात्री ज’न्म घेण्याचे अजुन एक कारण होते ते म्हणजे श्रीकृष्णांना कुठले अवताराप्रमाणे ज’न्म घ्यायचा नव्हता, श्रीकृष्णांना एक साधारण बालक म्हणून ज’न्म घ्यायचा होता.

याशिवाय त्यांनी मध्यरात्री ज’न्म घेण्याचे कारण म्हणजे मध्यरात्री कुठलाच सैनिक जागा नसतो त्या कारणाने त्यांचे पिता वासुदेव त्यांना सुखरूप पणे गोकुळ येथे पोहोचवतील आणि पुन्हा कारागृहात येतील. भगवान श्रीकृष्ण आपल्या ज’न्माने कंसला हा संदेश देऊ इच्छित होते की, कंसाला मा’रणारा या धरतीवर ज’न्माला आला आहे. जेव्हा वासुदेव यांनी श्री कृष्णाला गोकुळ मध्ये ठेवले तेव्हा एक आकाशवाणी झाली की माता यशोदा च्या ग’र्भातून ज’न्माला आलेली कन्या वासुदेव आपल्या सोबत घेऊन कारागृहात जावेत.

जेव्हा वासुदेव कन्येला घेऊन कारागृहात पोहोचले तेव्हा त्याची खबर राजा कंस पर्यंत पोहोचली. कंसला पहिल्यापासून माहित होतं की त्याची बहिण देवकी ग’र्भवती आहे म्हणून त्याला असे वाटले की देवकीने एका कन्येला ज’न्म दिला आहे. जेव्हा कंस त्या कन्येला मा’रण्यासाठी आला तेव्हा ती कन्या त्याच्या हातातून सुटून आकाशामध्ये गेली आणि आकाशवाणी झाली..

“अरे मूर्ख कंस मी तर फक्त एक माया आहे, मला मा’रून तुला काही मिळणार नाही, तुला मा’रणाऱ्याने ज’न्म घेतला आहे.” त्यानंतर कंसनी गोकुळ मध्ये अनेक वेळा श्रीकृष्णाला मा’रण्यासाठी मायावी राक्षस पाठवले होते परंतु भगवान श्रीकृष्णाने सर्वांचा संहार केला. कंसाचा अंत करण्यासाठी श्रीकृष्णाने कंसाच्या राजगृहात जाऊन त्याचा अंत केला. तर ही आहे भगवान श्रीकृष्ण यांनी मध्यरात्री ज’न्म घेण्यापासूनची ते कंसाचा व’ध करण्यापासून ची कहाणी.

मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.