Alphamarathi.com

Super Fast Marathi News
भाग्य बदलण्याच्या अगोदर मिळतात हे 7 संकेत.. असे संकेत दिसू लागले तर समजून जा तुमच्याकडे पैसा येणार आहे..

नमस्कार मित्रांनो..

मित्रांनो, वेळ ही अशी गोष्ट आहे जी राजाचा रंक बनवू शकते आणि कोणत्याही यशस्वी माणसाला अपयश देऊ शकते. आता तुम्ही विचार करत असाल की मी असे का सांगत आहे.? तुम्ही हे तर अनुभवलेले असेलच की, कोणाचीही वेळ सारखी राहत नाही. जर आज कोणाचाही चांगला वेळ असेल तर पुढे जाऊन त्याच्यावर वाईट वेळ येणार हे वास्तव आहे.

चांगल्या वेळेच्या बाबतीत भगवान श्रीकृष्णांनी भगवत गीतेमध्ये काही अशा संकेतांबद्दल सांगितले आहे की, ज्यावरून तुम्ही माहीत करून घेऊ शकता की पुढे जाऊन तुमच्यावर कशी वेळ येणार आहे.? भगवत गीतेमध्ये श्रीकृष्ण सांगतात की, वेळ ही अशी गोष्ट आहे जी माणसाच्या आयुष्यात येणाऱ्या सुख-दुःखांबद्दल सांगते. तसेच ते सांगतात की, सुख येणार असेल किंवा दुःख याचा संकेत हा माणसाने केलेली कामे,

पशुपक्षी आणि भक्तांच्या सहाय्याने मिळत असतो. परंतु अज्ञानामुळे माणसाला ते जाणून घेता येत नाही. भगवत गीतामध्ये वर्णन केलेल्या एका कथेनुसार एके दिवशी नारद मुनी भगवान श्री विष्णूंना भेटण्यासाठी वैकुंठात गेले. त्यांना माणसाच्या आयुष्यात येणाऱ्या सुख किंवा दुःखाच्या आधी मिळणाऱ्या संकेतांबद्दल विचारू लागले. तेव्हा श्रीहरी विष्णूने त्यांना सांगितले की,

जेव्हा कोणत्याही व्यक्तीचे डोळे ब्रह्म योग म्हणजेच पहाटे तीन ते पाच या दरम्यान उघडतात किंवा या वेळेमध्ये त्या व्यक्तीच्या स्वप्नात देवाचे दर्शन होत असेल आणि त्या व्यक्तीला वाटत असेल की, कोणीतरी त्यांना दिशा दाखवत आहे जे त्यांना समृद्धी आणि प्रगतीकडे घेऊन जाईल तर अशावेळी त्या व्यक्तीने समजून जावे की- त्याच्या जीवनामध्ये समृद्धीकडे जाण्याचे नवीन मार्ग उघडे होणार आहेत,

जे पूर्ण करण्यासाठी देव स्वतः त्यांची मदत करतील. याच प्रमाणे जेव्हा कोणीही व्यक्ती पूजा करत असेल आणि त्याच्यासमोर देवाला घातलेले फुले पडले तर त्याला देवाचा आशीर्वाद मिळाला असे म्हणावे. हे सुद्धा एक शुभ संकेत असे मानले जाते. एवढेच नव्हे तर अजूनही अशा अनेक घटना आहेत ज्यावरून मनुष्य आपली येणारी वेळ कशी असेल हे जाणून घेऊ शकतो.

जेव्हा एखादा माणूस सकाळी उठल्यानंतर आरशामध्ये स्वतःचा चेहरा बघतो आणि त्याला स्वतःचा चेहरा एकदम प्रसन्न व हसरा दिसतो असे लागोपाठ काही दिवस होत असेल तर अशावेळी त्या माणसाने समजून घेतले पाहिजे की, त्याचा चांगला वेळ सुरू होणार आहे. याच बाबतीत अजून एक संकेत असा आहे की, जर तुम्ही अचानक एकदम खुश राहू लागला आहात याचा अर्थ असा होतो की,

तुमच्या मनामध्ये देवाचा वास आहे. अशावेळी तुम्ही जे काही विचार करता किंवा तुम्हाला काही करावेसे वाटते ते पूर्ण होते. असेही मानले जाते की, जेव्हा तुम्हाला स्वप्नामध्ये पुढे होणारी कुठली गोष्ट आधीच दिसते तर तेही देवाचा एक संकेत आहे. यावरून तुमच्या जीवनामध्ये आता काहीतरी चांगले होणार आहे असे मानू शकता. असेच अजून अनेक संकेत आहेत जे तुमच्या जीवनातील दुःख नष्ट होण्याबद्दल आणि,

चांगली वेळ सुरू होण्याबद्दल सांगतात. असाच अजून एक संकेत आहे जो तुमच्या धनसंपत्तीबद्दलच्या सम’स्यांचे निवारण होईल असा इशारा करतो. जर सकाळच्या वेळी तुमचा एखादा नातेवाईक किंवा इतर कोणीही व्यक्ती तुमच्या घरी येऊन पैसे देऊन जात असेल तर लक्ष्मीने तुमच्या घरात प्रवेश केला आहे असे समजावे यावरून तुम्ही समजून घ्या की, तुमच्या घरातील धनसंपत्ती बाबतच्या सम’स्या दूर होणार आहेत.

श्रीकृष्ण पुढे असे सांगतात की- जर एखाद्या व्यक्तीच्या हातात पैसे कधी टिकत नसतील आणि अचानक त्याच्या हातात पैसे टीकायला लागले तर त्याने समजून घ्यावे की, त्याचे रिकामे खिसे आता भरायला सुरुवात होईल, त्याच्या आयुष्यातील अडी-अडचणी दूर होतील. काही असे संकेत सुद्धा आहेत जे पशुपक्षांकडून माणसाला मिळतात जसे की, जर एखादा माकड तुमच्या घराच्या छपरावर आंब्याची पारंबी फेकून गेला,

एखाद्या मांजरीने जर तुमच्या घरात पिल्ले ज’न्माला घातली, जर एखाद्या पक्षाने तुमच्या घराच्या छपरावर एखादी चांदीचे वस्तू फेकली तर हा देवाचा संकेत आहे की, तुमचा चांगला वेळ सुरू होणार आहे. याशिवाय अजून एक संकेत हिं’दू ध’र्मात पूजनीय मानले जाणाऱ्या गोमाते कडून मिळतो. जर तुमच्या घरासमोर अचानक गाय यायला सुरुवात करते आणि तुमच्याकडून जेवण किंवा पाण्याचे सेवन करते तर समजून जा की,

तुमच्या घरावर आता देवाची कृपा झाली आहे. याशिवाय जेव्हा तुम्ही सकाळच्या वेळी घरातून बाहेर निघता आणि तुमच्या समोरून कोणीही पाणी किंवा दूध घेऊन जात असेल तर यालाही सुख-समृद्धीचा संकेत मानले जाते तसेच तुमच्या जीवनामधील दुःख आता कमी होणार आहेत. तुम्ही समृद्धीच्या दिशेने वाटचाल करणार आहात. लहान मुलांना देवाचे दुसरे रूप मानले जाते आणि म्हणूनच घरात मुले ज’न्माला येणे अत्यंत शुभ आणि देवाने स्वतः घरात प्रवेश केला आहे असे मानले जाते.

असे मानले जाते की जर एखादे लहान मुल तुमच्या घरी रोज येऊन तुमच्या अंगणात खेळत असेल तर निश्चितपणे तुमच्या घरात सुखसमृद्धी येणार आहे. जर तुमच्या शरीराच्या उजव्या बाजूची अंगे म्हणजेच उजवा गाल, उजवा हात किंवा उजवा डोळा फडकायला सुरुवात झाली तर तुमच्या घरात सुख समृद्धी येणार आहे, असे म्हटले जाते. जर तुम्ही एखादे महत्त्वाचे काम करायला बाहेर निघत आहात आणि  वाटेत जर एखादे लहान मूल तुमच्याकडे पाहून हसले तर तुमचे ते महत्त्वाचे काम निश्चितच पूर्ण होईल.

मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.