कलयुग आल्यानंतर मनुष्य एवढा का बदलतो.? बघा यामागील रहस्य.. असे का घडते पहा..
मित्रांनो, सनातन ध’र्म ग्रंथांच्या अनुसार ब्रम्हाजींनी सृष्टीच्या रचने नंतर कालखंडाचे चार युगात विभाजन केले होते ज्यांना सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग या नावांनी ओळखले जाते. प्रत्येक युगामध्ये माणसाच्या जीवनात अनेक प्रकारचे परिवर्तन बघायला मिळाले आहे. परंतु तुम्हाला हे माहित आहे का की घोर कलियुग आल्यानंतर मनुष्य किती बदलणार आहे ?
हिं’दू पौराणिक साहित्य नुसार कालखंडाचा आरंभ हा सत्ययुगाने होतो आणि समाप्ती कलियुगाने होते. कलियुग चा शेवट झाल्यानंतर पुन्हा सत्ययुगाची सुरुवात होईल आणि असे हे कालखंडाचे चक्र निरंतर चालत राहील. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना सांगतो इतर युगातील माणसांबद्दल. सत्ययुगामध्ये सर्व माणसांचा एकच ध’र्म होता आणि तो म्हणजे माणसांमध्ये कुठल्याच प्रकारचा स्वार्थ असू नये.
सर्व लोक एकमेकांच्या सहायतेसाठी तत्पर असायचे. या युगामध्ये कुठल्याच व्यक्तीला कोणत्याही प्रकारचा रो’ग होत नसे. याच कारणामुळे माणूस आपल्या सर्व इंद्रियांवर नियंत्रण ठेवत असे. कोणीही कोणाच्या गुणांमध्ये दोष दाखवण्याचे काम करत नसे. एवढेच नव्हे तर या युगामध्ये कोणताच माणूस दुःखी नसायचा आणि म्हणूनच कोणाच्याही डोळ्यातून कधीच अश्रू निघत नव्हते. या युगामध्ये लोकांमध्ये कोणत्याच प्रकारचे घमंड नव्हते, तसेच अहंकारही नव्हता. माणसे आपापसात कधीच भांडत नव्हती. तर नेहमी एकमेकांसोबत प्रेमाने राहायची.
लिं’ग पुराणांमध्ये सांगितले आहे की, सत्य युगातील लोकांमध्ये एक वेगळ्याच प्रकारची स्फूर्ती होती त्यांच्यामध्ये कोणत्याच प्रकारचा आळस नव्हता. या युगातील माणसांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य हे होते की, कोणीही कोणासोबत कधी भांडत नसेल, नाही कोणी कोणाची चहाडी करत असे, आणि कोणीच स्वतःला दुसऱ्यापेक्षा बलवान समजत नसे. सत्य युगात सर्व माणसे आपल्या कर्तव्याचे पालन करत असत. सर्व माणसांचा जास्तीत जास्त वेळ धर्मकार्य करण्यातच जात असे. या युगामध्ये स्त्री आणि पुरुष यामध्ये कोणताच भेदभाव केला जात नव्हता.
सगळ्या वर्णाच्या लोकांना शिक्षा, शास्त्र आणि कला या क्षेत्रांमध्ये समान संधी दिली जात असे. पौराणिक साहित्यानुसार या युगामध्ये माणसाची उंची ३२ फूट एवढी होती आणि माणसे आपल्या इच्छेनुसार आपल्या शरीराचा त्याग करू शकत असत. सत्ययुगाचा कालावधी १७ लाख २८ हजार वर्षे एवढा होता. सत्ययुगाचा कालावधी समाप्त झाल्यानंतर दुसऱ्या युगाची म्हणजेच त्रेतायुगाची सुरुवात झाली. या युगामध्ये माणसे आपल्या कर्तव्याचे पालन करत असतात परंतु त्यांचे आपल्या कुठल्याच इंद्रयावर नियंत्रण नव्हते.
त्रेतायुगामध्ये माणसे हळूहळू आपल्या जवळपासच्या लोकांमध्ये गुंतून राहू लागली. म्हणजेच लोकांमध्ये स्वार्थ भावना ज’न्म घ्यायला लागली होती. या युगामध्ये मनुष्य दुसऱ्याची चहाडी करणे, दुसऱ्यांवर जळणे या गोष्टींची सुरुवात झाली होती. परंतु अशा प्रकारच्या व्यक्तींची संख्या फार कमी होती. या युगामध्ये समाजाचे वर्णाश्रमाच्या ब्रा’ह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शुद्र या वर्णांमध्ये विभाजन होण्यास सुरुवात झाली. पौराणिक साहित्य अनुसार या युगामध्ये माणसांचा आयुष्य दहा हजार वर्षे एवढे होते. या युगाचा कालावधी १२ लाख ९६ हजार वर्षे एवढा होता.
या कालखंडाची समाप्ती झाल्यानंतरच द्वापार युगाची सुरुवात झाली होती. लिं’ग पुराणाच्या अनुसार द्वापार युगामध्ये माणसे आपल्या कर्तव्यापासून दूर व्हायला लागली होती. म्हणजेच माणूस स्वार्थी झाला होता. या युगामध्ये भौतिक सुखाची पूर्ती करण्यासाठी माणूस अनेक प्रकारचे अधार्मिक कृत्ये करत असे. जस जसा द्वापार युगाचा कालावधी पुढे सरकतो तसा तसा माणूस काम, क्रोध, लोभ आणि इर्षा अशा प्रकारच्या दुर्गुणांनी ग्रासला जात होता. या युगामध्ये लोकांची ओळख कर्माने नव्हे तर ज’न्माने केली जात होती.
म्हणजेच या युगामध्ये ब्रा’ह्मणाचा मुलगा हा ब्रा’ह्मण, क्षत्रियाचा मुलगा क्षत्रिय, वैशाचा मुलगा वेश्य आणि शूद्र व्यक्तींचा मुलगा शूद्र म्हणून ओळखला जाऊ लागला. या युगातील पुरुष स्त्रियांना आपली संपत्ती समजत असत. समाजामध्ये अनेक प्रकारचे अधर्मिक कृत्ये घडत होती. मुलांनी आपल्या वडिलांच्या आदेशाचे पालन करणे सोडून दिले होते. अशाच प्रकारच्या गोष्टींमुळे महाभारत हे यु-द्ध झाले होते. पौराणिक साहित्य नुसार या युगामध्ये माणसाचे आयुष्य एक हजार वर्षे एवढे होते.
या युगाचा कालावधी ८ लाख ६४ हजार वर्षे एवढा होता. द्वापार युगाच्या समाप्तीनंतरच अंतिम युग म्हणजे कलियुगाची सुरुवात झाली होती. आता हे जाणून घेऊया की, युग परिवर्तनाच्या नुसार माणसाच्या लक्षणांमध्ये परिवर्तन का होत होते. सत्य युगामध्ये ध’र्माचा आधार चार पायांवर होता, त्रेतायुग मध्ये तीन, द्वापार युग मध्ये दोन आणि कलियुगामध्ये फक्त एका पायाचा आधार शिल्लक राहतो. ध’र्म लोप पावत असल्यामुळे माणसाच्या वागणूकी मध्ये सुद्धा अनेक प्रकारचे बदल होतात.
म्हणूनच माणसांमध्ये युगाच्या अनुसार काम, क्रोध, क्लेश, शा-रीरिक रो’ग आणि द्वंद्व या गोष्टी वाढत जातात. वेदशास्त्राचा मनुष्य त्याग करतो. कलियुगामध्ये माणसे अधर्मी, दुराचारी, क्रोधी आणि अल्प बुद्धी असणारे होतात. या युगामध्ये सर्व लोक आपल्या कर्तव्यापासून दूर जातात. जसे की ब्रा’ह्मण वेद शिकवणे बंद करतो, क्षत्रिय प्रजेचे रक्षण करत नाही, लोक स्त्री भ्रू-ण ह’त्या करतात, या युगामध्ये चोरट्या प्रवृत्तीचे लोक साध्या भोळ्या जनतेवर शासन करतात. लोक जप, तप आणि यज्ञाचे फळ सुद्धा विकून टाकतात.
कलियुगातली स्त्री असो किंवा पुरुष कोणीच आपल्या कर्तव्याचे पालन करत नाही. माणसाच्या वाढत्या स्वार्थी वृत्ती मुळे अनेक हिं’सक प्रकार घडतात. या युगाच्या शेवटी ह’त्या चोरी, बला-त्का र जास्त प्रमाणात होतील. धरतीचा रंग बदलेल. माणसे एकमेकांच्या र’क्तासाठी तहानलेली असतील. त्यावेळी माणसाचे र’क्त या धर्तीवरून वाहायला लागेल. या युगाच्या अंतिम चरणात माणसाच्या वागणुकीमध्ये एवढा बदल होईल की, वडील आपल्या मुलाला ओळखणार नाही, तसेच पुत्र आपल्या पित्याला ओळखणार नाही.
वडिलांच्या मृ-त्यूनंतर मुले त्यांचे श्राद्ध सुद्धा घालणार नाहीत. आपल्या वडिलांच्या आ’त्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना देखील करणार नाहीत. माणसांमध्ये ध’र्माचे ज्ञान पूर्णपणे समाप्त होईल आणि त्याचवेळी कलियुगाचा अंत होईल. शास्त्रांच्या अनुसार येणाऱ्या काळात पृथ्वीवर त्याच माणसांचा ज-न्म होईल ज्यांनी अनेक प्रकारची पाप कर्मे केलेली असतील. वर्तमान काळात तुम्ही जे काही पाहत आहात त्यापेक्षाही भविष्य खूप भयानक असेल. माणसे एकमेकांचा खू’न करण्यास कधी मागेपुढे पाहणार नाहीत. माणूस फक्त स्वतःचाच विचार करेल,
एवढेच नव्हे तर या युगाच्या समाप्तीनंतर पापांची सीमा एवढी वाढेल की, भगवान विष्णू स्वतः कलकी अवतार धारण करून सर्व पापी लोकांचा संहार करतील. ध’र्मशास्त्राच्या अनुसार असे सांगण्यात आले आहे की, भगवान विष्णूंनी कलकी अवतार धारण केल्यानंतर तीन दिवसात ते पृथ्वीवरील सर्व पापी लोकांचा नाश करतील आणि सर्व अध’र्म नष्ट करतील आणि त्यानंतर नवीन युगाची सुरुवात होईल. ज्या तीन दिवसांमध्ये श्रीहरी कल्की अवतार धारण करून संघर्ष करतील. त्या दिवसांना घोर कलियुग म्हटले जाईल पापांच्या संहाराचा आणि,
अध’र्माच्या नाशाचा दिवस म्हटला जाईल. या येणाऱ्या घोर संकटाच्या वेळी ज्या माणसांनी त्यांच्या आयुष्यात भयानक परिस्थिती बघितलेली असेल ते लोक सुद्धा आश्चर्यचकित होतील. ही परिस्थिती केवळ पापी आ-त्मा पाहू शकेल तसेच पुण्यात्मा देवाच्या चरणी निघून जाईल. आज वर्तमान काळामध्ये जे काही होत आहे ते हिं’दू शास्त्राच्या नुसारच होत आहे. भविष्यात जे काही होईल ते सुद्धा या शास्त्राच्या नुसारच होईल. आता या युगामध्ये माणसाची उंची पाच ते सात फूट आणि आयुष्य फक्त ७० ते ८० वर्षे एवढेच राहिले आहे.